Agriculture story in marathi, weekly weather advisory | Agrowon

तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, काही भागात उघडीप
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

हिंदी महासागराच्या ५ अक्षांश उत्तर विषुववृत्तीय भागात व ५० ते ८० रेखांशामध्ये तुरळक ठिकाणी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान अल्पसे वाढत आहे. त्यामुळे हा घटक चांगल्या पावसासाठी अनुकूल नाही. एकूणच या आठवड्यात अल्प ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पूर्वभागात होईल.

हिंदी महासागराच्या ५ अक्षांश उत्तर विषुववृत्तीय भागात व ५० ते ८० रेखांशामध्ये तुरळक ठिकाणी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान अल्पसे वाढत आहे. त्यामुळे हा घटक चांगल्या पावसासाठी अनुकूल नाही. एकूणच या आठवड्यात अल्प ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पूर्वभागात होईल.

महाराष्ट्रभर या आठवड्याच्या पहिल्या ३ ते ४ दिवस हवेच्या दाबात वाढ होऊन तो १००८ हेप्टापास्कल होईल. हवेचा दाब ता. २३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत कायम राहील. महाराष्ट्राच्या मध्यावर उत्तर-दक्षिण दिशेने कोकणापर्यंत हवेचा दाब कायम राहील. ता. २८ सप्टेंबर रोजी काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत १००८ हेप्टापास्कल हवेचा दाब होत असून, राजस्थान, उत्तरेकडील काश्मीरच्या भागात मॉन्सून पाऊस थांबेल व या भागातून मॉन्सून परतेल.

महाराष्ट्रातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, सोलापूर, पुणे जिल्ह्याचा पूर्वभाग, सांगली जिल्ह्याचा पूर्वभाग, नगर जिल्ह्याच्या पूर्वभागात पाऊस होईल. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता राहील, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता राहील.

ता. २३ व २४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसात उघडीप राहील. ता. २५ रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. ता. २६ व २७ सप्टेंबर रोजी दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता राहील. तसेच हलक्‍या स्वरूपात पाऊस होईल. पावसाचे प्रमाण अल्प राहील. ता. २९ व ३० सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व दक्षिण महाराष्ट्रात तसेच पूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिम व मध्य विदर्भात अल्पस्वरूपात पावसाची शक्‍यता राहील.

या आठवड्यात ता. २८ सप्टेंबरपासून वाऱ्याच्या दिशेत बदल होईल. तो हवेच्या दाबात बदल होण्यामुळे होईल. वारे वायव्येकडून ईशान्य भारतातून दक्षिण भारताकडे वाहतील. हिंदी महासागर, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यच राहील. हिंदी महासागराच्या ५ अक्षांश उत्तर विषुववृत्तीय भागात व ५० ते ८० रेखांशामध्ये तुरळक ठिकाणी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान अल्पसे वाढत आहे. त्यामुळे हा घटक चांगल्या पावसासाठी अनुकूल नाही. एकूणच या आठवड्यात अल्प ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पूर्वभागात होईल.

कोकण

दक्षिण कोकणात अत्यल्प पावसाची शक्‍यता या आठवड्यातील पहिल्या २ ते ३ दिवस राहील. मात्र आठवडाअखेरीस चांगल्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर कोकणात या आठवड्यात अत्यंत अल्प पावसाची शक्‍यता राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस राहील.

सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील, तर ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस आणि रत्नागिरी जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात पावसाची कमी शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर जळगाव जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १० किलोमीटर राहील. नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. आणि धुळे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्यात काही दिवशी १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. लातूर जिल्ह्यात काही दिवशी १८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील. नांदेड जिल्ह्यात काही दिवशी ८ मिलिमीटर तर बीड जिल्ह्यात ३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा बदलत असून, ती वायव्येकडून राहील. ईशान्य मॉन्सून पावसाला सुरवात होईल. त्यालाच आपण परतीचा मॉन्सून असे संबोधतो.

परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत महिनाअखेरीस पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १२ किलोमीटर राहील. नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यातूनच हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल आणि नांदेडला पाऊस होईल. आकाश अंशतः ढगाळ राहील.

पश्‍चिम विदर्भ

पश्‍चिम विदर्भात पावसाचे प्रमाण अल्पसेच राहील. बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून तर वाशीम जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

कमाल तापमान अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील तर अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

मध्य विदर्भ

मध्य विदर्भात काही दिवशी २ ते ३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ७५ टक्के राहील. परतीचे मॉन्सूनचा पाऊस होईल.

पूर्व विदर्भ

पूर्व विदर्भात काही दिवशी अल्पशी म्हणजे २ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ किलोमीटर इतका कमी राहील. चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात काही दिवशी १६ मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता असून, सांगली व सातारचे पूर्व भागात १० ते ११ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर, पुणे व नगर जिल्ह्यांचे पूर्व भागात ४ मिलिमीटर ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे.

वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील. हा पाऊस परतीचा मॉन्सून पाऊस असेल. सोलापूर व सांगली जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किलोमीटर राहील, तर नगर व पुणे जिल्ह्यांत तो ८ ते ९ किलोमीटर राहील. उर्वरित जिल्ह्यांत व सातारा जिल्ह्यात ४ ते ७ किलोमीटर राहील. कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित जिल्ह्यांत २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा व सोलापूर जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यांत २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

कृषी सल्ला

  • पावसात उघडीप राहणे शक्‍य असल्याने खरिपातील काढणीस आलेल्या पिकांची काढणी करावी.
  • रब्बी पिकांच्या पेरण्या सुरू करण्यापूर्वी पूर्वमशागतीची कामे पूर्ण करून रब्बी हंगामातील करडई व रब्बी ज्वारीची पेरणी पूर्ण करावी.
  • भाजीपाला पिकांपैकी वांगी, टोमॅटो, ढोबळी मिरची, कोबी, नवलकोल, फ्लॉवर या पिकांची लागवड करण्यासाठी रोपवाटिका तयार करून गादीवाफ्यावर ओळीत बियाणे पेरावे.
  • पेरणी झालेल्या क्षेत्रात बियाणे उगवले असल्यास त्यात नांगे भरणे व विरळणी करण्याचे काम करावे.

- डॉ. रामचंद्र साबळे
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर बातम्या
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...