तीन हंगामात दर्जेदार कलिंगड उत्पादनात हातखंडा 

कलिंगडात हातखंडा पाटील बंधूनीकलिंगड पिकात हातखंडा तयार केला आहे. तीन हंगामात कलिंगड घेत त्यांनी बाजारपेठेत आपल्या कलिंगडाचे नावही कमावले आहे.पपईची पाच ते सहा एकरात, कांद्याची १० एकर, मिरचीची पाच ते सहा एकरांवर त्यांची लागवड असते
पाटील बंधूंनी उत्पादीत केलेल्या कलिंगडाची वाहतूक करताना मजूर
पाटील बंधूंनी उत्पादीत केलेल्या कलिंगडाची वाहतूक करताना मजूर

रजाळे (ता.जि.नंदुरबार) येथील कैलास, संजय व नगराज या पाटील बंधूंनी वषर्भरातील तीन हंगामात कलिंगड घेण्याची पीकपध्दती यशस्वी केली आहे. रमजान, नवरात्र व उन्हाळी हंगाम या काळातील कलिंगडाची मागणी त्यांनी लक्षात घेतली. त्यानुसार सुधारीत तंत्राद्वारे लागवडीचे व विक्रीचे नियोजन केले.  आज व्यापाऱ्यांमध्ये पाटील बंधूंच्या कलिंगडाने वेगळी ओळख तयार केली आहे.  नंदूरबार शहरापासून काही किलोमीटरवर असलेल्या रजाळे येथे संजय, कैलास व नागराज हे पाटील बंधू राहतात. त्यांची सुमारे ४५ एकर शेती आहे. त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. हलकी ते मध्यम स्वरुपाची जमीन या भागात आहे. पावसाळा काही वेळेस जोरदार स्वरुपाचा असतो. यामुळे कापसाचे पीक अनेकदा वाया गेल्याचे प्रकार या भागात घडले आहेत. पाटील बंधू कापूस घेत नाहीत. कलिंगड हे त्यांचे हुकमी पीक  आहे. त्यासोबत पपई, कांदा, मिरची यांचीही लागवड ते करतात. चार विहिरी व एक कूपनलिका आहे. पाऊस चांगला झाला तर जलस्त्रोत टिकून असतात. यंदा कमी पावसामुळे उन्हाळ्यात पिके घेणे त्यांना शक्‍य झाले नाही.  कलिंगड शेतीचे नियोजन 

  • पाटील बंधूंनी कलिंगड शेतीत सातत्य टिकवले आहे. 
  • हलक्‍या व मध्यम स्वरुपाच्या जमिनीत ते लागवड करतात. 
  • तीन हंगामात होते लागवड-  हंगाम

  • एप्रिल-मे- पीक कालावधी ७० दिवस
  • क्षेत्र- ४ ते ५ एकर
  • उद्दीष्ट रमजान सणासाठी
  • दर- ८ ते १० रू.
  • जुलै- पीक कालावधी ७० दिवस
  • नवरात्रीसाठी
  • दर-  १२ ते १५ रू    
  • डिसेंबर-  पीक कालावधी- ८० ते ९० दिवस   
  • क्षेत्र-  ते ८ एकर 
  •  उन्हाळी हंगामातील मागणीनुसार 
  • दर- ७ ते ८ रू. (प्रति किलो) 
  • उत्पादन तीनही हंगामातील १५ ते २५, ३० टनांपर्यंत (एकरी) 
  • दर- तुलनेने नवरात्रीत अधिक 
  • मल्चिंगचा झाला फायदा  एकदा पावसाळा जास्त होता. कलिंगड संवेदनशील पीक असल्याने रोपांच्या वाढीवर परिणाम झाला.  पीक वाया गेल्याचीच स्थिती होती. यामुळे पाटील उंच गादीवाफा व मल्चिंग तंत्रज्ञानाकडे वळले. मल्चिंगमुशे उन्हाळ्यात व ऑक्‍टोबरमध्ये तापमान नियंत्रित राहते. वाफसा कायम राहतो. यामुळे पाण्याची बचत होते असा अनुभव त्यांनी घेतला आहे.  व्यवस्थापनातील ठळक बाबी 

