फुले, भाज्या काढणीसाठी सुरक्षित साधने

फुले, भाज्या काढणीसाठी सुरक्षित साधने
फुले, भाज्या काढणीसाठी सुरक्षित साधने

विविध फुलांची किंवा भाज्यांची तोडणी करताना काटे, वाळलेल्या फांद्यांमुळे हाताला इजा होण्याची शक्यता असते. फुले, भाज्या तोडण्याचे काम सुकर जावे यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागाने काही बॅग अाणि हातमोजे विकसित केले अाहेत. फूलशेतीसाठी उपयुक्त बॅग

१) फुलेरी

  • सुटा व गट्टी गुलाबांची तोडणी करण्यासाठी उपयुक्त.
  • तोडलेल्या फुलांचा भार पूर्णपणे पाठीवर येतो.
  • फुले अलगद राहतात अाणि कामगाराला झाडांमधून सहजपणे फिरता येते.
  • दोन्ही हाताने काम करता येते. त्यामुळे कामाची गती वाढते.
  • बास्केटला झाडाच्या फांद्या व काटे अडकत नाहीत.
  • २) गाैरी

  • सुटा गुलाब तोडण्यासाठी उपयुक्त.
  • सुती ताडपत्रीच्या बॅगेला काटे अडकून बॅग फाटत नाही.
  • बॅगेचे तोंड उघडे असल्यामुळे तोडलेली फुले जमा करणे सोपे जाते. कापडी हॅंडलमुळे बॅग रिकामी करणे सोपे जाते.
  • स्थानिक कारागीर तयार करू शकतो.
  • ३) टीकाई

  • बॅगेचे तोंड उघडे असल्यामुळे कोणतीही फुले साठवणे सोपे जाते.
  • बॅग टार्पोलीनची असल्यामुळे फुलांचा अोलसरपणा कपड्यांना लागत नाही.
  • बॅग खालच्या बाजूला उघडते त्यामुळे रिकामी करण्यास सोपी.
  • ४) सोनाई

  • झेंडू फुलांची तोडणी जलद होते.
  • ५ ते ६ किलोची क्षमता.
  • बॅग खालच्या बाजूला उघडते त्यामुळे रिकामी करण्यास सोपी.
  • भाजी काढणी सोपी करतील जनाई हातमोजे

  • लांब हातमोज्यामुळे संपूर्ण हाताचे काटे, लव व किडे यापासून संरक्षण होते.
  • काम जलद गतीने होते.
  • बेल्ट असल्यामुळे मोजा कोणत्याही हाताला सहज बसतो.
  • शिवण्यास अाणि धुण्यास अतीशय सोपा.
  • वांगी, भेंडी, गवार, सोयाबीन, हरभरा, करडई कापणी, मळणीसाठी अतिशय उपयुक्त.
  • संपर्क ः डॉ. जयश्री झेंड, ९४२३४४४८१९ (अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प गृहविज्ञान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

     

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com