भुरीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष द्या...

द्राक्षावरील भुरी
द्राक्षावरील भुरी

सर्व द्राक्ष विभागात पुढील आठवड्यात आकाश निरभ्र राहून दिवसभर चांगला सूर्यप्रकाश मिळेल. या आठवड्यात देखील थंडीची लाट राहिल. दुपारचे तापमान ३० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त राहील. याचबरोबरीने पहाटेचे तापमान १० अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.

  • वातावरणात जास्त आर्द्रता नसल्यामुळे भुरीची वाढ जास्त वेगाने होण्याची शक्यता नाही.
  • सध्याच्या काळात पांढऱ्या जातीच्या द्राक्ष बागांमध्ये जर मण्यात पाणी भरायला सुरवात होत असेल तर बागेमध्ये पिंक बेरी वाढण्याची शक्यता आहे.
  • ज्या ठिकाणी थंडी जास्त आहे अशा ठिकाणच्या टेबल ग्रेप्सच्या बागांमध्ये सर्वसाधारणपणे घडांवर कागद लावला जातो. अशा बागांमध्ये कागद लावण्याअगोदर मण्यांवर सल्फरची (२ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी किंवा जैविक नियंत्रणासाठी ॲम्पिलोमायसीस क्विसकॅलिस (८ ते १० मिलि प्रति लिटर) किंवा ट्रायकोडर्मा (५ ग्रॅम किंवा मिलि प्रतिलिटर पाणी) यापैकी जैविक घटकाची फवारणी करावी.
  • बागेत भुरीचा प्रादुर्भाव दिसत असल्यास आणि गेल्या पाच ते सहा दिवसांत सल्फरची फवारणी झाली नसल्यास करून घ्यावी. या फवारणीमुळे भुरी आणि लाल कोळी नियंत्रणासाठी फायदा होतो.
  • थंडीच्या पासून संरक्षण करण्यासाठी मागील आठवड्यात दिलेल्या सल्याप्रमाणे बागेचे व्यवस्थापन ठेवावे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com