agriculture story in marathi, weekly weather advisary | Agrowon

सकाळच्या तापमानात घट, दुपारी कोरडे हवामान
डाॅ. रामचंद्र साबळे
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ओरिसा, या सर्व भागांवर हवेच्या दाबात वाढ होत असून तो १०१६ हेप्टापास्कल इतका वाढेल. याचाच अर्थ असा की, जेव्हा हवेचे दाब वाढतात तेव्हा तापमानात घसरण झालेली असते. त्यामुळे या आठवड्यापासून रात्री व पहाटे हवामान थंड राहील. किमान तापमानात या पुढे घसरण अपेक्षित आहे त्यानुसार किमान तापमान कमी होत असून दुपारी तापमान काही दिवस जाणवेल. मात्र पहाटे व सकाळी हवामान थंड राहील.

महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ओरिसा, या सर्व भागांवर हवेच्या दाबात वाढ होत असून तो १०१६ हेप्टापास्कल इतका वाढेल. याचाच अर्थ असा की, जेव्हा हवेचे दाब वाढतात तेव्हा तापमानात घसरण झालेली असते. त्यामुळे या आठवड्यापासून रात्री व पहाटे हवामान थंड राहील. किमान तापमानात या पुढे घसरण अपेक्षित आहे त्यानुसार किमान तापमान कमी होत असून दुपारी तापमान काही दिवस जाणवेल. मात्र पहाटे व सकाळी हवामान थंड राहील. २८ ऑक्‍टोबर रोजी काश्‍मीर खोऱ्यात हवेचे दाब वाढतील तसेच ते हिमालयाच्या पायथ्यापासून ते बिहार आसाम यावरही वाढतील त्यामुळे या भागात हवामान थंड राहील. २८ ऑक्‍टोबर रोजी काश्‍मीर खोऱ्यात हवेचे दाब वाढतील तसेच ते हिमालयाच्या पायथ्यापासून ते बिहार आसाम यावरही वाढतील त्यामुळे या भागात थंडी सुरू होण्यास अत्यंत अनकूल हवामान बनले असून हिमालयाच्या पायथ्याच्या भागात बर्फवृष्टी सुरू होईल. महाराष्ट्राच्या मध्यापासून उत्तरेकडील भागावर १०१६ हेप्टापास्कल इतके हवेचे दाब राहतील तर दक्षिण कोकणच्या किनारी भागावर हवेचे दाब कमी होऊन ते १०१४ हेप्टापास्कल इतके राहतील. त्यामुळे महाराष्ट्राच्या मध्यापासून उत्तरेकडील भागात हवामान थंड राहील.

गुजरातच्या कच्छ च्या भागावर हवेचे दाब कमी होतील आणि ते १०१४ हेप्टापास्कल इतके राहतील. त्याचवेळी हिंदी महासागर व अरबी समुद्राच्या सीमेवर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. ३० ऑक्‍टोबर रोजी मध्य महाराष्ट्रापासून उत्तरेस १०१४ तर दक्षिण भागावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. उत्तर भारतात हवेचे दाब अधिक राहतील. ३१ ऑक्‍टोबर रोजी संपूर्ण अरबी समुद्राच्या किनारी भागात १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. केरळवर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. आसामवर १०१८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. संपूर्ण अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. हिंदी महासागराच्या काही भगात पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढेल. त्यातून बाष्पीभवनाचा वेग वाढेल आणि ३१ ऑक्‍टोबरपर्यंत पावसासाठी वातावरण तयार होईल.

कोकण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. तर रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत हवामान सकाळी थंड अाणि कोरडे राहील. वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील. ठाणे जिल्ह्यात पूर्वेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किलोमीटर राहील. ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ते २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील तर उर्वरित जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ठाणे व रायगड जिल्ह्यांत ४६ ते ५३ टक्के राहील. तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ६६ ते ७३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष अाद्रर्ता २४ ते २८ टक्के ठाणे व रायगड जिल्ह्यांत राहील तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ४० ते ४७ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र
पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील, नाशिक जिल्ह्यात १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. मात्र नाशिक जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील तर जळगाव व नाशिक जिल्ह्यांत ४० ते ४५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २१ टक्के राहील.

