Agriculture story in marathi, weekly weather advisary | Agrowon

ढगाळ हवामानासह थंडीचे प्रमाण मध्यम राहील
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 12 जानेवारी 2019

महाराष्ट्राच्या तसेच कर्नाटक व केरळच्या पश्‍चिम किनारपट्टीवर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील; आणि तेथून पूर्वेकडे पूर्व किनारपट्टीपर्यंत तितकाच हवेचा दाब राहण्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ व तमिळनाडूपर्यंत थंडीचे प्रमाण अधिक राहील. मध्य भारतावर १०१६ तर उत्तर भारतावर १०१८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे वाऱ्याची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे राहील. थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहील. किमान तापमानात फार मोठी घसरण होणार नाही.

महाराष्ट्राच्या तसेच कर्नाटक व केरळच्या पश्‍चिम किनारपट्टीवर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील; आणि तेथून पूर्वेकडे पूर्व किनारपट्टीपर्यंत तितकाच हवेचा दाब राहण्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ व तमिळनाडूपर्यंत थंडीचे प्रमाण अधिक राहील. मध्य भारतावर १०१६ तर उत्तर भारतावर १०१८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे वाऱ्याची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे राहील. थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहील. किमान तापमानात फार मोठी घसरण होणार नाही. मात्र १२ जानेवारी रोजी १०१४ हेप्टापास्कल गुजरात व मध्य महाराष्ट्रावर तर १०१६ हेप्टापास्कल पूर्वभागावर हवेचा दाब राहील आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण मध्यम तर पूर्वेकडे थंडीचे प्रमाण जास्त राहील. राजस्थान, उत्तर प्रदेश, काश्‍मीर, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम या भागावर थंडीचे प्रमाण अधिक राहील. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारे थंड वारे महाराष्ट्रातही थंडीचे प्राबल्य कामय राखतील. १३ जानेवारी रोजी थंडीत पुन्हा वाढ होईल. महाराष्ट्राच्या पूर्व किनाऱ्यावर १०१४ हेप्टापास्कल तर पूर्वेला १०१६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील, त्यामुळे पूर्व महाराष्ट्रात व उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भात थंडी वाढेल. १४ जानेवारी रोजी वाढलेले थंडीचे प्रमाण कायम राहील, कारण गुजरात व मध्य प्रदेशच्या सीमेपासून दक्षिणेस १०१६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल. त्याचाच अर्थ असा, की किमान तापमानात घसरण होईल. जम्मू भागात तसेच संपूर्ण हिमालयाच्या पायथ्याशी किमान तापमानात घसरण होऊन तेथे बर्फवृष्टी अपेक्षित असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा थंडी वाढणे शक्‍य आहे. पुन्हा नाशिक, धुळे, नगर भागांत तापमानात घसरण होणे शक्‍य आहे. १५ जानेवारी रोजी सह्याद्री पर्वत रांगांवर १०१४ तर मध्य प्रदेश सिमेवर १०१६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे थंडीचे प्रमाण कायम राहील. १६ जानेवारी रोजी थंडीचे वाढते प्रमाण कायम राहील. १७ जानेवारी रोजी थंडीच्या प्रमाणात वाढ होईल.

कोकण
ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील, तर रायगड जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. तसेच सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आणि रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः झगाळ राहील. रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९७ टक्के राहील, तर ठाणे जिल्ह्यात ६६ टक्के व रत्नागिरी जिल्ह्यात ५२ टक्के राहील. रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३५ टक्के राहील. तसेच सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत ४१ ते ४७ टक्के राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र
नाशिक व धुळे जिल्ह्यांत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअश राहील तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान ७ अंश सेल्सिअश राहील, तसेच जळगाव जिल्ह्यात १० अंश सेल्सिअस राहील. धुळे जिल्ह्यात ११ अंश आणि नंदुरबार जिल्ह्यात १४ अंश किमान तापमान राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८ टक्के राहील, तर धुळे जिल्ह्यात ८३ टक्के तसेच नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ६५ ते ६७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नाशिक व धुळे जिल्ह्यांत २६ ते २८ टक्के राहील. तसेच नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

