Agriculture story in marathi, vaccination in goat | Agrowon

शेळ्यांचे लसीकरण करा; प्राणघातक रोगांपासून वाचवा
डाॅ. तेजस शेंडे
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

शेळ्यांना काही जिवाणूजन्य व विषाणूजन्य प्राणघातक रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास शेळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मरतूक होते. त्यामुळे शेळीपालन व्यवसाय व्यावसायिक दृष्टिकोनातून परवडत नाही. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे अशा प्राणघातक रोगांविरुद्ध वेळीच लसीकरण करून घेणे अतिशय फायद्याचे ठरते.

शेळीपालक शक्‍यतो अतिरिक्त खर्च किंवा अशा रोगांच्या प्रसार व संहारकतेबद्दल माहिती नसल्याने लसीकरण करणे टाळतो; पण प्रतिजनावर लसीकरणासाठी (शासकीय पशुवैद्यकीयमार्फत) येणारा वार्षिक खर्च ५० रुपयांपेक्षा पेक्षा जास्त येत नाही.

शेळ्यांना काही जिवाणूजन्य व विषाणूजन्य प्राणघातक रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास शेळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मरतूक होते. त्यामुळे शेळीपालन व्यवसाय व्यावसायिक दृष्टिकोनातून परवडत नाही. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे अशा प्राणघातक रोगांविरुद्ध वेळीच लसीकरण करून घेणे अतिशय फायद्याचे ठरते.

शेळीपालक शक्‍यतो अतिरिक्त खर्च किंवा अशा रोगांच्या प्रसार व संहारकतेबद्दल माहिती नसल्याने लसीकरण करणे टाळतो; पण प्रतिजनावर लसीकरणासाठी (शासकीय पशुवैद्यकीयमार्फत) येणारा वार्षिक खर्च ५० रुपयांपेक्षा पेक्षा जास्त येत नाही.

लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्यास रोगामुळे आपल्या गोठ्यातील फक्त एक शेळी, करडू अथवा बोकड दगावल्यास कमीत कमी ४ ते ५ हजार रुपयांचे नुकसान होऊ शकते. लसीकरण करणे फायदेशीर शेळीपालनासाठी नवसंजीवनी देणारी गोष्ट आहे.

लसीकरण करताना घ्यावयाची काळजी

  • लसीकरण फक्त निरोगी जनावरांना करावे.
  • रोग झाल्यावर आजारी जनावरांमध्ये त्या रोगाचे लसीकरण करणे टाळावे.
  • लसीकरण नवीन सुईचा वापर करून करावे किंवा लसीकरण करण्याअगोदर सुई व सीरींज पाण्यात उकळून घ्याव्यात.
  • लसीकरण शक्‍यतो सकाळी किंवा संध्याकाळी उष्णतेचे प्रमाण कमी असताना करावे; जेणेकरून जनावरावर लसीकरणाचा ताण येणार नाही.
  • लसीकरण हे शक्‍यतो तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने, लस बनविलेल्या कंपनीने दिलेल्या नियमपद्धतीनेच करावे.
  • लस दिल्यावर ती व्यवस्थित चोळावी व गाठ किंवा जनावरामध्ये काही अपायकारक गोष्ट आढळल्यास पशुवैद्यकाच्या निदर्शनात आणावे.
  • लस टोचण्याअगोदर ती वापरण्याची अंतिम तारीख तपासावी. बर्फातून किंवा कंपनी निर्देशानुसार लसीची ने-आण व साठवणूक करावी.
  • एकाच जनावराला लसीकरण एकपेक्षा जास्त लसींनी करावयाचे असेल, तर प्रत्येक प्रकारच्या वेगवेगळ्या लसीकरणामध्ये कमीत कमी १४ ते २१ दिवसांचे अंतर असल्यास चांगला फायदा होतो.
  • लसीकरण करण्याअगोदर ८-१० दिवस शेळ्यांना जंतनाशक पाजावे; जेणेकरून लसीचा परिणाम उत्तमोत्तम होण्यास मदत होते.
  • लसीकरणाचा कार्यक्रम वाड्या-वस्त्यांवरील सर्व शेळ्यांमध्ये एकाच वेळी राबविल्यास लसींची मात्रा वाया न जाता एखाद्या रोगाचे  मुळापासून उच्चाटन करता येऊ शकते. त्यामुळे एखाद्या परिसरात एकाच वेळी लसीकरण राबविणे कधीही उत्तम.

