कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला सुरवात

डॉ. रामचंद्र साबळे
डॉ. रामचंद्र साबळे

महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. याचाच अर्थ असा की किमान व कमाल तापमानात वाढ होईल. उन्हाळी हंगाम सुरू झाल्याचे जाणवेल. सकाळी थंड व दुपारी उष्णता जाणवेल. पूर्णपणे हिवाळा संपलेला नसून तो संपण्याकडे वाटचाल सुरू झालेली असेल. २४ फेब्रुवारी रोजी हवेचे दाब आणखी कमी होतील व हवेचा दाब १०१० हेप्टापास्कलपर्यंत घसरेल. तेव्हा कमाल व किमान तापमानात वाढ झालेली असेल. २५ फेब्रुवारी रोजी हवेचे कमी झालेले दाब कायम राहतील. त्यामुळे तापमानात झालेली वाढ कायम राहील. २६ फेब्रुवारी रोजी हवेचे दाब आणखी कमी होऊन ते १००८ हेप्टापास्कल इतके कमी होतील. त्यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ झालेली असेल. २७ फेब्रुवारी रोजी पूर्व महाराष्ट्रावर १००८ तर पश्‍चिम महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल हवेचा दाब राहील. त्यानुसार तापमानात फरक राहील. पावसाची शक्‍यता नाही. उत्तर भारतात राजस्थानवर २६ व २७ फेब्रुवारी रोजी राजस्थान, पंजाब, हरियाना भागांत पावसाची शक्‍यता आहे. पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश व मध्यप्रदेशवर १०१४ हेप्टापास्कल आणि गुजरातवर तितकाच हवेचा दाब राहण्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होईल. २४ फेब्रुवारी रोजी राजस्थान, पंजाब, हरियानावर १०१२ हेप्टापास्कल तर दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरातवर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होईल तेव्हा थंडी कमी होऊन उन्हाळी हंगाम सुरू झालेला असेल. २५ फेब्रुवारी रोजी १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब उत्तर भारतात राहील. किमान व कमाल तापमान वाढेल. हवेचा दाब होईल. कमाल व किमान तापमान वाढेल. थंडी कमी झालेली असेल. दक्षिण भारतात कर्नाटकावर आंध्र व तेलंगणावर १०१२ हेप्टापास्कल झालेली असेल. दिनांक २४ व २५ फेब्रुवारी रोजी दक्षिण भारतात १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्या वेळी किमान व कमाल तापमान वाढून उन्हाळी हंगाम सुरू झालेला असेल. २६ फेब्रुवारी रोजी तापमानात वाढ होऊन थंडी कमी झालेली असेल. कोकण रायगड जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर ठाणे जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांत कमात तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस, ठाणे जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस आणि सिंधुदूर्ग व रायगड जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ५४ ते ६० टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता याच जिल्ह्यात २७ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून तर उर्वरित जिल्ह्यात अग्येयेकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार जिल्ह्यात ते १४ अंश सेल्सिअस राहील. तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यांत आकाश ढगाळ राहील तर उर्वरित जिल्ह्यात ते निरभ्र राहील. नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ टक्के राहील. धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३५ ते ३९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यांत १९ टक्के, नाशिक व धुळे जिल्ह्यांत २१ टक्के व नंदूरबार जिल्ह्यात २२ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. मराठवाडा जालना जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल. तसेच बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद जिल्ह्यांत ते ३७ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. परभणी जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली व जालना जिल्ह्यांत किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यांत ते १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३४ ते ३६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २१ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ किलोमीटर राहील. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत १० ते १३ किलोमीटर प्रतितास राहील. वाऱ्याची दिशा जालना जिल्ह्यात वायव्येकडून, उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत अग्येयेकडून, लातूर, बीड, परभणी, औरंगाबाद जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २ ते ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिम विदर्भ वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील आणि अमरावती जिल्ह्यात ते ३५ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा व अकोला जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत मात्र किमान तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वाशीम जिल्ह्यात ६० टक्के राहील. तर बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता अकोला जिल्ह्यात २५ टक्के राहील तर उर्वरित जिल्ह्यात ४० ते ४५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. बुलढाणा जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून तर उर्वरित जिल्ह्यात ती र्इशान्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यात १ ते २ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील सर्वच जिल्ह्यात किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८० टक्के दर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलमीटर राहील. यवतमाळ जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत र्इशान्येकडून राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १ ते २ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. पूर्व विदर्भ पूर्व विदर्भात कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. पावसाची शक्‍यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किलोमीटर राहील. भंडारा जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ती अग्नेयेकडून राहील. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील व पुणे जिल्ह्यात ते ३५ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील व नगर जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस व सांगली आणि सातारा जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सोलापूर व नगर जिल्ह्यांत ३५ ते ३८ टक्के तर उर्वरित जिल्ह्यात ४१ ते ५० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १७ ते १९ टक्के राहील. हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ किलोमीटर राहील. सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील व कोल्हापूर आणि नगर जिल्ह्यांत र्इशान्य व नैर्ऋत्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.   कृषी सल्ला

  • ज्या भागात पावसाची शक्‍यता आहे त्याठिकाणी तयार झालेली फळे, भाजीपाला व धान्य पिकांची काढणी करून व भाजीपाला बाजारात पाठवावा. मळणी झालेले धान्य उघड्यावर ठेवू नये.
  • हळद काढणी करून शिजवून ठेवली असल्यास गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावी.
  • नुकसान टाळण्यासाठी फुलांची, अंजीर फळांची काढणी करून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावे.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ आणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नार्इक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com