Agriculture story in marathi, weekly weather advisory | Agrowon

थंडी कमी होईल, हवामान कोरडे राहील
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 9 डिसेंबर 2017

महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे, तर महाराष्ट्रातील नंदूरबार भागावर व उत्तर सीमेवर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. तसेच भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीलगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र कायम राहील. १० डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका कायम राहील. मात्र भारताच्या ईशान्य भागात हवेचा दाब वाढेल आणि तो १०१६ हेप्टापास्कलपर्यंत वाढेल. त्यामुळे वारे ईशान्य भारतातून दक्षिण भारताकडे वाहतील.

महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे, तर महाराष्ट्रातील नंदूरबार भागावर व उत्तर सीमेवर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. तसेच भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीलगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र कायम राहील. १० डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका कायम राहील. मात्र भारताच्या ईशान्य भागात हवेचा दाब वाढेल आणि तो १०१६ हेप्टापास्कलपर्यंत वाढेल. त्यामुळे वारे ईशान्य भारतातून दक्षिण भारताकडे वाहतील.

१२ डिसेंबर रोजी महाराष्ट्रावरील हवेचे दाब वाढतील आणि ते १०१२ हेप्टापास्कल होतील. १३ डिसेंबर रोजी संपूर्ण भारतावर १०१२ हेप्टापास्कल इतका समान हवेचा दाब राहील. आणि संपूर्ण भारतातील थंडीचे प्रमाण कमी झाल्याचे जाणवेल. ही स्थिती १३ डिसेंबरपर्यंत कायम राहील. १४ डिसेंबर रोजी पुन्हा हवेच्या दाबात बदल होतील आणि उत्तर भारतात १०१४ हेप्टापास्कल हवेचे दाब होताच किमान तापमानात घसरण होऊन थंडी वाढेल. ११ डिसेंबरपासून पुढे दक्षिण भारताच्या पूर्व भागात पावसाळी वातावरण तयार होईल. महाराष्ट्राच्या पूर्व भागात त्याचा परिणाम १६ डिसेंबरपर्यंत जाणवेल. या आठवड्यात किमान तापमानात वाढ झालेली दिसेल आणि त्याचा परिणाम थंडीचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्टपणे जाणवेल. त्याचवेळी कमाल तापमानातही वाढ झाल्याचे दिसून येईल.

भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्‍यता सुरवातीपासून दिसून येईल. पश्‍चिम, उत्तर महाराष्ट्र व कोकणातही हवामान ढगाळ राहील, त्याचप्रमाणे मराठवाडा व विदर्भातही हवामान ढगाळ राहील. या आठवड्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. उस्मानाबाद, सांगली व हिंगोली जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग १० ते १२ किलोमीटर प्रतिताशी राहील. समुद्राच्या पाण्याचे तापमान सामान्यच राहील. दुपारी हवामान कोरडे राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच राज्यांत चांगली राहील. हवामान ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राही. मात्र उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्रता कमी राहण्यामुळे महाराष्ट्रातही थंडीची तीव्रता कमी राहील.

१) कोकण
रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के राहील, तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ६९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३१ टक्के राहील. आणि ठाणे जिल्ह्यात २४ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील.
२) उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ टक्के तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ५५ ते ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नंदूरबार जिल्ह्यात ३४ टक्के राहील, तर नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३२ ते ३३ टक्के इतकी कमी राहील.
३) मराठवाडा
लातूर, परभणी व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर उस्मानाबाद, बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. लातूर जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. नांदेड जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील, तर उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस इतके राहील.

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील. लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९१ टक्के राहील. उस्मानाबाद, बीड व परभणी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८२ टक्के इतकी राहील. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ६६ टक्के राहील. लातूर, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ४८ टक्के राहील. औरंगाबाद, जालना, परभणी व बीड जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ३५ टक्के राहील. यामुळे हवामान कोरडे राहील, तर हिंगोली, लातूर व नांदेड जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ४८ टक्के राहील.
४) पश्‍चिम विदर्भ
बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३१ टक्के राहील. अमरावती जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील आणि बुलडाणा जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ८५ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यात ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४२ टक्के राहील.
५) मध्य विदर्भ
मध्य विदर्भात कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. नागपूर जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५५ टक्के इतकी राहील.
६) पूर्व विदर्भ
चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील, तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ९० ते ९३ टक्के व दुपारची ५५ ते ६० टक्के राहील.
७) दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर पुणे जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस राहील. सातारा, नगर व सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअस राहील. तसेच सांगली जिल्ह्यात १८ अंश व कोल्हापूर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ टक्के व सातारा जिल्ह्यात ८१ टक्के राहील. नगर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६९ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ७६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३६ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील.

ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य, संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

इतर ताज्या घडामोडी
कृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...
पिवळी डेझी लागवड कशी करावी?पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....
निशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...
काळी मिरी कशी तयार करतात?काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...
वनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...
शेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...
शेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे  ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...
शेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...
एक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...
तूर, हरभरा विक्रीचे पैसे न मिळाल्याने...नगर  : मागील दहा वर्षांतील पाच ते सहा वर्षे...
शेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचानागपूर  ः पाकिस्तान सीमेवर दररोज कुरापती...
संकटे असली तरी खचून न जाता पेरणी करणारपरभणी : औंदा मोसमी पाऊस वेळेवर यावा, समद्यांची...
राज्यात ढगाळ वातावरण; तर कोकणात पावसाची...भारतीय भूखंडावरील हवेचा दाब कमी होत आहेत. अरबी...
साताऱ्यात एक कोटी सात लाख क्विंटल साखर...सातारा : जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या...
चार जिल्ह्यांत हरभरा खरेदीला ग्रहणऔरंगाबाद : खरेदीत सातत्य नसणे, जागेचा प्रश्‍न आणि...
हंगाम तोंडावर; पीककर्जाची प्रतीक्षा...अकोला ः  खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर आला...
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनपावसाने ओढ दिल्याने पेरणीचे नियोजन चुकते. उपलब्ध...
ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रेज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या...
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावेपुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त...
'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम...