आठवडाभर ढगाळ हवामान, काही ठिकाणी उघडीप

अाठवड्याचे हवामान
अाठवड्याचे हवामान

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्य महाराष्ट्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे मराठवाडा परिसर वगळून उर्वरित महाराष्ट्रात हलक्‍या स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. संपूर्ण आठवडाभर हवामान ढगाळ राहील. असे हवामान पिकांवर कीड अाणि रोगांच्या प्रादुर्भावात वाढ होण्यास अनुकूल राहील. तसेच मानवी रोग जसे, स्वाइन फ्लू, डेंगी, चिकून गुनिया या रोगांच्या प्रमाणात वाढ होण्यास अनुकूल राहील. २ सप्टेंबर रोजी हवेचे वाढते दाब उत्तरेकडे सरकतील. गुजरात व मध्य प्रदेशवर १००६ हेप्टापास्कल तर मध्य व दक्षिण महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल आणि पावसाचे प्रमाण अत्यल्प राहील. राजस्थानवर १००४ संपूर्ण उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि संपूर्ण हिमालयाच्या पायथ्याशी १००५ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे त्या भागात नैऋत्य माॅन्सून सक्रिय राहील. संपूर्ण हिमालयाच्या पायथ्याशी माॅन्सून अद्याप काही काळ राहण्याची शक्‍यता असल्याने ईशान्य माॅन्सून किंवा परतीचा माॅन्सून सुरू होण्यास वेळ लागेल. ३ सप्टेंबर रोजी संपूर्ण गुजरात व मध्य प्रदेशवर १००६ हेप्टापास्कल तर महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे पावसाचे प्रमाण अत्यल्प राहील. ४ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र ते दक्षिण महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे पाऊस थांबेल; पावसात उघडीप होईल. ५ सप्टेंबर रोजी गुजरात, मध्य प्रदेशवर १००८ हेप्टापास्कल तर उत्तर महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे पावसात उघडीप राहील. ६ सप्टेंबर रोजी उत्तर व दक्षिण महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब वाढेल तेव्हा पाऊस थांबेल आणि उघडीप जाणवेल.

कोकण रत्नागिरी, ठाणे, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अत्यल्प पावसाची शक्‍यता राहील. पावसाचे प्रमाण प्रतिदिनी २ ते ३ मिलिमीटर राहील. रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील तर ठाणे जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९३ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६९ ते ७७ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील आणि रायगड व ठाणे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र नाशिक व जळगाव जिल्ह्यात अत्यल्प पावसाची शक्‍यता राहील तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यात पावसात उघडीप राहील व खंडाची सुरुवात होईल. जळगाव जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १३ किलोमीटर राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. तर जळगाव व धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील तर जळगाव व नंदूरबार जिल्ह्यात किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९० टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७४ टक्के राहील.

मराठवाडा मराठवाड्यात पावसात खंड राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. उस्मानाबाद व जालना जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १४ किलोमीटर राहील. हिंगोली जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १३ किलोमीटर राहील. उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील. खंडाचा कालावधी आठवड्यापेक्षा अधिक राहील. उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यात कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. तर लातूर जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील व हिंगोली जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, जालना, बीड, औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. बीड, परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता नांदेड व परभणी जिल्ह्यात ६२ टक्के तर उर्वरित जिल्ह्यात ५० ते ५४ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यात २ ते ३ मिलिमीटर इतक्‍या अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अकोला व वाशिम जिल्ह्यात ताशी ८ किलोमीटर तर सिंधुदुर्ग व अमरावती जिल्ह्यात ताशी ११ ते १२ किलोमीटर राहील. वाशिम व अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८८ टक्के राहील.

मध्य विदर्भ मध्य विदर्भात २ ते ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान २९ ते २४ अंश सेल्सिअस राहील. सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९४ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७५ टक्के राहील.

पूर्व विदर्भ भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात या आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात ८ ते १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात ३ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ किलोमीटर राहील. गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित जिल्ह्यात ते ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९५ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८५ टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र नगर जिल्ह्यात पावसात खंड असेल. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात आठवड्याच्या सुरुवातीस ३ ते ६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. सांगली, कोल्हापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १० ते १३ किलोमीटर राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस राहील. सांगली व अहमदनगर जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस आणि उर्वरित जिल्ह्यात २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८५ टक्के राहील; तर दुपारीच सापेक्ष आर्द्रता ५० ते ८५ टक्के राहील.   कृषी सल्ला

  • काढणीस आलेल्या उडदाच्या शेंगा, मुगाच्या शेंगा तोडून काढणी करावी. काठीने बडवून दाणे वेगळे करून उन्हात वाळवावेत.
  • काढणीस आलेल्या घेवड्याची काढणी करून उन्हात वाळवून बुडवून दाणे उफणून वेगळे करून उन्हात वाळवावेत.
  • रब्बी ज्वारी लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी. कुळवाच्या पाळ्या देऊन जमिनीतील काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी.
  • जमिनीची बांधबंदिस्ती करावी.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com