Agriculture story in marathi, weekly grape advisary | Agrowon

भुरी, पिंक बेरीकडे लक्ष द्या...
डॉ. एस. डी. सावंत
गुरुवार, 3 जानेवारी 2019

मागील आठवड्यापासून सर्व द्राक्ष विभागांत थंडीची लाट आहे. येत्या आठवड्यात सर्व द्राक्ष विभागात वातावरण निरभ्र राहणार असल्यामुळे थंडीची लाट कायम राहणार आहे. तलाव, नदी तसेच कालव्याच्या काठावरील बागांमध्ये जेथे खेळती हवा फार कमी आहे अशा ठिकाणी पहाटेचे तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः नाशिक विभागात रविवारपर्यंत बऱ्याच ठिकाणी तापमान कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीपासून बागेचे संरक्षण कसे करता येईल याकडे लक्ष द्यावे.

मागील आठवड्यापासून सर्व द्राक्ष विभागांत थंडीची लाट आहे. येत्या आठवड्यात सर्व द्राक्ष विभागात वातावरण निरभ्र राहणार असल्यामुळे थंडीची लाट कायम राहणार आहे. तलाव, नदी तसेच कालव्याच्या काठावरील बागांमध्ये जेथे खेळती हवा फार कमी आहे अशा ठिकाणी पहाटेचे तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः नाशिक विभागात रविवारपर्यंत बऱ्याच ठिकाणी तापमान कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीपासून बागेचे संरक्षण कसे करता येईल याकडे लक्ष द्यावे.

  • मागील आठवड्यात दिलेल्या सल्याप्रमाणे बागेच्या जवळपासच्या भागात पहाटे शेकोटी पेटवावी. पानातून होणाऱ्या बाष्पीभवनाच्या वेगाच्या प्रमाणात बागेमध्ये किती पाणी द्यायचे हे ठरवावे.
  • कायटोसॅन २ ते ३ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून घडावर फवारावे.
  • सिलिसिक ॲसिड (उपलब्ध सिलिकॉन) फॉर्म्युलेशननुसार योग्य प्रमाणात फवारणे आवश्यक आहे.

भुरीचे नियंत्रण ः
अति थंडीच्या वातावरणामध्ये बागेमध्ये कोणताही रोग सहजासहजी वाढणार नाही. परंतु ज्या ठिकाणी दुपारी भरपूर सूर्यप्रकाश असल्यास या वेळी तापमान २० ते २५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून जास्त वाढण्याची शक्यता असते. जास्त कॅनॉपी असलेल्या बागांमध्ये हळूहळू भुरी वाढण्याची शक्यता असते. सध्याच्या काळात भुरीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसत नाही. परंतू दुर्लक्ष केल्यास जस जसे तापमान वाढत जाते तस तसा भुरीचा प्रादुर्भाव दिसू लागतो.

पिंक बेरी नियंत्रण ः
बऱ्याच बागांमध्ये पिंक बेरीच्या नियंत्रणासाठी घडावर कागद लावण्याचे काम सुरू झाले आहे. घडावर कागद लावण्या अगोदर भुरीचे योग्य नियंत्रण करून पेपर लावावा. एखादी सल्फरची फवारणी (दीड ग्रॅम प्रतिलिटर पाणी) किंवा त्या पाठोपाठ जैविक नियंत्रणासाठी ॲम्पिलोमायसीस क्विसकॅलिस (८ ते १० मिलि प्रतिलिटर पाणी) किंवा ट्रायकोडर्मा (५ मिलि प्रतिलिटर पाणी) किंवा बॅसिलस सबटिलिस (२ते ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) याची फवारणी घेऊनच द्राक्ष घडांवर पेपर लावावा.
सध्याच्या वातावरणामध्ये सल्फर व ॲम्पिलोमायसीसच्या फवारण्या आलटून पालटून ज्या बागांमध्ये झालेल्या होत्या त्या सर्व बागांमध्ये भुरीचे चांगले नियंत्रण झाले असल्याची माहिती सर्व द्राक्ष विभागातून मिळत आहे. फळ छाटणीनंतरच्या ५५ दिवसांनंतर आंतरप्रवाही बुरशीनाशकाची एकही फवारणी न करता फक्त सल्फर आणि जैविक नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीच्या योग्य वापराने भुरीचे चांगले नियंत्रण मिळविणे शक्य आहे. हे या परिणामात दिसत आहे. याची बागायतदारांनी नोंद घ्यावी. झीरो रेडिस्यू द्राक्ष निर्मितीसाठी या नियोजनाचा चांगला फायदा बागायतदारांना होणार आहे.
 

इतर कृषी सल्ला
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
शास्त्रीय पद्धतीनेच व्हावेत जल...गावातील पाण्याचे स्रोत ज्या भागात आहेत, त्या...
शेतजमिनीतील चिकणमातीच्या प्रकारानुसार...हलक्या आणि कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता...
कोरडवाहू शेतीतील समस्या जाणून...राज्यात एकूण शेत जमिनीपैकी १८ टक्के जमीन बागायत...
कांदा व लसूण व्यवस्थापन सल्लारांगडा कांद्याची काढणी झालेली असून, रब्बी...
उसाच्या जोमदार वाढीसाठी गंधक फायदेशीरनत्र, स्फुरद आणि पालाशच्या जोडीला गंधकाच्या...
जिवाणू खत वापरायचे की जिवाणूंचे अन्न...अलीकडे रासायनिक खतांच्या वापरासोबतच जिवाणू...
पीक सल्ला : सूर्यफूल, कांदा, मका, लसूण...सूर्यफूल ः पीक ११० दिवसांमध्ये तयार होते. पाने,...
सिंचनासाठी क्षारयुक्त पाण्याचे...सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे जमिनीच्या...
जैविक कीड रोग नियंत्रणासाठी भू...एकात्मिक कीड नियंत्रणाच्या अनेक पद्धती असल्या तरी...
लक्षात घ्या विभागनिहाय परिस्थिती...जमीन आणि पावसाचा विचार करता एकाच जिल्ह्यात...
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी फेरोमोन...रासायनिक कीडनाशकांना किटक प्रतिकारक होत असून,...