Agriculture story in Marathi, verticle farming | Agrowon

शहरी भागात रूजतेय व्हर्टिकल फार्मिंग
वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

कॅनडामधील एका कंपनीने शहरी लोकांची बाग कामाची आवड लक्षात घेऊन व्हर्टिकल फार्मिंगला चालना दिली आहे. ओंटारिओ भागातील एका स्वयंसेवी संस्थेने सायन्स सिटीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर व्हर्टिकल फार्मिंगची सुरवात केली.

कॅनडामधील एका कंपनीने शहरी लोकांची बाग कामाची आवड लक्षात घेऊन व्हर्टिकल फार्मिंगला चालना दिली आहे. ओंटारिओ भागातील एका स्वयंसेवी संस्थेने सायन्स सिटीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर व्हर्टिकल फार्मिंगची सुरवात केली.

व्हर्टिकल फार्मिंगबाबत ‘लोकल ग्रो सलाड‘ या संस्थेचे अध्यक्ष झेल टबाकमन म्हणाले की, या उपक्रमातून लोकांना पीक लागवड आणि व्यवस्थापनाबाबतच्या आवडीला चालना मिळणार आहे. शहरी भागात मोठ्या इमारतींच्या बांधकामामुळे बागकामाची आवड असणाऱ्या लोकांना भाजीपाला लागवडीची संधी मिळत नाही. परंतु, व्हर्टिकल फार्मिंगच्या माध्यमातून आम्ही काही प्रमाणात भाजीपाला लागवडीस सुरवात केली आहे.

आम्ही सध्या चेरी टोमॅटो, पालक, रोमिनी, काकडी, स्टॉबेरी, पालेभाज्यांची लागवड करीत आहोत. या माध्यमातून उपक्रमात सहभागी असलेल्या लोकांना दररोज ताजा भाजीपाला उपलब्ध होणार आहे. या उपक्रमासाठी परिसरातील लोकांचा चांगला सहभाग मिळतो आहे. यात सहभागी झालेले लोक भाजीपाला लागवड, व्यवस्थापन आणि काढणी करणार आहेत. त्यामुळे मजुरांची आम्हाला गरज नाही. सध्या दोन हजार चौरस फूट क्षेत्रावर आम्ही हा प्रकल्प उभारलेला आहे.

उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करून भाजीपाला उत्पादन घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही येत्या काळात भाजीपाला उत्पादनाच्या बरोबरीने ताजा भाजीपाला पॅकिंग करून ग्राहकाला देणार आहोत. या पॅकिंगमध्ये विविध भाजीपाल्याचे मिश्रण असणार आहे. या रेडी-टू- इच प्रकारच्या सॅलेडला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे.
 

टॅग्स

इतर टेक्नोवन
खरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...
जलशुद्धीकरणासाठी सूर्यप्रकाशावर आधारीत...सूर्यप्रकाशाच्या साह्याने पाण्याचे शुद्धीकरण...
उपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचनाएसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला...
शालेय विद्यार्थी झाले कृषी संशोधकजळगावात जैन हिल्स येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘...
साठवणुकीसाठी प्री फॅब्रिकेटेड गोदाम,...शेतमालाची योग्य गुणवत्ता जपण्यासाठी योग्य साठवणूक...
दिवस-रात्रीच्या तापमान फरकातूनही मिळवता...कमाल आणि किमान तापमानातील बदलाद्वारे विद्युत...
पवनचक्क्यांची झीज कमी करणारे नवे...वातावरणातील विविध घटकांचा परिणाम होऊन...
शहरात व्हर्टिकल फार्मिंग रुजवण्यासाठी...कॅनडामधील लोकल ग्रोस सलाड या स्वयंसेवी संस्थेने...
हवेच्या शुद्धीकरणासाठीही इनडोअर वनस्पती...वाढत्या शहरीकरणासोबतच प्रदूषणाची समस्याही वेगाने...
आंब्यावरील प्रक्रिया अन् साठवणआंबा हा कच्च्या आणि पिकलेल्या दोन्ही स्वरुपामध्ये...
संजयभाई टिलवा यांनी तयार केले...भुईमुगाच्या शेंगा जमिनीतून काढणीसाठी मजूर मोठ्या...
शेवाळाची शेती हेच ठरेल भविष्यभविष्यामध्ये आहार, जैव इंधन, जागतिक पातळीवरील...
सेन्सर छोटे, कार्य मोठे!इटली येथील युनिव्हर्सिटी ऑफ बारो अल्दो मोरोमधील...
आंबा रस आटविण्यासाठी गॅसिफायरकोकणात अजूनही आंबा आटवण्यासाठी चुलीमध्ये लाकडाचा...
कलिंगडापासून विविध पदार्थनिर्मितीउन्हाळ्यामध्ये कलिंगड हे फळ उत्तम मानले जाते....
योग्य पद्धतीने होईल खेकड्यांचे फॅटनिंगखेकड्यांचे फॅटनिंग करण्यासाठी तलावातील संवर्धन,...
सेन्सरद्वारे तापमान, आर्द्रता, कार्बन...काटेकोर शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
कल्पनेतून केली अडचणींवर मातजगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक...
परागीकरण करणारा रोबोजगभरात फळांची मागणी वाढत असल्याने विविध देशांत...
हळकुंडावरील प्रक्रियेसाठी यंत्रेकोणत्याही भारतीय स्वयंपाकामध्ये हळदीचा वापर होत...