शाश्वत भविष्यासाठी अन्न पद्धतीमध्ये मूलभूत बदलाची आवश्यकता

एकूणच मानव आणि पृथ्वीच्या भविष्यासाठी आहारामध्ये लक्षणीय बदल करण्याची आवश्यकता संशोधकांनी मांडली आहे. मांसाहाराऐवजी वनस्पतीजन्य आहाराला प्राधान्य दिल्यास भविष्यातील मोठ्या लोकसंख्येसाठी आहाराची तजवीज होण्यास मदत होईल.
एकूणच मानव आणि पृथ्वीच्या भविष्यासाठी आहारामध्ये लक्षणीय बदल करण्याची आवश्यकता संशोधकांनी मांडली आहे. मांसाहाराऐवजी वनस्पतीजन्य आहाराला प्राधान्य दिल्यास भविष्यातील मोठ्या लोकसंख्येसाठी आहाराची तजवीज होण्यास मदत होईल.

सन २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या सुमारे १० अब्ज होणार आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या आहाराची तजवीज करण्यासाठी गरिबी, जंगलांची हानी आणि वाढत्या हरितगृह वायूचे उत्सर्जन यामध्ये वाढ होत जाणार आहे. भविष्यात या समस्येला सामोरे जाताना आपल्या खाद्य पद्धतीमध्ये लक्षणीय बदल केल्याशिवाय पर्याय नसल्याचे संशोधकांचे मत आहे. जागतिक बॅंक, संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण आणि विकास कार्यक्रम, सीआयआरएडी आणि आयएनआरए या संस्थांनाद्वारे प्रकाशित होणाऱ्या जागतिक स्रोत अहवालाअंतर्गत ‘सस्टेनेबल फूड फ्युचर’ या अहवालामध्ये या विषयाची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. २०५० पर्यंत होणाऱ्या १० अब्ज लोकसंख्येसाठी अन्नांची मागणीही ५० टक्क्याने वाढेल. आहारामध्ये प्राणीज घटकांचा (मांस, डेअरी आणि अंडी) समावेश असल्यास मागणीचे प्रमाण सुमारे ७० टक्क्यांपर्यंत पोचणार आहे. लक्षावधी लोकांना भूकेचा सामना करावा लागेल. शेतीखालील क्षेत्र एकूण क्षेत्राच्या निम्म्यापर्यंत पोचलेले असेल. या साऱ्या प्रक्रियातून जागतिक हरितगृह वायूच्या एक चतुर्थांश इतके उत्सर्जन होणार आहे. अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ करणे, हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी राखणे, शेतीखालील क्षेत्रामध्ये वाढ होऊ न देणे हे सारे साध्य करण्यासाठी सीआयआरएडी- आयएनआरए अॅग्रीमोन्डे टेरा यांनी जाहीर केलेल्या अहवालामध्ये २२ पर्याय सूचविण्यात आले आहेत.

  • अन्नाचे नुकसान आणि वाया जाणे रोखून मागणी कमी करता येईल. आहारातील मांसाचे (बीफ, मटन) प्रमाण कमी करून, त्याऐवजी वनस्पतीजन्य पदार्थांचा वापर वाढवणे आवश्यक आहे. यासाठी जैवइंधनापेक्षा खाद्य आणि पशुखाद्य यांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. लोकसंख्या वाढीचा वेग कमी करणे.
  • आहे तेवढ्याच क्षेत्रातून पीक आणि पशुधन उत्पादकतेमधील वाढीद्वारे उत्पादनामध्ये वाढ करावी लागेल.
  • जंगलाची तोड रोखण्यासोबत नैसर्गिक पर्यावरणाचा तोल सांभाळणे. क्षारासह विविध कारणांनी खराब झालेल्या जमिनीमध्ये सुधारणा करणे.
  • मत्स्यपालनासोबतच सागरी माशांचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे करण्याची आवश्यकता आहे.
  • शेती पद्धतीमध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानांचा वापर वाढवून कृषी क्षेत्रातून होणारे हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे.
  • जागतिक तापमान वाढ मर्यादीत ठेवल्यास अन्नधान्य उत्पादनासाठीही फायद्याचे ठरणार आहे.
  • अन्नधान्य उत्पादनामागोमाग पर्यावरणाचे आणि विकासाच्या समस्या असणार आहेत. त्यात प्राधान्याने जंगलांची तोड, कुपोषण, जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याची कमरतरता, वातावरणातील बदल, जल प्रदूषण अशा अनेक घटकांचा समावेश असणार आहे.
  • शेती आणि जमीन वापरातील बदलामुळे जागतिक हरितगृह वायूच्या उत्सर्जनामध्ये सुमारे २५ टक्के वाढ होणार आहे. (प्रति वर्ष १२ गीगाटन कार्बन डायऑक्साईड). हे प्रमाण २०५० पर्यंत १५ गीगाटन प्रति वर्षपर्यंत पोचेल. सध्या जागतिक तापमानामध्ये २ अंश सेल्सिअसपेक्षा कमी वाढीच्या अनुषंगाने पॅरिस करारांतर्गत ठरवलेल्या जागतिक कार्बन बजेटच्या ७० टक्केपेक्षा अधिक हे प्रमाण असेल. शिल्लक ३० टक्क्यांमध्ये कर्ब उत्सर्जन ठेवण्यासाठी उद्योगांसह अन्य क्षेत्रावरील कर्ब उत्सर्जन बंधनात वाढ होईल.
  • हा अहवाल https://www.wri.org/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com