Agriculture story in marathi, weekly weather advisory | Agrowon

मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता
डाॅ. रामचंद्र साबळे
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होईल आणि त्यामुळे तापमान थंड राहील. ता. १८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील तर ता. १९ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या काळात हवेच्या दाबात वाढ होऊन दाब १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक राहील, त्यामुळे हवामानात थंडीचा प्रभाव वाढलेला असेल. मध्य भारतात १०१४ हेप्टापास्कल आणि उत्तर भारतातही तितकाच हवेचा दाब राहील. त्यामुळे उत्तर भारतातून इशान्येकडून वाहणारे थंड वारे महाराष्ट्रात सातत्याने दाखल होऊन थंडीचा प्रभाव कायम राखतील, अशा प्रकारचे हवामान या आठवड्यात राहील.

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होईल आणि त्यामुळे तापमान थंड राहील. ता. १८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील तर ता. १९ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या काळात हवेच्या दाबात वाढ होऊन दाब १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक राहील, त्यामुळे हवामानात थंडीचा प्रभाव वाढलेला असेल. मध्य भारतात १०१४ हेप्टापास्कल आणि उत्तर भारतातही तितकाच हवेचा दाब राहील. त्यामुळे उत्तर भारतातून इशान्येकडून वाहणारे थंड वारे महाराष्ट्रात सातत्याने दाखल होऊन थंडीचा प्रभाव कायम राखतील, अशा प्रकारचे हवामान या आठवड्यात राहील.

कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १२ ते १५ अंश सेल्सिअस राहण्यामुळे भाजीपाला, गहू, हरभरा, सूर्यफूल, जवस, मोहरी फळपिकांसाठी उत्तम हवामान असेल. मात्र ता. १८ व १९ रोजी हवामान बदल जाणवून पश्‍चिम, मध्य व पूर्व विदर्भात तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता राहील. नांदेड जिल्ह्यात १३ मि.मी., चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात १० मिलिमीटर, उस्मानाबाद, लातूर, गडचिरोली, सांगली, भंडारा, वर्धा व नागपूर जिल्ह्यात ६ ते ८ मिलिमीटर यवतमाळ जिल्ह्यात ४ मिलिमीटर व पश्‍चिम विदर्भात २ ते ३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. भंडारा जिल्ह्यात वाऱ्याचा वेग अधिक राहील.

पाऊस होणाऱ्या भागात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढेल. कमाल व किमान तापमानातही किंचित वाढ होईल. समुद्राच्या पाण्याचे तापमान सामान्यच राहील. त्यामुळे फार मोठे हवामान बदल त्यापुढे जाणवणार नाहीत. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहण्यामुळे थंडी टिकून राहील. पावसाचा फायदा कोरडवाहू रब्बी पिकांना निश्‍चित होईल.

कोकण
ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान वाढेल आणि ते ३७ अंश सेल्सिअस राहील; तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल आणि रायगड जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस राहील. तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअस राहील.

ठाणे जिल्हा वगळता सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील. ठाणे व रायगड जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ६३ टक्के राहील तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ८६ टक्के राहील. दुपारी हवामान कोरडे राहील आणि सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण २५ ते ४३ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र
धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील तर नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील.

मराठवाडा
पावसाची शक्‍यता उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यात राहील. नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद लातूर व जालना जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. लातूर जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. बीड व जालना जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील.    

पश्‍चिम विदर्भ
अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अकोला जिल्ह्यात ८० टक्के राहील. वाशीम, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता सर्वच जिल्ह्यात राहील.

मध्य विदर्भ
मध्य विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्‍यता ४ ते ६ मिलिमीटर राहील. कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. नागपूर जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

पूर्व विदर्भ
पूर्व विदर्भात ८ ते १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता ता. १९ रोजी असून ता. १८ नोव्हेंबर रोजी ४ ते ७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. भंडारा जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १७ किलोमीटर राहील. तर उर्वरित जिल्ह्यात ४ ते ५ किलोमीटर राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची शक्‍यता २ मिलिमीटर तर सांगली व सोलापूर जिल्ह्यात ७ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा सांगली जिल्ह्यात अाग्नेयेकडून तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील; पुणे जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, कोल्हापूर, सातारा व नगर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील तर सांगली जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
 
कृषी सल्ला

  • उस्मानाबाद, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात ता. १८ व १९ रोजी पावसाची शक्‍यता असल्याने उन्हात वाळत घातलेल्या धान्याची काळजी घ्यावी.
  • उशिरा पेरणी करावयाच्या गहू, हरभरा, मोहरी, जवस, सूर्यफूल या सर्वच पिकांची पेरणी लवकरात लवकर करावी.
  • भात काढणी व झोडणीचे काम पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन करावी. काढणी केलेला माल सुरक्षित स्थळी ठेवावा.
  • भाजीपाला पिकांपैकी कांदा, टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर, नवलकोल या पिकांच्या रोपांची पुनर्लागवड करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
 

इतर बातम्या
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
परभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या...
करवीर तालुक्‍यात लघुपाटबंधारे विभागात...कोल्हापूर : करवीर तालुक्‍यातील लघू...
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
महामार्ग सुरू होण्यापूर्वीच वाळूमाफिया...जळगाव ः जळगाव शहरातील वाढते अपघात आणि...
शेतकऱ्यांनी जाणले कृषी तंत्रज्ञानभंडारा : परंपरागत कृषी विकास योजनेतून तालुका कृषी...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
गाळपेर क्षेत्रातून मिळणार ४८ हजार टन... नाशिक : दुष्काळात जिल्ह्यात चाराटंचाई...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...
उजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर  : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...
अवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...
बाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...
समृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...
विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...