परसबागेतील कुक्कुटपालनासाठी वनराज कोंबड्या

वनराज कोंबड्या देशी कोंबडीच्या तुलनेत अधिक मांस व अंडी देतात.
वनराज कोंबड्या देशी कोंबडीच्या तुलनेत अधिक मांस व अंडी देतात.

सर्व प्रकारच्या वातावरणात सहजरीत्या वाढू शकणाऱ्या आणि अंडी आणि मांस या दुहेरी उत्पादनासाठी वनराज ही कोंबड्यांची जात उपयुक्त आहे. ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात परसबागेमध्ये कमीत कमी खर्चामध्ये वनराज कोंबड्यांचे संगोपन हा व्यवसायाचा उत्तम पर्याय ठरू शकतो. परसातील कुक्कुटपालन करताना मजूर आणि भांडवल कमी लागते. परसातील कुक्कुटपालनामध्ये सरासरी १० ते २० कोंबड्या पाळल्या जातात. देशातील विविध कुक्कुटपालन संशोधन केंद्रांनी स्थानिक व विदेशी जातींपासून अनेक संकरित जातींच्या कोंबड्यांची निर्मिती परसातील कुक्कुटपालनासाठी केली आहे. या संस्थांनी गिरिराज, वनराजा, कॅरी निर्भिक, सुवर्णधारा व श्रीनिधी या जाती विकसित केलेल्या आहेत. या जाती अंडी व मांस उत्पादनासाठी उपयुक्त आहेत. परसबागेत व्यावसायिकदृष्ट्या कुक्कुटपालनाकरिता देशी व विदेशी कोंबड्यांचा संकर करून बहुरंगी जात विकसित केली अाहे. यापैकी वनराज ही जात कुक्कुटपालन प्रकल्प संचालनालय, हैदराबाद यांच्यातर्फे विकसित करण्यात आली आहे.

  • आकर्षक पिसारा असलेल्या अंडी अाणि मांस अशा दुहेरी हेतूसाठी या कोंबड्यांचे संगोपन करता येते. सामान्य रोगांच्या विरोधात उत्तम प्रतिकारशक्ती आणि मुक्तपणे संगोपनासाठी जुळवून घेण्यास सक्षम अशी ही जात आहे. परसबागेतील व्यवस्थापनात देशी कोंबडीच्या तुलनेत अधिक मांस व अंडी देतात.
  • परसातील उपलब्ध (किडे, धान्य, वनस्पती, टाकाऊ भाज्या इत्यादी.) खाद्यावरच या कोंबड्या आपल्या अन्नाची ७० टक्के गरज भागवतात. सोबत १०-२० ग्रॅम प्रतिपक्षी पूरक आहार दिल्यास वयाच्या सहाव्या आठवड्यात ६५० ते ७५० ग्रॅम वजन होते.
  • सहा ते साडेसहा महिन्यांच्या परिपक्व कोंबडीचे वजन साधारणतः २.२ ते २.५ किलोपर्यंत असते.
  • वयाच्या सहाव्या महिन्यापासून अंडी देण्यास सुरवात करते. एका अंडी चक्रामध्ये सरासरी ५० ग्रॅम वजनाचे ११०-१३० अंडी घालते.
  • अंड्याचा रंग तपकिरी असतो.
  • काटक शरीर, मजबूत पंख अाणि पायामुळे हे पक्षी उडण्यास सक्षम असल्यामुळे या कोंबड्या स्वतःचे संरक्षण करू शकतात.
  • मोठ्या संख्येने व्यापारी तत्त्वावर वनराजा जातीचे संगोपन करण्यासाठी एका दिवसाची पिले चार आठवडे वयापर्यंत ब्रूडर पद्धतीने सांभाळावीत.
  • चार आठवड्यानंतर कोंबड्यांना शेडमध्ये, परसात मोकळया जागेत सोडले तरी चालते. सुरवातीच्या काळात कोंबड्यांना संध्याकाळी पिंजऱ्यापर्यंत येण्याची सवय लावावी.
  • मुक्तपणे नैसर्गिक आहार घेत असल्यामुळे परोपजीवी जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे दर २ ते ३ महिन्यांनी कोंबड्यांना जंतनाशकाची मात्रा द्यावी. ६ महिन्यांच्या अंतराने रानीखेत या रोगांची लस द्यावी. एक मात्रा उन्हाळा सुरू होण्यापूर्वी दिल्यास अंडी उत्पादन अधिक मिळण्यास मदत होते.
  • वनराजा कोंबड्यांची देशी कोंबड्यांच्या तुलनेत वैशिष्ट्ये

    अ. क्र विवरण वनराजा देशी कोंबडी
    शरीराचे वजन (ग्रॅम
      १ दिवसाचे पिलू ३५ ते ४० २५ ते ३०
      ६ आठवडे वय ६५० ते ७५० २५ ते ३०
      लैंगिक परिपक्वता २००० ते २२०० १३०० ते १५००
    अंड्याचे वजन (ग्रॅम
      वय २८ आठवडे ४८ ते ५० २८ ते ३५
      वय ४० आठवडे ५२ ते ५८ २८ ते ३५
    पहिल्यांदा अंडी देन्याचे वय (दिवस) १७५ ते १८० २२०
    वार्षिक अंडी उत्पादन ११० ते १३० ८० ते ९०
    मरतुकीचे प्रमाण (टक्के) १०
    मांस उत्पादन(टक्के) ७२ ६४

    संपर्क ः डॉ. विवेक खंडाईत, ९४२१७०६०४० (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com