agriculture story in marathi, weekly weather advisary | Agrowon

परतीच्या माॅन्सूनसाठी हवामान घटक अनुकूल
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

दक्षिण कोकण व दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढणार असून मध्य, उत्तर व पूर्व महाराष्ट्र म्हणजेच उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रापासून पूर्वेस व दक्षिणेस हवेचा दाब १००८ हेप्टापास्कल इतका वाढेल, तेव्हा हवामान ढगाळ राहील आणि विदर्भात व कोकणात अत्यल्प पावसाची शक्‍यता तर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र व पश्‍चिम महाराष्ट्रात पावसात उघडीप राहील.

दक्षिण कोकण व दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढणार असून मध्य, उत्तर व पूर्व महाराष्ट्र म्हणजेच उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रापासून पूर्वेस व दक्षिणेस हवेचा दाब १००८ हेप्टापास्कल इतका वाढेल, तेव्हा हवामान ढगाळ राहील आणि विदर्भात व कोकणात अत्यल्प पावसाची शक्‍यता तर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र व पश्‍चिम महाराष्ट्रात पावसात उघडीप राहील. उत्तर भारतातील काश्मीरचा भाग, पंजाब व हरियानाचा भाग तसेच उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीम या भागांवर केवळ १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे त्या भागात मध्य स्वरूपात पावसाची शक्‍यता राहील. याचाच अर्थ असा की अद्यापही त्या भागात नैऋत्य माॅन्सून सुरूच राहील. तीच स्थिती ओरिसा भागात राहील. बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे हळूहळू नैऋत्य मॉन्सूनचा प्रभाव कमी होत जाईल. मात्र ही स्थिती पुढे आणखी बदलेल. ९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल आणि महाराष्ट्रातील पाऊस थांबेल तर १० सप्टेंबर रोजी उत्तर दक्षिण दिशेने महाराष्ट्राच्या पूर्व भागावर १००८ तर पश्‍चिम भागावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्या वेळी महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात कोकणासह पाऊस थांबेल.

उत्तर भारतात हवेचे दाब वाढण्यास सुरुवात होत आहे. राजस्थान, काश्मीर भागावर १००६ हेप्टापास्कल तसेच हिमालयाच्या पायथ्यासही तितकाच हवेचा दाब राहील. एकूणच नैऋत्य माॅन्सून वारे नैऋत्येकडून वाहण्याचे थांबतील तेव्हा राजस्थानमधेही पाऊस थांबेल आणि ईशान्य माॅन्सूनचा काळ सुरू होण्यास हवामान घटक म्हणजेच हवेचे दाब अनुकूल बनतील. सूर्याचे दक्षिणायन सुरू होईल आणि परतीच्या माॅन्सूनसाठी पावसाळी हवामान घटक अनुकूल बनतील. ती स्थिती १५ सप्टेंबरपर्यंत येईल.

कोकण
कोकणातील नैऋत्य माॅन्सून पाऊस थांबण्याच्या मार्गावर असून या आठवड्यात संपूर्ण कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहील. वाऱ्याची दिशा या आठवड्यात नैऋत्येकडूनच राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिदिनी ४ मिलिमीटर तर ठाणे, रायगड व पालघर या जिल्ह्यात प्रतिदिनी केवळ २ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर इतका कमी होईल. कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान ठाणे जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस आणि उर्वरित सिंधुदुर्ग, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आद्रता ९४ टक्के तर उर्वरीत रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात ८२ ते ८३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७२ टक्के राहील. दुपारी हवामान कोरडे राहील.

उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यात विशेष करून पाऊस थांबेल व पावसात उघडीप जाणवेल. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडूनच राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील तर जळगाव व धुळे जिल्ह्यात कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ९१ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ६३ टक्के राहील.