मराठवाडा
पावसाची शक्‍यता नाही. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ८ किलोमीटर राहील तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २ ते ४ किलोमीटर राहील. जेव्हा वाऱ्यास वेग कमी असतो त्या वेळी हवामान स्थिर असते. सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान वाढेल. लातूर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील तर उस्मानाबाद, बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस आणि नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. लातूर व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. अाकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ५० टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आद्रता बीड औरंगाबाद जिल्ह्यात १९ टक्के राहील. तर जालना हिंगोली व परभणी जिल्ह्यांत २१ ते २३ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २६ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ
हवामान कोरडे राहील. पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. तर वाशीम व बुलढाणा जिल्ह्यांत किमान तापमान १८ ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. बुलढाणा व अकोला जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के राहील. अमरावती व वाशीम जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता बुलढाणा जिल्ह्यात २२ टक्के, अमरावती - अकोला जिल्ह्यांत २३ टक्के तर वाशीम जिल्ह्यात २४ टक्के इतकी कमी राहील.

मध्य विदर्भ
मध्य विदर्भात हवामान कोरडे राहील. पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ३ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ६२ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते २८ टक्के राहील.

पूर्व विदर्भ
पूर्व विदर्भात हवामान कोरडे राहील. पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ४ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८ टक्के राहील तर गोंदिया जिल्ह्यात ५३ टक्के राहील आणि गडचिरोली जिल्ह्यात ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता गोंदिया जिल्ह्यात १७ टक्के, भंडारा जिल्ह्यात २१ टक्के राहील. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत ती २३ ते २९ टक्के राहील. हवामान दुपारी कोरडे राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील. सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० ते ११ किलोमीटर राहील. कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ९ किलोमीटर राहील. नगर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ८ किलोमीटर राहील. नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. तर सांगली जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, जालना, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि नगर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ते १९ अंश सेल्सिअस आणि नगर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ४७ टक्के राहील व कोल्हापूर जिल्ह्यात ७० ते ७६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नगर जिल्ह्यात २२ टक्के, पुणे जिल्ह्यात २६ टक्के, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ३० ते ३८ टक्के व कोल्हापूर आणि सांगलीमध्ये ४२ ते ४८ टक्के राहील. दुपारी हवामान कोरडे राहील.

कृषी सल्ला

  • झेंडूची रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी. वर्षभर या फुलांना मागणी असते.
  • पाण्याची उपलब्धता असल्यास लसूणघास, बरसीम, ओट, ज्वारी कडवळ, अफ्रिकन टॉल मका पिकांची चारा पिके म्हणून लागवड करावी.
  • पाण्याच्या दोन पाळ्या देण्याची सोय असल्यास हरभरा पिकाची पेरणी करावी.
  • पाण्याच्या तीन पाळ्या देण्याची सोय असल्यास बागायत ज्वारीची पेरणी, तसेच मोहरीची पेरणी करणे शक्‍य आहे. तर पाच पाण्याच्या पाळ्या देणे शक्‍य असल्यासच गव्हाची पेरणी करावी.
  • फळबागांना ठिबक सिंचनप्रणालीने पाणी व द्रवरूप खते द्यावीत.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नार्इक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर ताज्या घडामोडी
दीड टक्‍क्‍यावर मराठवाड्यातील पाणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प व...
‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’नागपूर ः उन्हामुळे संत्रा उत्पादकांचे झालेल्या...
कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर गुन्हे नोंदवू...सोलापूर : खरीप हंगामात किती शेतकऱ्यांना...
पीकविमा, दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांचा...माळाकोळी,जि.नांदेड : गतवर्षीच्या खरीप पिकांच्या...
बचत गट चळवळ बनली गावासाठी आधारनागठाणे, जि. सातारा : ‘गाव करील ते राव काय करील’...
नगरमध्ये चांगला पाऊस पडेपर्यंत छावण्या...नगर : नगर जिल्ह्यामध्ये ४९८ छावण्या सुरू आहेत....
पुणे : पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्यापुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी...मुंबई  शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
कृषी सहायकांसाठी ग्रामपंचायतीत बैठक...मुंबई : शेतकरी आणि शासन यांच्यातला दुवा...
आकड्यांचा खेळ आणि पोकळ घोषणा : शेतकरी...पुणे ः राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची निराशा झाली...
राज्यावर पावणेपाच लाख कोटींचे कर्जमुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
अर्थसंकल्पावेळी विरोधकांचा सभात्यागमुंबई : अर्थसंकल्प विधिमंडळात सादर...
संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या...नाशिक  : आषाढी एकादशी वारीसाठी संत श्री...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...