agriculture story in marathi, weekly weather advisary | Agrowon

अाठवड्यात सर्वत्र कमी-अधिक पावसाची शक्यता
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील, तर मराठवाडा व विदर्भावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्‍यता आहे. नाशिकच्या जवळ हवेचे दाब आणखी कमी होणे शक्‍य आहे. ईशान्य भारतावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे ईशान्य मॉन्सूनचा जोर वाढण्यास उपयुक्त ठरेल. या आठवड्यात कोकण तसेच घाटमाथा भागात व पालघर तसेच नंदूरबार जिल्ह्यातही पावसाची शक्‍यता आहे. अरबी समुद्रात तयार होणारे वादळ पश्‍चिम दिशेस जाईल. त्या वादळाचा प्रभाव राजस्थान, मध्य प्रदेश या भागातही पाऊस होण्यात होईल.

महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील, तर मराठवाडा व विदर्भावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्‍यता आहे. नाशिकच्या जवळ हवेचे दाब आणखी कमी होणे शक्‍य आहे. ईशान्य भारतावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे ईशान्य मॉन्सूनचा जोर वाढण्यास उपयुक्त ठरेल. या आठवड्यात कोकण तसेच घाटमाथा भागात व पालघर तसेच नंदूरबार जिल्ह्यातही पावसाची शक्‍यता आहे. अरबी समुद्रात तयार होणारे वादळ पश्‍चिम दिशेस जाईल. त्या वादळाचा प्रभाव राजस्थान, मध्य प्रदेश या भागातही पाऊस होण्यात होईल. याच काळात दक्षिण भारतातही विशेषतः केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगाना भागातही पाऊस होण्यात होईल.

७ ऑक्‍टोबर रोजी पश्‍चिम किनारपट्टीवरील हवेच्या दाबात थोडी वाढ होऊन तो १०१० हेप्टापास्कल इतका वाढेल; आणि तो संपूर्ण महाराष्ट्रावर समान राहील. ८ ऑक्‍टोबर रोजी हवेच्या दाबाच्या स्थितीत बदल होणार नाही, तसेच ९ ऑक्‍टोबर रोजी तितकाच हवेचा दाब राहील. मात्र १० ऑक्‍टोबर रोजी कच्छ आणि उत्तर महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे त्या भागात पावसाचा जोर राहील. तसेच मुंबई, ठाणे व त्यापुढील सर्व पूर्वेकडील भागावर तितकाच हवेचा दाब राहण्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातही पावसाचे प्रमाण वाढेल. तसेच रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, नंदूरबार भागात पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. त्याचदिवशी म्हणजे १० ऑक्‍टोबर रोजी मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्‍यता आहे. सध्या भारतीय हवामान शास्त्र विभागाने गुजरात, मध्य प्रदेशचा पश्‍चिम भाग, राजस्थान, पंजाब, हरियाना या प्रदेशातून मॉन्सून परतला असल्याचे म्हटले असले, तरी अरबी समुद्रातील वादळाच्या प्रभावाने गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानच्या भागातही या आठवड्यात पावसाची शक्‍यता आहे. मॉन्सूनची वाटचाल महाराष्ट्रात सुरू असून, या आठवड्यात आणि पुढील आठवड्याच्या सुरवातीपर्यंत काही भागात पाऊस होईल.

कोकण
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवशी १६ मिलिमीटर तर रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवशी २२ मिलिमीटर तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत प्रत्येकी ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, वाऱ्याची दिशा प्रामुख्याने अाग्नेयेकडून राहील. ठाणे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील तर ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ८४ ते ८९ टक्के राहील, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ६७ ते ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५२ टक्के इतकी कमी राहील.

उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता कमी असली तरी काही भागांत ईशान्य मॉन्सूनचा पाऊस होणे शक्‍य आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळेही काही पश्‍चिमीकडील भाकगात पाऊस होणे शक्‍य आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने अाग्नेयेकडून राहील, तर जळगाव जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेगक ७ ते ९ किलोमीटर राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान जळगाव जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील आणि उर्वरित जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५३ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३४ टक्के राहील, त्यामुळे हवामान कोरडे राहील.

मराठवाडा
उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांत ३ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, उर्वरित सर्वच जिल्ह्यांतही अल्पशा अथवा अधूनमधून जोरदार पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा अाग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते १२ किलोमीटर राहील. बीड जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस इतके वाढेल. त्यामुळे ऑक्‍टोबर हीट जाणवेल. जालना जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील, तर औरंगाबाद जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ८३ टक्के इतकी राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ३० ते ३९ टक्के इतकी राहील, तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४७ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ
पश्‍चिम विदर्भात अकोला व वाशीम जिल्ह्यांत २ मिलिमीटर तर बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ६ ते ७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. बुलडाणा जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत अाग्नेयेकडून व ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ किलोमीटर राहील. अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील, तर अमरावती जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्ह्यात किमान तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४२ टक्के राहील, त्यामुळे हवामान कोरडे राहील.

मध्य विदर्भ
मध्य विदर्भात २ ते ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ६ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ त ८५ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ३८ टक्के राहील.

पूर्व विदर्भ
पूर्व विदर्भात २ ते ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा गोंदिया व भंडारा जिल्ह्यात ईशान्येकडून राहील, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अाग्नेयकडून राहील, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ किलोमीटर राहील. चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस आणि गोंदिया जिल्ह्यात ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८४ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ४० टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, सांगली जिल्ह्याचे काही भागांत २२ मिलिमीटर व सातारा जिल्ह्यात २० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागात १५ मिलिमीटर पावसाचटी शक्‍यता असून, सोलापूर जिल्ह्यात ६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. नगर जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा अाग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ताशी १४ किलोमीटर राहील, तर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० किलोमीटर राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ९ किलोमीटर राहील. कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर नगर व सांगली जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील तर नगर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८६ टक्के राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ६९ टक्के राहील. सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३९ ते ४५ टक्के राहील.

कृषी सल्ला

  • पावसात उघडीप होताच सोयाबीन, बाजरी पिके परिपक्व झाली असल्यास काढणी करून मळणी करून धान्य उन्हात वाळवून साठवण करावी.
  • जेथे चांगला पाऊस झाला आहे आणि जमिनीत ६५ मि.मी. इतका ओलावा झाला आहे, तेथे वापसा येताच पेरणी करावी.
  • कांदा रोपांची वाफ्यात लागवड करावी.
  • टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, कोबी या भाजीपाला पिकाची रोपे तयार असल्यास बागायत क्षेत्रात लागवड करावी.
  • पूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी शेताची पूर्व मशागत करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...