मराठवाडा
औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील, तसेच लातूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. बीड जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअश आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस कमाल तापमान राहील. नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. नांदेड जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील, तर लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत किमान तापमान १३ ते १४ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद व परभणी जिल्ह्यांत किमान तापमान १० अंश सेल्सिअस, बीड व जालना जिल्ह्यांत ११ अंश सेल्सिअस राहील व हिंगोली जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. बीड व जालना जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ७६ टक्के राहील. औरंगाबाद व लातूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६४ टक्के राहील. तसेच नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ५१ ते ५८ टक्के राहील. बीड व जालना जिल्ह्यांत दुपारती सापेक्ष आर्द्रता ५२ ते ५३ टक्के राहील. तसेच नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यांत २४ ते २७ टक्के आणि लातूर, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत ३२ ते ३८ टक्के दुपारची सापेक्ष आर्द्रता राहील. वाऱ्याचा ताशी वेग लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत ताशी १५ ते १६ किलोमीटर राहील. तसेच बीड व परभणी जिल्ह्यांत ताशी १२ किलोमीटर, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत १० ते ११ किलोमीटर आणि जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ५ ते ७ किलोमीटर ताशी वाऱ्याचा वेग राहील., वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ
वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील, तर अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वाशीम जिल्ह्यात ७० टक्के तर अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत ८२ ते ८८ टक्के राहील. बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७५ टक्के राहील, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ४५ टक्के राहील. वाऱ्याची ताशी वेग ६ किलोमीटर राहील. वाशीम जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून तर बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

मध्य विदर्भ
वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस तर नागपूर जिल्ह्यात ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा जिल्ह्यात ७८ टक्के तसेच यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ८५ ते ८९ टक्के राहील. वर्धा जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ टक्के राहील, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ती ६५ ते ७० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात आग्नेयेकडून, वर्धा जिल्ह्यात दक्षिणेकडून व नागपूर जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील.

पूर्व विदर्भ
गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर गोंदिया जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान १३ अंश सेल्सिअस तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ते ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८८ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ६८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
सातारा व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर कोल्हापूर, सोलापूर व नगर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस आणि सांगली जिल्ह्यांत ते ३० अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील; तसेच सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ते १३ अंश सेल्सिअस आणि सातारा व पुणे जिल्ह्यांत ते १० ते ११ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहील.आकाश अशतः ढगाळ राहील. पुणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ टक्के व सातारा जिल्ह्यात ८१ टक्के राहील. सांगली व नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७३ टक्के राहील. कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६९ टक्के राहील. सांगली व नगर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते २८ टक्के राहील. उर्वरित कोल्हापूर, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर व सांगली जिल्ह्यांत ११ ते १४ किलोमीटर, तर उर्वरित जिल्ह्यांतोत ५ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
 
कृषी सल्ला

  • बागायत क्षेत्रात १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत ऊस व भुईमुगाची लागवड करावी.
  • ऊस पिकासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करावा.
  • भाजीपाला पिकापैकी भेंडीची लागवड करावी.
  • कलिंगड व खरबूज पिकाची लागवड थंडीचे प्रमाण कमी होताच करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ आणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
 

इतर कृषी सल्ला
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
शास्त्रीय पद्धतीनेच व्हावेत जल...गावातील पाण्याचे स्रोत ज्या भागात आहेत, त्या...
शेतजमिनीतील चिकणमातीच्या प्रकारानुसार...हलक्या आणि कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता...
कोरडवाहू शेतीतील समस्या जाणून...राज्यात एकूण शेत जमिनीपैकी १८ टक्के जमीन बागायत...
कांदा व लसूण व्यवस्थापन सल्लारांगडा कांद्याची काढणी झालेली असून, रब्बी...
उसाच्या जोमदार वाढीसाठी गंधक फायदेशीरनत्र, स्फुरद आणि पालाशच्या जोडीला गंधकाच्या...
जिवाणू खत वापरायचे की जिवाणूंचे अन्न...अलीकडे रासायनिक खतांच्या वापरासोबतच जिवाणू...
पीक सल्ला : सूर्यफूल, कांदा, मका, लसूण...सूर्यफूल ः पीक ११० दिवसांमध्ये तयार होते. पाने,...
सिंचनासाठी क्षारयुक्त पाण्याचे...सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे जमिनीच्या...
जैविक कीड रोग नियंत्रणासाठी भू...एकात्मिक कीड नियंत्रणाच्या अनेक पद्धती असल्या तरी...
लक्षात घ्या विभागनिहाय परिस्थिती...जमीन आणि पावसाचा विचार करता एकाच जिल्ह्यात...
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी फेरोमोन...रासायनिक कीडनाशकांना किटक प्रतिकारक होत असून,...