Agriculture story in marathi, weekly weather advisory | Agrowon

थंडीची तीव्रता वाढेल, हवामान कोरडे राहील
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१२ हेप्टापास्कल इतका होईल आणि त्यात पुन्हा वाढ होऊन ता. २६ नोव्हेंबर रोजी तो १०१४ हेप्टापास्कल इतका होईल. त्यामुळे किमान तापमान व कमाल तापमानात घसरण होईल आणि थंडीची तीव्रता वाढेल व ती जाणवेल. ता. २७ नोव्हेंबर सोमवारपर्यंत ही स्थिती कायम राहील. मंगळवार ता. २८ रोजी अंदमान समुद्रात व बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. त्या वेळी महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होऊन तो १०१० हेप्टापास्कल होईल.

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१२ हेप्टापास्कल इतका होईल आणि त्यात पुन्हा वाढ होऊन ता. २६ नोव्हेंबर रोजी तो १०१४ हेप्टापास्कल इतका होईल. त्यामुळे किमान तापमान व कमाल तापमानात घसरण होईल आणि थंडीची तीव्रता वाढेल व ती जाणवेल. ता. २७ नोव्हेंबर सोमवारपर्यंत ही स्थिती कायम राहील. मंगळवार ता. २८ रोजी अंदमान समुद्रात व बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. त्या वेळी महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होऊन तो १०१० हेप्टापास्कल होईल.

बुधवार ता. २९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात पुन्हा घसरण होऊन तो १००८ हेप्टापास्कल इतका कमी होईल. त्या वेळी थंडीची तीव्रता कमी झालेली असेल. गुरुवार ता. ३० नोव्हेंबर रोजी ही स्थिती कायम राहात असताना अंदमान समुद्र व बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्राकार वारे तेथे वाहतील. या आठवडाभरात प्रामुख्याने हिंदी महासागर, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यच राहील, त्यामुळे हवामान बदल जाणवणार नाहीत. कोकणातील सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहील.

संपूर्ण मराठवाड्यात हवामान अंशतः ढगाळ राहील, तसेच पश्‍चिम महाराष्ट्रात व विदर्भातही हवामान अंशतः ढगाळ राहणे शक्‍य आहे. मात्र ढगांचे प्रमाण अत्यल्प राहील. शनिवार ता. २ डिसेंबर रोजी पुन्हा हवामान बदल जाणवतील आणि त्यामुळे दक्षिण कोकण, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या दक्षिणेकडील जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता निर्माण होईल. त्याबाबत सविस्तर माहिती पुढच्या आठवड्यात हवामान अंदाजाद्वारे जाणून घेऊ आणि त्या दृष्टीने आतापासूनच तयारीत राहण्याची तयारी करूया. तोपर्यंत महाराष्ट्रातील हवामान थंड व कोरडे राहील.

कोकण
सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील, तर रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आणि ठाणे जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५७ टक्के, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के राहील. ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ टक्के राहील. उर्वरित ३ जिल्ह्यांत ती केवळ ३१ ते ३६ टक्के इतकी कमी राहील, त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

उत्तर महाराष्ट्र
नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील, तसेच किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील आणि उर्वरित जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४७ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ३९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २२ टक्के इतकी कमी राहण्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. नंदुरबार जिल्ह्यात वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ती अाग्नेयेकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

मराठवाडा
परभणी व हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, नांदेड, लातूर, बीड जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस आणि औरंगाबाद जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस व जालना जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. लातूर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस आणि उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, लातूर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस व उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५२ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता जालना व औरंगाबाद जिल्ह्यात २६ ते २८ टक्के व उर्वरित लातूर व बीड जिल्ह्यांत ३१ टक्के राहील. तसेच उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात आर्द्रता केवळ ३० टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने बहुतांशी जिल्ह्यांत अाग्नेयेकडून राहील. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्वेकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

पश्‍चिम-विदर्भ
अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील, तर वाशीम जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस आणि बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस आणि अमरावती जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. अमरावती जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील, तर उर्वरित बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४० ते ४३ टक्के राहील व वाशीम व बुलडाणा जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता वाशीम जिल्ह्यात ३० टक्के व अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत २२ ते २६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

मध्य विदर्भ
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील. नागपूर जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ३५ टक्के व वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २१ ते २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

पूर्व विदर्भ
गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. भंडारा जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील, तर चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा जिल्ह्यात ४० टक्के राहील तर उर्वरित जिल्ह्यांत ५० ते ५२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ८ किलोमीटर राहील व वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र
सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. सांगली व नगर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस आणि नगर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस आणि सातारा जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ७० टक्के, सातारा जिल्ह्यात ८२ टक्के, पुणे जिल्ह्यात ६६ टक्के, सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यांत ५४ ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ४४ टक्के व नगर जिल्ह्यात २९ टक्के आणि सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ३१ ते ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ किलोमीटर राहील. कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा इशान्येकडून तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. या आठवड्यात पावसाची शक्‍यता नाही.

कृषी सल्ला

  • कुक्कुटपालन शेडमध्ये बल्ब लावून तापमान वाढवण्याचा प्रयत्न करावा आणि पक्षांचे थंडीपासून संरक्षण करावे. मेंढ्यांना लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लस टोचावी.
  • उशिरा पेरणी करायच्या गव्हासाठी एनआयएडब्ल्यू-३४ आणि ऐकेडब्ल्यू-४६२७ यापैकी जातींची निवड करावी.
  • पूर्व हंगामी ऊस लागवड ३० नोव्हेंबरपूर्वी करावी.

- डॉ. रामचंद्र साबळे
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर अॅग्रो विशेष
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...
खानदेशात चाराटंचाईचे संकटजळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा...