agriculture story in marathi, water management of different rabi field crops | Agrowon

पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजन
अंबादास मेहेत्रे, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. एस. एच.पठाण
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

पिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक सूर्यप्रकाश, सुयोग्य मशागत, अधिक उत्पादनक्षमता असलेल्या जाती, खते व पाणी या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. त्यातील पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केल्यास अधिक उत्पादन मिळवता येते.

पिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक सूर्यप्रकाश, सुयोग्य मशागत, अधिक उत्पादनक्षमता असलेल्या जाती, खते व पाणी या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. त्यातील पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केल्यास अधिक उत्पादन मिळवता येते.

पाण्याशिवाय वनस्पती फार काळ जिवंत राहू शकत नाही. प्रत्येक पिकांची पाण्याची गरज ठरावीक असते. ती सर्वसाधारणपणे पीक, जमिनीचा प्रकार, पिकांच्या वाढीची अवस्था व हंगाम याप्रमाणे बदलत असते. या वर्षी पाऊसमान कमी राहिल्याने बहुतांश विभागातील विहिरीतील पाण्याची पातळी कमी आहे. अनेकांनी शेततळ्याचे नियोजन केलेले असले तरी पाण्याचा साठाही मर्यादित आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व काटेकोर वापर करणे आवश्यक आहे. त्यातून कमी पाण्यातही चांगले उत्पादन मिळवणे शक्य होऊ शकते.
पिकासाठी पाण्याची नेमकी किती आवश्यकता असते त्यानुसार उपलब्ध पाण्याच्या किती पाळ्या मिळू शकतात, यानुसार रब्बी हंगामामध्ये पिकाची निवड करणे अपेक्षित असते. उदा. हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, मोहरी, गहू, सूर्यफूल

पीकवाढीनुसार पाण्याचे नियोजन

 • वनस्पती पाणी मुळाद्वारे उचलतात, त्यामुळे जमीन ओलावताना मुळाच्या वाढीप्रमाणे तेवढ्याच खोलीचे पाणी पिकास देणे फायद्याचे असते.
 • मुळांच्या वाढीपेक्षा जास्त खोलवर दिलेले पाणी हे पिकांच्या दृष्टीने अनुत्पादक आणि जमिनीच्या दृष्टीने अपायकारक ठरते.
 • पिकांच्या सुरवातीच्या अवस्थेमध्ये कमी खोलीचे पाणी द्यावे. पिकाच्या वाढीनुसार पाण्याची खोली वाढवावी. या पद्धतीमुळे पाणी दिल्यास पाण्यामध्ये मोठी बचत होते.
 • सर्वसाधारणपणे रोप अवस्थेत सर्वच पिकांची पाण्याची गरज कमी असते. पुढे हळूहळू ती वाढत जाते. त्यानंतर पीक पक्व होण्याच्या अवस्थेत पाण्याची गरज कमी होते.
 • पाणी देण्याची वेळ ठरविताना जमिनीतील ओलावा आणि पिकांच्या पाण्यास संवेदनशील अवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे.

पिकांच्या संवेदनशील अवस्थेत
पाणी देण्याची वेळ

 • पिकाच्या पाण्याच्या संवेदनशील अवस्था वेगवेगळ्या असतात. या अवस्थेत पाण्याचा ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. मात्र, पाण्याची उपलब्धता कमी असल्यास सर्वच संवेदनशील अवस्थेतही पाणी देणे शक्य होत नाही. अशा वेळी  नियोजन करताना कोणत्या अवस्था अत्यंत संवेदनशील आहेत, हे जाणून घ्यावे. त्यानुसार पाण्याचे नियोजन करावे. त्यामुळे चांगले उत्पादन मिळू शकते.
 • एक किंवा दोन पाणी उपलब्ध असतील, तर ते पिकांच्या नाजूक अवस्थेत द्यावे. उदा. रोपावस्था, फुलोऱ्यात किंवा दाणे भरताना.

पाणी देण्याच्या पद्धती

 • उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून घेण्यासाठी पाणी योग्य पद्धतीचा अवलंब करावा.
 • शेतकरी बऱ्याच पिकांना मोकाट पद्धतीने पाणी देतात. या पद्धतीत आपण पिकांऐवजी संपूर्ण शेताला पाणी देत असतो. त्यात पाण्याचा अपव्यय होतो. शिवाय जमिनीची धूप होते. जमिनीचा पोत खराब होतो. शेतात तणाचे प्रमाण वाढते.
 • निरनिराळ्या पिकांना शास्त्रीय पद्धतीचा वापर करून पाणी द्यावे. परिणामी उपलब्ध पाण्यात जास्त क्षेत्र भिजवता येते. पिकांचे व जमिनीचे नुकसान न होता अधिक उत्पादन मिळू शकते.
 • सारे पद्धत : गहू, मोहरी, ज्वारी, हरभरा
 • वाफे पद्धत : सूर्यफूल , मोहरी, ज्वारी, हरभरा
 • सरी वरंबा पद्धत : करडई, सूर्यफूल    
 • रुंद वाफे : करडई, हरभरा
 • सरी वरंबा: (दोन ओळींनंतर सरीतून पाणी देणे), करडई, हरभरा
पीक एकूण पाण्याची गरज
(सेंमी/हे.) 
एकूण
पाळ्या 
दोन पाळ्यांतील
अंतर (दिवस)
गहू  ४५-६० ५-६  १५-१८
रब्बी ज्वारी  ३५-४० ३-४ २०-२५
हरभरा ३०-४०    ३  २०-२५
मोहरी  ३०-३५  ३-४ २०-२५
करडई ४०-४५ ३०
सूर्यफूल ४०-६० ४-५  २०

अंबादास मेहेत्रे, ९५४५३२३९०६ 
डॉ. एस. एच. पठाण, ८१४९८३५९७०
(कृषी विद्या विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...