मराठवाडा
या आठवड्यात संपूर्ण मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पावसात उघडीप राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात या आठवड्यात वाऱ्याची दिशा बदलत असून, ती वायव्येकडून सुरू होईल. याचाच अर्थ असा की, मराठवाड्यात नैऋत्य मॉन्सून थांबून ईशान्य मॉन्सून सुरू होण्यास हवामान घटक अनुकूल बनत आहेत. त्यामुळे वाऱ्याच्या दिशेतही बदल होईल. वाऱ्याचा ताशी वेग सर्वसाधारणच राहील. उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील तर जालना जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. उर्वरीत लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. लातूर, बीड व जालना जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील तर नांदेड जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जालना जिल्ह्यात ९१ टक्के तर उस्मानाबाद जिल्ह्यात ७९ टक्के राहील. तसेच उर्वरीत जिल्ह्यात ती ८२ ते ८८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५६ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ
पश्‍चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण काही दिवशी २ ते ९ मिलिमीटर इतके अल्प राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरीत जिल्ह्यात कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वाशिम जिल्ह्यात ८३ टक्के राहील. बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ५७ टक्के राहील.

मध्य विदर्भ
वर्धा जिल्ह्यात पावसात उघडीप राहील, तर नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात काही दिवशी २ मिलिमीटर इतक्‍या अल्प पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १० किलोमीटर राहील. नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर वर्धा जिल्ह्यात ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७४ टक्के तर दुपारची ४८ ते ५१ टक्के राहील.

पूर्व विदर्भ
गोंदिया जिल्ह्यात पावसात उघडीप राहील. उर्वरीत चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात अत्यल्प २ ते ३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडूनच राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ किलोमीटर राहील. गोंदिया जिल्ह्यात कमी तर चंद्रपूर जिल्ह्यात अधिक वाऱ्याचा वेग असेल. गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरीत सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर गडचिरोली जिल्ह्यात ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष अार्द्रता ७४ ते ७५ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५२ टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
सांगली व सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भागात काही दिवशी २ ते ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून उर्वरीत जिल्ह्यात पावसात पूर्णपणे उघडीप राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील तर सोलापूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर सांगली व पुणे जिल्ह्यात ते २९ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस आणि उर्वरीत सर्वच जिल्ह्यात ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष अार्द्रता ८१ ते ९४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ७८ टक्के राहील.
 
कृषी सल्ला

  • खरीप हंगामातील उडीद, मूग, चवळी, कुळीथ, मटकी इत्यादी पिकांच्या शेंगा तोडून उन्हात वाळवून काठीने बडवून दाणे मोकळे करून उफणून उन्हात वाळवावेत.
  • रब्बी ज्वारी पेरणीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी. हेक्‍टरी ६.५ टन चांगले कुजलेले शेणखत विस्कटून कुळवाची पाळी देऊन जमिनीत मिसळावे.
  • करडई पेरणीसाठी जमिनीची मशागत करावी. बियाणे, खते अाणि जिवाणू संवर्धके अाणून ठेवावीत.
  • ऊस, हळद, आले पिकांना पाणी द्यावे.
  • बाजीपाला पिकांची रोपे तयार करावीत.
  • कांदा रोपांची लागवड करावी.

 
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर अॅग्रो विशेष
अवीट  गोडीच्या मेहरुणी बोरांनी दिला...खानदेशची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे...
महाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद  : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...
राज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे   : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...
सहकाराचा ऱ्हास घातकचसहकार क्षेत्राचे राजकीयीकरण झाल्याने सहकाराचा...
कांदा कोंडीवर उपाय काय?कांद्याचे कोठार असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या...
`कार्यक्षम पाणी वापरात शेतकऱ्यांचे...औरंगाबाद  : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून...
मुंबई बाजार समितीत सेवा शुल्कवसुली...मुंबई  : मुंबई बाजार समितीतील सेवा...
अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३८५ कोटींचे...मुंबई  : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी...
राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...मुंबई  : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत...
राज्यातील ७४ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी...पुणे   : राज्यातील ७४ साखर कारखान्यांनी...
कांदा अनुदानाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : या वर्षात कमी दराचा फटका बसलेल्या...
काळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...
सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...
बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...
कृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...
सांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...
राजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...
थंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...
इराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...
आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...