शेळ्यांसाठी लसीकरणाचे वेळापत्रक

आजाराचे नाव  लस केव्हा टोचावी  दोन लसीमधले
अंतर 
लस देण्याची
वेळ
पहिला डोस दुसरा डोस
आंत्रविषार
Enterotoximia (ETU)
३ महिने वय असताना पहिल्या डोसनंतर १५ ते २१ दिवसानंतर
दुसरा डोस आवश्‍यक (३-४ आठवड्यानंतर)
६ महिने/ प्रतिवर्ष  मे-जून
घटसर्प Haemorrhegic
Septicemia (HS) 
३ महिने वय असताना पहिल्या डोसनंतर ३-४ आठवडे अंतराने   ६ महिने/ प्रतिवर्ष   पावसाळ्यापूर्वी
पी.पी.आर  ३ महिने वय असताना आवश्‍यक नाही   दर ३ वर्षाला  एप्रिल - मे
लाळ-खुरकुत (FMD) ३ महिने वय असताना पहिल्या डोसनंतर ३-४ आठवड्यानंतर ६ महिने / प्रतिवर्ष नोव्हेंबर
देवी (Goat Pox) ३-५ महिने वय असताना  पहिल्या डोसनंतर
१ महिन्यानंतर
 प्रति वर्ष          -----
धर्नुवात * (T.T.) ३-५ महिने वय असताना           ----  प्रति वर्ष       -----

टीप ः लसीकरण पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावे.
संदर्भ ः CIRG, Makhdoom, UP, * शेड्युल्ड (CIRG) मध्ये समाविष्ट नाही.

संपर्क : डॉ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५
(पशुअनुवंश व पशुपैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

 

 

इतर अॅग्रो विशेष
उठलेला बाजारसंसदेचे आणि राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन...
न्यायाच्या प्रतीक्षेत आदिवासी शेतकरी राज्यातील आदिवासी भागात लाखो शेतकरी आपल्या...
तूर, हरभरा खरेदीचे तीनतेरापुणे : राज्यात यंदाच्या हंगामात (२०१७-१८)  ...
सरकारी खरेदीच्या खेळखंडोब्यामुळे...पुणे : आधारभूत किमतीने शेतमाल खरेदीचा...
विदर्भात पोचली ‘एचटी’ची पाकिटे?नागपूर : गेल्या हंगामात पुरवठा झालेल्या अनधिकृत ‘...
तूर खरेदीत कर्नाटकची महाराष्ट्रावर आघाडीपुणे : तूर खरेदीच्या बाबतीत महाराष्ट्र...
राज्य सहकारी संघ पदाधिकारी निवडणूक...पुणे  : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ...
सरकारी खरेदीतील अडथळे दूर करण्यासाठी...राज्यात गेल्या वर्षी खरेदी केलेली तूर...
गोदाम नसल्यामुळे शेतीमाल खरेदीला ब्रेकराज्य सरकारने `नाफेड` या नोडल एजन्सीच्या...
शासकीय खरेदीचे दुखणे अन् भावांतराची...राज्यात यंदा खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांतील...
उत्पादकता निकषामुळे तूर उत्पादकांना...नगर ः आधारभूत किमतीने तुरीची खरेदी करण्यासाठी...
शेतीमाल खरेदीतील भ्रष्टाचार रोखणे आवश्यकपुणे : सरकारने हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी...
तत्काळ चुकाऱ्याची केवळ घोषणाचअकोला ः या हंगामात हमीभावाने सुरू असलेली खरेदी...
तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्यात मंगळवारपासून बहुतांशी ठिकाणी...
अन्नदात्यासाठी राज्यभरात ‘अन्नत्याग’पुणे ः राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येचा...
कृषिसेवक परीक्षा संशयास्पद; विद्यार्थी...पुणे : कृषिसेवक पदाच्या ९०३ जागांसाठी राज्यात...
उसाला निर्यातक्षम केळीची जोडसांगली जिल्ह्यातील तुंग हा उसाचा हुकमी पट्टा. या...
जगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणीपुणे : निर्यातीत युरोपीय देशांप्रमाणे अन्य...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी :...नवी दिल्ली  : २०१९ मध्ये सत्तेत आल्यास...