Agriculture story in marathi, weekly weather advisory | Agrowon

बुधवार ते शुक्रवारपर्यंत पावसाची शक्‍यता
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 2 डिसेंबर 2017

बंगालच्या उपसागरावर, हिंदी महासागरावर तयार होणाऱ्या वादळामुळे वारे अाग्नेयेकडून प्रवेश करतील आणि ते अतिबाष्पयुक्त वारे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही पावसाची शक्‍यता निर्माण करतील. एकूणच या आठवड्यात हवामानात बदल जाणवतील.

बंगालच्या उपसागरावर, हिंदी महासागरावर तयार होणाऱ्या वादळामुळे वारे अाग्नेयेकडून प्रवेश करतील आणि ते अतिबाष्पयुक्त वारे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही पावसाची शक्‍यता निर्माण करतील. एकूणच या आठवड्यात हवामानात बदल जाणवतील.

महाराष्ट्राच्या संपूर्ण दक्षिण किनारपट्टीवर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार असून, कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे त्या भागात थंडीचे प्राबल्य वाढेल. ३ डिसेंबर रोजी बंगालच्या उपसागरावर व दक्षिण अरबी समुद्रावर हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे तयार होतील आणि श्रीलंकेजवळ चक्राकार वादळी वारे वाहतील. तर महाराष्ट्रावरील हवेचे दाब २ डिसेंबरप्रमाणेच राहतील. त्याचवेळी काश्‍मीर खोऱ्यात १०१६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे हिमालयाच्या पायथ्यापासून उत्तर भारतात थंडीचे व धुक्‍याचे प्राबल्य वाढेल.

हरियाना, पंजाब, सिमला येथे तापमान बरेच खाली घसरल्याने आणि उत्तरेकडील आणि ईशान्य दिशेने येणारे वारे दक्षिणेकडे वाहत असल्याने महाराष्ट्रातही थंडीचे प्रमाण वाढेल. उत्तर भारतातील थंडीचे प्राबल्य कायम राहील, मात्र ६ डिसेंबर रोजी बंगालच्या उपसागरातील चक्रीय वादळ दक्षिण-पूर्व किनारपट्टीत तेलंगणालगत येईल. त्यामुळे तमिळनाडू ते ओडिशा भागांत पावसाचे प्रमाण वाढेल; आणि त्याचवेळी पश्‍चिम किनारपट्टीवरही हवेचे दाब कमी होतील, मात्र तेथे त्या दिवशी पाऊस होणार नाही.

६ डिसेंबर रोजी महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब कमी राहील आणि बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व अरबी समुद्रावरून वारे महाराष्ट्रात बाष्प आणतील. बुधवार ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या पूर्व भागात हलक्‍या स्वरूपात पावसाची शक्‍यता असून, गुरुवार ७ डिसेंबर रोजी दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबईसह मराठवाडा व विदर्भात हलक्‍या स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. शुक्रवार ८ डिसेंबर व ९ डिसेंबरपर्यंत दक्षिण कोकण व ठाणे मुंबईसह दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हलक्‍या पावसाची शक्‍यता राहील.

बंगालच्या उपसागरावर, हिंदी महासागरावर तयार होणाऱ्या वादळामुळे वारे अाग्नेयेकडून प्रवेश करतील आणि ते अतिबाष्पयुक्त वारे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही पावसाची शक्‍यता निर्माण करतील. एकूणच या आठवड्यात हवामानात बदल जाणवतील. त्याचे मुख्य कारण म्हणजे २० नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या काळात व त्यापुढेही हिंदी महासागर, दक्षिण अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य तापमानापेक्षा वाढेल. अरबी समुद्राचे तापमान २८ अंश, हिंदी महासागर ३० ते ३१ अंश अाणि बंगालच्या उपसागराचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल.

कोकण
सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील, तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. पावसाची शक्‍यता दक्षिण कोकण व मुंबई भागात ७ व ८ तारखेस राहील. या आठवड्यात हवामान बदल जाणवतील.

उत्तर महाराष्ट्र
थंडीचे प्राबल्य वाढेल. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत किमान तापमान ९ अंश सेल्सिअस; तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान १० अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे थंडीचे प्राबल्य राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. ७ रोजी अल्पशा पावसाची शक्‍यता राहील.

मराठवाडा
मराठवाड्यात थंडीचे प्राबल्य वाढेल. उस्मानाबाद बीड, परभणी या जिल्ह्यांत किमान तापमान १० अंश सेल्सिअस राहील. हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. नांदेड व जालना जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील आणि लातूर जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान २९ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. हवामान थंड राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.  

पश्‍चिम विदर्भ
पश्‍चिम विदर्भ अकोला जिल्ह्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअस राहील, तर वाशीम जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील, तर अमरावती जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ किलोमीटर राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अाग्नेयेकडून राहील, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ
नागपूर जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात २९ टक्के व यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांत ३२ टक्के राहील.

पूर्व विदर्भ
पूर्व विदर्भात भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. सातारा व सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील, तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. सांगली, सातारा व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

कृषी सल्ला

  • सध्याचे किमान व कमाल तापमान रब्बी पिकांच्या वाढीसाठी अनुकूल अाहे. जेथे पाण्याची सोय असेल तेथे पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी देणे आवश्‍यक आहे.
  • फळबागांना आणि फळभाज्यांना पाणी देताना शक्‍यतो ठिबक सिंचनाचा वापर करावा आणि द्रवरूप खते द्यावीत.
  • उशिरा पेरणी करायच्या गहू अाणि हरभरा पिकांची पेरणी करून सारे पाट पाडावेत व पेरणीनंतर पाणी द्यावे.
  • भातकापणीनंतर जेथे पाण्याची सोय आहे तेथे हरभरा पिकाची पेरणी करावी.

- डॉ. रामचंद्र साबळे
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर अॅग्रो विशेष
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...
आजचा चंद्र हा सर्वांत जवळ : 'ग्रेट...या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या...
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...