पित्तशामक कोकम

कोकम
कोकम

कोकममध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतुमय पदार्थ व क जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार कोकम हे रक्तपित्तशामक, पाचक  गुणधर्माचे आहे.

  • आमसूल किंवा कोकम हे आंबट फळ आमटी, भाजीत वापरले जाते. कोकम झाडाच्या फळांना कोकम आणि फळावरच्या सुकवलेल्या सालींना आमसूल किंवा कोकम म्हणतात.
  • आमसुलापासून सरबत, चटणी, सार बनवले जाते. वरण, भाजीला आंबटपणा येण्यासाठी आमसूल वापरले जाते.चिंचेपेक्षा आमसूल अधिक गुणकारी आहे. नेहमी वापरले तरी चालते. आमसूल हे पाचक असून अंगावर पित्त उठणे, मूळव्याध, मुरडा, दाह यामध्ये उपयोगी पडते.
  • आमसूल बारीक वाटून पाण्यात मिसळून वेलदोडे, जिरेपूड, साखर टाकून सरबत बनवता येते. तयार सरबतही बाजारात मिळते. उन्हाळ्यात याचा नेहमी वापर करावा.
  • आमसुलांच्या बियांपासून तेल काढतात. ते पांढरट व मेणासारखे घट्ट असते. हिवाळ्यात त्वचेला, तळहात, तळपायास भेगा पडतात. त्यावर हे तेल गरम करून लावतात.
  • मलम तयार करण्यासाठी कोकम तेल वापरतात.
  • मूळव्याधीतून रक्त पडत असल्यास कोकम तेल खाण्यास देतात. कोकम तेल पौष्टिकही आहे.
  • अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा कोळ संपूर्ण अंगास लावावा.
  • पोटात कळ येऊन आव पडत असल्यास कोकमचे तेल भातावर घालून तो भात खावा.
  • हातापायांची उष्णतेमुळे आग होत असेल तर कोकमचे तेल संपूर्ण अंगाला चोळावे. यामुळे उष्णता कमी होऊन दाह कमी होतो.
  • हिवाळ्यात थंडीमुळे जर ओठ फुटत असतील तर कोकमचे तेल कोमट करून ओठांवर लावावे. ओठ मऊ होतात.
  • हिवाळ्यामध्ये शरीराची त्वचा कोरडी होऊन भेगा पडत असतील तर कोकमचे तेल गरम करून शरीरावर चोळल्यास भेगा नाहीशा होतात.
  • रोजच्या आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते.
  • कोकम तेलाचा उपयोग हा विविध प्रकारचे मलमे बनविण्यासाठी केला जातो.
  • कोकमचा उपयोग नियमितपणे आहारात केल्याने आतडे कार्यक्षम होऊन पोट साफ होण्यास मदत होते.
  • संपर्क : कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३ (विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com