agriculture story in marathi, weekly weather advisary | Agrowon

थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. तसेच तितकाच समान हवेचा दाब गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान तसेच कर्नाटक, तेलंगणा या संपूर्ण प्रदेशावरील भागावर राहील. त्यामुळे सध्या या आठवड्याच्या सुरवातीच्या काळात कोणतेही हवामान बदल जाणवणार नाहीत. पूर्व व पश्‍चिम किनारपट्टीच्या उत्तरेकडील भागातही तितकाच हवेचा दाब राहील. हवामान स्थिर राहील. केवळ र्इशान्य भारतावर १०१४ ते १०१६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे तिकडून थंड वारे वाहने सुरू होईल.

महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. तसेच तितकाच समान हवेचा दाब गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान तसेच कर्नाटक, तेलंगणा या संपूर्ण प्रदेशावरील भागावर राहील. त्यामुळे सध्या या आठवड्याच्या सुरवातीच्या काळात कोणतेही हवामान बदल जाणवणार नाहीत. पूर्व व पश्‍चिम किनारपट्टीच्या उत्तरेकडील भागातही तितकाच हवेचा दाब राहील. हवामान स्थिर राहील. केवळ र्इशान्य भारतावर १०१४ ते १०१६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे तिकडून थंड वारे वाहने सुरू होईल. बेळगावपासून व चेन्नईपासून अरबी समुद्रावर व बंगालच्या उपसागरावर तसेच हिंदी महासागराच्या भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून तेथे १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील.

दिनांक १८ नोव्हेंबर रोजी पश्‍चिम किनारपट्टीपासून पूर्वेस १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होईल आणि अरबी समुद्राच्या भागात व हिंदी महासागराच्या भागात तितकाच कमी हवेचा दाब राहील. मात्र सिक्कीम व र्इशान्य भारतावर १०१६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील. थंडी जाणवण्यास सुरवात होईल. १९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रावरील हवेचे दाब वाढून ते १०१२ हेप्टापास्कल इतके होतील. त्यामुळे किमान तापमान जेव्हा हवेचे दाब वाढतील तेव्हा घसरेल. तर संपूर्ण हिमालयाच्या पायथ्याशी व र्इशान्य भारतावर १०१६ ते १०१८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल आणि त्या भागात बर्फवृष्टी होण्याची शक्‍यता असून तिकडून थंड वारे दक्षिण दिशेने वाहतील. त्याचवेळी अरबी समुद्रावरील व हिंदी महासागरावरील हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेस सरकेल. २० नोव्हेंबर रोजी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र विरुन जाण्यास सुरवात होईल व संपूर्ण उत्तर भारतावर १०१८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब वाढून थंडी वाढेल. राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम या भागात थंडीचे प्राबल्य वाढेल. महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र व विदर्भात थंडीचे प्राबल्य वाढण्यास सुरवात होईल तसेच मराठवाड्यातही थंडीचे प्रमाण वाढेल.

संपूर्ण अरबी समुद्रातील व पश्‍चिम हिंदी महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान काही भागात २८ अंश सेल्सिअस तर काही भागात २९ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्याचा परिणाम पश्‍चिम महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात २४ नोव्हेंबरला पाऊस होईल अशी शक्‍यता आहे.

कोकण
कोकमातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८२ टक्के राहील तर ठाणे व रायगड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३६ ते ४३ टक्के राहील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८२ टक्के राहील तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते २९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील. दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दक्षिणेकडील भागात पावसाची शक्‍यता आहे. भात काढणी सुरू असल्यास काळजी घ्यावी.

उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत किमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २९ ते ३६ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

मराठवाडा
औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील तर हिंगोली जिल्ह्यात ते ३६ अंश सेल्सिअस राहील आणि उर्वरित उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी व जालना या सर्वच जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान राहील. हिंगोली जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील, तर नांदेड व बीड जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस आणि उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर जिल्ह्यात ६१ टक्के, उस्मानाबाद, नांदेड व परभणी जिल्ह्यांत ५१ ते ५७ टक्के आणि बीड, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ४३ ते ४८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात २२ ते ३६ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ किलोमीटर राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. त्यामुळे सध्याच्या काळात थंडीचे प्रमाण अल्प राहील.

पश्‍चिम विदर्भ
अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील तर अकोला जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस वाशीम जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस आणि बुलढाणा जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस आणि अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. उर्वरित जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४३ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २३ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे कोरडे हवामान राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत र्इशान्येकडून तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

मध्य विदर्भ
मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहरील. नागपूर जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ते १४ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सरकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ६० टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ किलोमीटर राहील. यवतमाळ जिल्ह्यात वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ती वायव्येकडून राहील.

पूर्व विदर्भ
पूर्व विदर्भातील गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ते ३३ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत किमान तापमान १३ ते १४ अंश सेल्सिअस राहील. तसेच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ते १५ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ४४ टक्के राहील तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ६५ टक्के राहील. गोंदिया जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ टक्के तर उर्वरित जिल्ह्यात २२ ते २६ टक्के इतकी कमी राहील त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र
सातारा व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील तर कोल्हापूर जिल्ह्यात किमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, पुणे जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस तर सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यांत २१ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ४७ टक्के राहील. सातारा व सोलापूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आद्रता ५६ टक्के राहील. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत ३२ ते ३६ टक्के राहील तर उर्वरित जिल्ह्यात २५ ते २९ टक्के राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किलोमीटर राहील तर उर्वरित जिल्ह्यात ७ ते ८ किलोमीटर राहील. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील.
 
कृषी सल्ला

  • कोकणात पाण्याची सोय असल्यास रब्बी भुईमुगाची लागवड करावी. कोकण गौरव या जातीची निवड करावी. हेक्‍टरी १०० किलो बियाणे वापरावे.
  • नवलकोल, कोबी, फ्लॉवर रोपांची लागवड करावी.
  • बागायत क्षेत्रात रब्बी बटाटा, कांदा लागवड करावी.
  • पूर्वहंगामी ऊस पिकात हरभरा, कांदा, कोबी, फ्लॉवर झेंडू या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करावी.
  • जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी लसूणघास - बरसीम या पिकांची लागवड करावी. शक्‍यतो ठिबक सिंचनचा वापर करावा. त्यामुळे पाणी बचत करणे शक्‍य होईल.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर बातम्या
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...