agriculture story in marathi, weekly weather advisary | Agrowon

राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण आणि घाटमाथा या भागापासून पूर्वेस १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू या भागावरही तितकाच हवेचा दाब राहील. पूर्व भारतावर १०१४ हेप्टापास्कल इतका आणि गुरजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि काश्‍मिरच्या व हिमालयाच्या पायथ्यापर्यंतही १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. राजस्थानवर १०१६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे केवळ महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू या भागात पावसाची शक्‍यता राहील.

महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण आणि घाटमाथा या भागापासून पूर्वेस १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू या भागावरही तितकाच हवेचा दाब राहील. पूर्व भारतावर १०१४ हेप्टापास्कल इतका आणि गुरजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि काश्‍मिरच्या व हिमालयाच्या पायथ्यापर्यंतही १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. राजस्थानवर १०१६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे केवळ महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू या भागात पावसाची शक्‍यता राहील. २१ ऑक्‍टोबर रोजी पश्‍चिम किनारपट्टीपासून पूर्वेस हवेचा दाब १०१४ हेप्टापास्कल इतका वाढेल आणि पावसाचे वातावरण विरून जाईल. उत्तर भारतातही हवेचे दाब तितकेच राहतील. संपूर्ण भारतावर २२ ऑक्‍टोबर रोजी १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील त्यामुळे सर्वत्र समान हवेचा दाब राहील. या दिवशी पावसाची शक्‍यता कमी असेल. मात्र वातावरणात बदल जाणवतील. २३ ऑक्‍टोबर रोजी हवेचे दाब १०१४ हेप्टापास्कल महाराष्ट्रासह भारतभर राहील. मात्र हवामान बदल जाणवतील अाणि आकाश तोपर्यंत अंशतः ढगाळ राहील. २४ ऑक्‍टोबर रोजी वातावरण पावसासाठी अनुकूल बनेल. पश्‍चिम किनारपट्टी व संपूर्ण महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होतील आणि ते १०१२ हेप्टापास्कल राहतील. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदीमहासागरावरही हवेचे दाब कमी होतील व ते १०१२ हेप्टापास्कल राहतील.

२० ऑक्‍टोबर रोजी कोकण व मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील भागात पावसाची शक्‍यता आहे. तर २१ अाॅक्टोबर रोजी ठाणे, मुंबई परिसरात पावसाची शक्‍यता आहे. २२ व २३ अाॅक्टोबर रोजी पालघर व नंदूरबार भागात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. २४ ऑक्‍टोबर ते २७ ऑक्‍टोबर या काळात पावसात उघडीप राहणे शक्‍य आहे. बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. अरबी समुद्राच्या पश्‍चिमेकडील भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमानातही वाढ होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ मिलिमीटर, रत्नागिरी जिल्ह्यात २१ मिलिमीटर, रायगड जिल्ह्यात १८ मिलिमीटर तसेच ठाणे व नंदुरबार जिल्ह्यात ५ मिलिमीटर व नाशिक जिल्ह्यात ७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांतही पावसाची शक्‍यता आहे. मराठवाड्यातील नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता असून उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, जालना व औरंगाबाद या जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. याशिवाय पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यांतही अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिम व मध्य विदर्भात पावसाची शक्‍यता नाही.

कोकण
या आठवड्यात सिंधूदुर्ग जिल्ह्यात १४ मिलिमीटर, रत्नागिरी जिल्ह्यात २१ मिलिमीटर, रायगड जिल्ह्यात १८ मिलिमीटर व ठाणे जिल्ह्यात ५ मिलिमीटर काही दिवशी पावसाची शक्‍यता असून कोकणात २३ ऑक्‍टोबरपर्यंत पावसाचे प्रमाण चांगले राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. त्यामुळे दक्षिण कोकणात पावसाचे प्रमाण अधिक तर उत्तर कोकणात ते कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ किलोमीटर राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांत किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ते २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात आकाश अल्पसे ढगाळ राहील. तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांत ते अंशतः ढगाळ राहील. सकाळीच सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ६६ टक्के तसेच रायगड जिल्ह्यात ७७ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र
नाशिक, धुळे व नंदुबरबार जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता आहे. धुळे जिल्ह्यात २ मिलिमीटर, नंदुरबार जिल्ह्यात ५ मिलिमीटर तर नाशिक जिल्ह्यात ७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अल्पशा प्रमाणात ढगाळ राहील. नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६८ टक्के राहील. तर नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ५५ टक्के राहील. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते २७ टक्के राहील. तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ३० ते ३७ टक्के राहील.

मराठवाडा
बीड व नांदेड जिल्ह्यांत ७ ते ८ मिलीमीटर पावसाची शक्‍यता आहे. परभणी जिल्ह्यात ४ मिलिमीटर, उस्मानाबाद, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत २ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. लातूर, हिंगोली जिल्ह्यात १ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. लातूर, नांदेड, बीड व जालना जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील आणि परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ३६ ते ३७ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यांत किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित जिल्ह्यात ते २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

पश्‍चिम विदर्भ
पश्‍चिम विदर्भात पावसाची शक्‍यता नाही. बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. तर वाशीम जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. तर अकोला जिल्ह्यात ते १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

मध्य विदर्भ
मध्य विदर्भात पावसाची शक्‍यता नाही. यवतमाळ जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

पूर्व विदर्भ
चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत २ मिलीमीटर पावसाची शक्‍यता असून भंडारा जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ते १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र
सातारा जिल्ह्यात १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून कोल्हापूर व नगर जिल्ह्यांत १४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. पुणे व सांगली जिल्ह्यांत १२ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. सोलापूर जिल्ह्यात ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व पुणे जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

कृषी सल्ला

  • जमिनीत वापसा अाल्यानंतर हरभरा, करडई अाणि ज्वारीची पेरणी करावी.
  • रब्बी हंगामात या पूर्वी पेरलेल्या पिकात कोळपणी करून तण नियंत्रण करावे.
  • बागायत क्षेत्रात कांदा लागवड पूर्ण करावी.
  • पूर्वहंगामी ऊस पिकाची लागवड करावी.
  • फळबागांना व ऊस पिकास शक्‍यतो ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. ठिबकमधून द्रवरूप खतांचा पुरवठा करावा.

(जेष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर ताज्या घडामोडी
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...
सहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...
मराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...
पणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे  ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...
पुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...
खानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव  ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...
शकूबाईंच्या लढ्याला आले यश;  वनजमीन...वणी, जि. नाशिक  : शेतकरी व आदिवासींच्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद  ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
उन्नत शेती अभियानात १५ दिवसांत १९ लाख...मुंबई : राज्यात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी...
पाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा...अमरावती  ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी...
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी...मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने...
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत...मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना...