Agriculture story in marathi, weekly weather advisory | Agrowon

आर्द्रतेत घट होऊन थंड, कोरडे हवामान राहील
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

कोकणातील कमाल तापमानात वाढ होऊन ते ३५ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. या आठवड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. भंडारा जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १९ किलोमीटरपर्यंत वाढेल. सकाळच्या आणि दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल व हवामान थंड व कोरडे राहील. मध्यम स्वरूपाची थंडी जाणवेल.

कोकणातील कमाल तापमानात वाढ होऊन ते ३५ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. या आठवड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. भंडारा जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १९ किलोमीटरपर्यंत वाढेल. सकाळच्या आणि दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल व हवामान थंड व कोरडे राहील. मध्यम स्वरूपाची थंडी जाणवेल.

महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार असून, काश्‍मीर भागावर १०१६; तर ईशान्य पूर्व भागावर १०१४ ते १०१८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. ता. ५ नोव्हेंबर रोजी हवेच्या दाबांची स्थिती कायम राहील. ता. ६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल आणि मध्य भारतावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. ता. ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा हवेचे दाब कमी होतील. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. ता. ८ नोव्हेंबर रोजी बंगालच्या उपसागरातील हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र विस्तारेल. ता. ९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. हवामान स्थितीत सातत्याने बदल जाणवतील. मात्र केवळ दक्षिण कोकणात आणि विदर्भातील वर्धा, पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली भागात हवामान ढगाळ राहील.

दक्षिण कोकणात ता. ५ व ६ नोव्हेंर रोजी अल्पशा पावसाची शक्‍यता निर्माण होईल. ता. ७, ८ व ९ नोव्हेंबर रोजी मराठवाड्याच्या पूर्व भागात आकाश अंशतः ढगाळ राहील. दक्षिण कोकणात भातपिकाची काढणी सुरू असल्याने  पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन भातकापणी, झोडणी व उफणनीचे काम ता. ५ व ६ नोव्हेंबर रोजी काळजीपूर्वक करावे. हिंदी महासागराच्या, अरबी समुद्राच्या व बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य राहील. एकूणच या आठवड्यात हवामान स्थिर राहील. त्यामुळे महाराष्ट्रात कोकण वगळता उर्वरित भागात सूर्यप्रकाश चांगला राहील व हवामान थंड राहील. कोकणातील कमाल तापमानात वाढ होऊन ते ३५ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल.

या आठवड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. भंडारा जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १९ किलोमीटरपर्यंत वाढेल. सकाळच्या आणि दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल व हवामान थंड व कोरडे राहील. मध्यम स्वरूपाची थंडी जाणवेल.

कोकण
कोकणात कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील; तर सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आकाश अंशतः कोरडे राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी जिल्ह्यात ७१ टक्के राहील; तर सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यात ६२ ते ६९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३९ टक्के राहील. पावसाची शक्‍यता सध्या नसली तरी ता. ५ व ६ रोजी दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अल्पशा पावसाची शक्‍यता आहे.

उत्तर महाराष्ट्र
नाशिक व धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील; तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ६२ टक्के राहील; तर उर्विरत जिल्ह्यांत ५२ ते ५७ टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
कोल्हापूर व नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. सातारा व सोलापूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील; तर सांगली व पुणे जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८० टक्के, सातारा व पुणे जिल्ह्यांत ७२ ते ७५ टक्के तर उर्वरीत जिल्ह्यांत ६२ ते ६९ टक्के राहील.

मराठवाडा
औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड व हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात किमान तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. बीड जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. उवरित सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ६८ ते ६९ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६४ टक्के राहील.  

पश्‍चिम विदर्भ
अकोला व वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील; तर बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील; तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८० टक्के राहील; तर दुपारची सापेक्ष आर्द्रता अकोला जिल्ह्यात ३९ टक्के; तर बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यात ४१ ते ४५ टक्के राहील.  

मध्य विदर्भ
वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. नागपूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस आणि यवतमाळ जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १७ ते १९ अंश सेल्सिअस राहील. वर्धा जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८२ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ४७ टक्के इतकी राहील. पावसाची शक्‍यता नाही. हवामान थंड व कोरडे राहील.

पूर्व विदर्भ
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस राहील; तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ८१ टक्के राहील, भंडारा जिल्ह्यात ८३ टक्के राहील. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ७९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ४५ ते ४७ टक्के राहील.

कृषी सल्ला

  • १५ नोव्हेंबरपर्यंत गहू, हरभरा, पूर्वहंगामी ऊस अाणि लसून घास, बरसीम या चारा पिकांच्या पेरण्या करून घ्याव्यात.
  • कोकणात रब्बी भुईमुगाच्या पेरणीसाठी हवामान अनकूल अाहे त्यामुळे भुईमुगाची पेरणी करावी.
  • हळव्या जातीच्या भाताच्या पिकाची काढणी करताना विशेषतः दक्षिण कोकणात अल्पशा पावसाची शक्‍यता असल्याने काळजी घ्यावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर बातम्या
जगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणीपुणे : निर्यातीत युरोपीय देशांप्रमाणे अन्य...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी :...नवी दिल्ली  : २०१९ मध्ये सत्तेत आल्यास...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
अमरावती विभागात शुल्क गोळा करूनही...अमरावती : शिपाई आणि रोपमळा मदतनीस पदाकरिता...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
जात प्रमाणपत्र पडताळणीतील बनवेगिरी कायमपुणे : बोगस जात प्रमाणपत्रे शोधण्यासाठी नियुक्त...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
तुरळक पावसाचा अंदाज; तापमान वाढणारपुणे : राज्यात सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्र,...
कृषी योजनांचा निधी खर्च करण्यात अपयशपुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांचा निधी...
शेतकरी आत्महत्यांचे सरकारला काहीच वाटत...राळेगणसिद्धी, जि. नगर : ‘‘लोकपाल आणि लोकायुक्त...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...