  • शक्यतो निचऱ्यची जमीन चांगली असे पाटील सांगतात. 
  • शेणखत दरवर्षी एकरी तीन ट्रॉली. ते खरेदी केले जाते. 
  • पावसाळी लागवड करताना जोरदार पावसाचा अंदाज घेऊन पावसापूर्वीच मशागत 
  • रोटाव्हेटर व ट्रॅक्‍टरचलित यंत्राद्वारे गादीवाफे बनवून घेतात. 
  • दोन गादीवाफ्यांमधील अंतर सात फूट. वाफ्याची उंची दीड फूट तर रुंदी तीन मीटर 
  • गादीवाफ्यात रासायनिक खताचा बेसल डोस 
  • ठिबक वापरून त्यावर त्वरित मल्चिंग पेपर अंथरून घेतात. 
  • गादीवाफ्यावर एका ओळीत कलिंगडाच्या बिया दीड फूट अंतरावर लावल्या जातात. 
  • विद्राव्य खतांच्या मात्रा निर्देशानुसार 
  • यंदाची स्थिती यंदा दुष्काळी स्थितीमुळे कलिंगडाचा दुसरा हंगाम साधणे कदाचित शक्य होणार नसल्याचे पाटील सांगतात.  विक्री व्यवस्था  काढणी जशी सुरू होईल त्यापूर्वीच व्यापाऱ्यांच्या संपर्कात पाटील असतात. दर व्यवस्थित मिळतील यासंबंधी ते बाजाराचा अंदाज घेतात. बेटावद (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील व्यापाऱ्यांना सद्यःस्थितीत विक्री केली जात आहे. व्यापारी बांधावर येऊन खरेदी करतात. त्यामुळे बाजारपेठेत जाण्याची गरज पडत नाही. साधारण तीन दिवसांत संपूर्ण चार ते पाच एकरांतील कलिंगडाची काढणी होते. प्रतवारीवर भर दिला जातो. कारण त्यानुसारच दर हाती पडतात.  मिळालेले दर (किलोचे) 

  • मागील वर्षी जुलै व जानेवारीतील लागवड- १६ रु. 
  • यंदा जुलै लागवड- १५ रू. दर अखेरपर्यंत मिळाला. 
  • अन्य पिकांतही हातखंडा  पाटील बंधूंकडे मोठा व छोटा ट्रॅक्‍टर आहे. कलिंगडाव्यतिरिक्त अन्य पिकांतही त्यांचा हातखंडा आहे. पपईची पाच ते सहा एकरात, कांद्याची १० एकर, मिरचीची पाच ते सहा एकरांवर त्यांची लागवड असते. उर्वरित तृणधान्यही असते. पपईचे एकरी ३० टनांपर्यंत तर मिरचीचे हिरवी व ओली मिळून एकरी २० टनांवर उत्पादन घेण्यात येते. पपईची विक्री शिंदखेडा (जि. धुळे) व नंदुरबार भागातील व्यापाऱ्यांना तर मिरचीची विक्री नंदूरबार बाजार समितीत होते. यंदा कांद्याची काढणी ऑक्‍टोबरपूर्वीच झाली. तेव्हा दर टिकून होते. त्यामुळे दरांचा लाभ मिळाला. कमी पाण्यात व कमी कालावधीत येणाऱ्या पिकांना पसंती दिली जाते. पाण्याचा काटेकोर वापर होण्याच्या दृष्टीने सुधारित तंत्रज्ञानावर भर देण्याचा संकल्प पाटील बंधूंनी केला आहे.  संपर्क- संजय पाटील-९९२१६७२०७४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com