agriculture story in marathi, weekly weather advisary | Agrowon

अाठवड्याच्या उत्तरार्धात पावसाची शक्यता
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

महाराष्ट्रासह दक्षिण व उत्तर भारतावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार असून, हा हवेचा दाब चांगला पाऊस होण्यासाठी अनकूल नाही. जोपर्यंत हवेचा दाब कमी होत नाहीत, तोपर्यंत पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होणार नाही. १४ ऑक्‍टोबर रोजी हवेच्या दाबात वाढ होत असून, पावसासाठी तो अनकूल नाही. १५ ऑक्‍टोबर रोजी हवेचा दाब १०१४ हेप्टापास्कल आणि १६ ऑक्‍टोबर रोजी तितकाच हवेचा दाब राहण्यामुळे पावसासाठी वातावरण अनुकूल नाही. १७ ऑक्‍टोबर रोजी पुन्हा हवेचे दाब कमी होत असून, तो १०१२ हेप्टापास्कल राहील. मात्र त्यामुळे वातावरणात बदल जाणवतील.

महाराष्ट्रासह दक्षिण व उत्तर भारतावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार असून, हा हवेचा दाब चांगला पाऊस होण्यासाठी अनकूल नाही. जोपर्यंत हवेचा दाब कमी होत नाहीत, तोपर्यंत पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होणार नाही. १४ ऑक्‍टोबर रोजी हवेच्या दाबात वाढ होत असून, पावसासाठी तो अनकूल नाही. १५ ऑक्‍टोबर रोजी हवेचा दाब १०१४ हेप्टापास्कल आणि १६ ऑक्‍टोबर रोजी तितकाच हवेचा दाब राहण्यामुळे पावसासाठी वातावरण अनुकूल नाही. १७ ऑक्‍टोबर रोजी पुन्हा हवेचे दाब कमी होत असून, तो १०१२ हेप्टापास्कल राहील. मात्र त्यामुळे वातावरणात बदल जाणवतील. महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर आणि दक्षिणेकडील भागावर ढगाळ हवामान राहील. १८ ते २० ऑक्‍टोबरला कोकणात पावसाची शक्‍यता निर्माण होईल. अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल तसेच हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमानही २८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यातून अरबी समुद्रात भावी काळात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे शक्‍य आहे. त्यातून चक्रीवादळाची निर्मिती शक्‍य आहे.

या आठवड्यात सकाळचे वातावरण थंड तर दुपारचे उष्ण असे राहील. बाष्पीभवनाचा वेग वाढेल. दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी राहील तर सकाळी धुके काही भागांत जाणवेल. जेव्हा सकाळी धुके जाणवेल तेव्हा पिकांवर कीड, रोगाचा प्रादुर्भाव जाणवेल. वाऱ्याचा वेग सामान्यच राहील. या पुढील काळात बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रातही हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होणे शक्‍य असून, त्यातून काही भागात या अाठवड्याच्या उत्तरार्धात म्हणजेच १८ ते २१ अाॅक्टोबरदरम्यान पाऊस होणे शक्‍य आहे. मात्र गेल्या महिनाभरातील हवामान स्थिती पाहता आणि पावसाचे प्रमाण पाहता, महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पाण्याची टंचाई निर्माण होणे शक्‍य आहे. त्यासाठी आत्तापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करणे तसेच ठिबक सिंचन प्रणालीचा वापर वाढवणे गरजेचे ठरणार आहे. विदर्भातील बुलडाणा, मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, पुणे व नगर जिल्ह्यांचा पूर्वभाग जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतही भविष्यात पिण्याच्या पाण्याचे प्रश्‍न निर्माण होणे शक्‍य आहे.

कोकण
कोकणात या आठवड्यात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्‍यता असून, रायगड व ठाणे जिल्ह्यांत पावसात उघडीप राहील. मात्र, आणखी काही दिवसांत संपूर्ण कोकणीत व सह्याद्री पर्वताचे घाटमाथ्यावर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. कमाल तापमानात वाढ होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढेल, तर रत्नागिरी जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ठाणे जिल्ह्यात, किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील, तर रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ टक्के राहील, तर ठाणे व रायगड जिल्ह्यात ५७ ते ६६ टक्के राहील. तसेच सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६१ टक्के राहील, तर ठाणे व रायगड जिल्ह्यांत ती ३१ ते ३५ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील.

उत्तर महाराष्ट्र
महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ७ किलोमीटर इतका कमी राहील. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअस राहील, तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ते २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे जिल्ह्यात ४५ टक्के तर नाशिक, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ते ५० ते ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २७ टक्के राहील, त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील.

मराठवाडा
मराठवाड्यात या आठवड्यात पावसाची शक्‍यता नाही. परभणी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अाग्नेयेकडून राहील. लातूर व नांदेड जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. उस्मानाबाद, बीड, हिंगोली, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. बीड जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ किलोमीटर राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किलोमीटर राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. नांदेड जिल्ह्यात ते ३३ अंश सेल्सिअस राहील, तर लातूर व जालना जिल्ह्यांत ते ३४ अंश सेल्सिअस राहील. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद व बीड जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. बीड, परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील, तर उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. नांदेड जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६२ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता लातूर व नांदेड जिल्ह्यांत ३२ ते ३७ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २९ टक्के राहील. दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील.

पश्‍चिम विदर्भ
पश्‍चिम विदर्भात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० किलोमीटर राहील. बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. अमरावती जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील, तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ८५ टक्के राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ७५ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता अमरावती जिल्ह्यात ३३ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात २८ ते २९ टक्के राहील.

मध्य विदर्भ
यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, वर्धा जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील, तर वर्धा जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस आणि यवतमाळ जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८२ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २९ ते ३९ टक्के राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. त्यामुळे पाण्याची गरज वाढेल.

पूर्व विदर्भ
पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत २ ते ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. भंडारा व गंदिया जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ६ किलोमीटर राहील, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० किलोमीटर राहील. भंडारा जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील, तर चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस, तर उर्वरित जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८९ टक्के, तर दुपारची २५ ते ४१ टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता असून, उर्वरित जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता नाही वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० किलोमीटर राहील. सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत किमान तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अशं सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील, तर सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. तसेच पुणे जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील, तर सोलापूर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८० टक्के तर सांगली व सातारा जिल्ह्यात ६२ ते ६३ टक्के राहील. नगर व पुणे जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५३ टक्के राहीलस तर सोलापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४७ टक्के राहील. सोलापूर व नगर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २३ टक्के इतकी कमी राहील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ५७ टक्के राहील, तर सातारा व पुणे जिल्ह्यांत २८ ते ३६ टक्के इतकी कमी राहील.
 
कृषी सल्ला

  • कमाल तापमानात वाढ होत असल्याने दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी होत आहे. अशा काळात बाष्पीभवनाचा वेग वाढतो. आणि खरिपातील पिके लवकर परिपक्व होतात, त्यामुळे खरीप पिकांची काढणी करावी, मळणी करावी.
  • रब्बी हंगामात पाण्याची सोय असल्यास हरभरा पिकाची तसेच बागायत रब्बी ज्वारीची पेरणी करावी.
  • बागायत क्षेत्रात कांदा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी या पिकांची रोपे लावून लागवड करावी.
  • ऊस व फळबागांना ठिबकसिंचनाने पाणी द्यावे.

(ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...