शहरी भागात रूजतेय व्हर्टिकल फार्मिंग

 व्हर्टिकल फार्मिंगमध्ये भाजीपाला लागवडीचा प्रयोग
व्हर्टिकल फार्मिंगमध्ये भाजीपाला लागवडीचा प्रयोग

कॅनडामधील एका कंपनीने शहरी लोकांची बाग कामाची आवड लक्षात घेऊन व्हर्टिकल फार्मिंगला चालना दिली आहे. ओंटारिओ भागातील एका स्वयंसेवी संस्थेने सायन्स सिटीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर व्हर्टिकल फार्मिंगची सुरवात केली. व्हर्टिकल फार्मिंगबाबत ‘लोकल ग्रो सलाड‘ या संस्थेचे अध्यक्ष झेल टबाकमन म्हणाले की, या उपक्रमातून लोकांना पीक लागवड आणि व्यवस्थापनाबाबतच्या आवडीला चालना मिळणार आहे. शहरी भागात मोठ्या इमारतींच्या बांधकामामुळे बागकामाची आवड असणाऱ्या लोकांना भाजीपाला लागवडीची संधी मिळत नाही. परंतु, व्हर्टिकल फार्मिंगच्या माध्यमातून आम्ही काही प्रमाणात भाजीपाला लागवडीस सुरवात केली आहे. आम्ही सध्या चेरी टोमॅटो, पालक, रोमिनी, काकडी, स्टॉबेरी, पालेभाज्यांची लागवड करीत आहोत. या माध्यमातून उपक्रमात सहभागी असलेल्या लोकांना दररोज ताजा भाजीपाला उपलब्ध होणार आहे. या उपक्रमासाठी परिसरातील लोकांचा चांगला सहभाग मिळतो आहे. यात सहभागी झालेले लोक भाजीपाला लागवड, व्यवस्थापन आणि काढणी करणार आहेत. त्यामुळे मजुरांची आम्हाला गरज नाही. सध्या दोन हजार चौरस फूट क्षेत्रावर आम्ही हा प्रकल्प उभारलेला आहे. उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करून भाजीपाला उत्पादन घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही येत्या काळात भाजीपाला उत्पादनाच्या बरोबरीने ताजा भाजीपाला पॅकिंग करून ग्राहकाला देणार आहोत. या पॅकिंगमध्ये विविध भाजीपाल्याचे मिश्रण असणार आहे. या रेडी-टू- इच प्रकारच्या सॅलेडला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com