Agriculture story in marathi, weekly weather advisory | Agrowon

महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 16 डिसेंबर 2017

महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर १०१४ हेप्टापास्कल इतका तर सह्याद्री पर्वतरांगांपासून पूर्वेच्या सर्वभागावर १०१६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे कोकणासह सर्व महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण वाढेल, किमान तापमानात घसरण होऊन पूर्व भाग, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात थंडीची लाट सुरू होईल. ईशान्य व वायव्य भागांकडून दक्षिणेकडे येणारे अतिथंड वारे थंडीचे प्रमाण कायम ठेवतील आणि थंडीचे प्रमाण यापुढे आणखी वाढण्यास मदत करतील. काश्‍मीर तसेच हिमालय या भागांत बर्फवृष्टी सुरू होईल. संपूर्ण भारतात थंडीचे प्राबल्य सुरू होईल. १७ डिसेंबरपर्यंत ही स्थिती कायम राहील.

१८ डिसेंबर रोजी कोकणात १०१६ हेप्टापास्कल, तर संपूर्ण महाराष्ट्रावर १०१८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल. जेव्हा हवेचे दाब वाढतात, तेव्हा किमान तापमानात घसरण होऊन थंडीचे प्रमाण वाढते. त्यामुळे थंडीचा कडाका सुरू होईल. सकाळी आणि दुपारीही थंडीचे प्राबल्य वाढेल. त्या वेळी उत्तर भारतातील थंडीचे प्रमाण आणखी वाढेल. उत्तर भारतात १०२० हेप्टापास्कल इतका हवेचा अधिक दाब राहील. १९ डिसेंबर रोजी ही स्थिती कायम राहील. २१ डिसेंबर रोजी हवेचे दाब थोडे कमी होतील आणि कडाक्‍याच्या थंडीचे प्रमाण कमी जाणवेल. मात्र थंडीचे प्राबल्य कायम राहील. सकाळी धुक्‍याचे प्रमाण वाढेल आणि दव पडण्यास सुरवातही याच आठवड्यात होईल.
संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहणे शक्‍य आहे. वाऱ्याची दिशा दक्षिण महाराष्ट्रात अाग्नेयेकडून तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ईशान्येकडून राहील. नंदुरबार, जळगाव, हिंगोली, सांगली व नगर जिल्ह्यांत ताशी १० ते ११ किलोमीटर राहील, तर इतर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० किलोमीटरपेक्षा कमी राहील. पावसाची शक्‍यता नाही.

कोकण
रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ६७ टक्के राहील, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७३ टक्के राहील. ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ टक्के इतकी कमी राहील, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ३६ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र
जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ६१ टक्के तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ५५ ते ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३५ टक्के इतकी कमी राहील. नंदुरबार जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १२ किलोमीटर राहील. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० किलोमीटर राहील. नाशिक जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अाग्नेयेकडून तर उर्वरित धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.
मराठवाडा
हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर उस्मानाबाद, नांदेड व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. लातूर, बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. लातूर जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस, नांदेड जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस आणि औरंगाबाद जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत ६३ टक्के राहील, तर उर्वरित जिल्ह्यांत ती ५५ ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ३४ ते ३५ टक्के राहील, तर उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी या जिल्ह्यांत ३१ ते ३२ टक्के राहील. हिंगोली जिल्ह्यात केवळ २९ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील.
पश्‍चिम विदर्भ
अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील, तर बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. आणि वाशीम जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील, तर बुलडाणा जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ६७ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३९ ते ४२ टक्के राहील आणि वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील.
मध्य विदर्भ
वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ६९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३९ ते ४२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
पूर्व विदर्भात कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ३४ अंश सेल्सिअस तापमान राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत १३ अंश सेल्सिअस इतके कमी राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७५ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर इतका कमी राहील आणि वारा शांत असेल. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर नगर व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित सातारा, सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यांत किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ७१ ते ७३ टक्के राहील तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ३८ टक्के राहील, तर सांगली जिल्ह्यात ३५ टक्के, सोलापूर जिल्ह्यात ३३ टक्के; पुणे व नगर जिल्ह्यांत ३६ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग सांगली व नगर जिल्ह्यांत १० किलोमीटर, तर उर्वरित जिल्ह्यांत त्यापेक्षा कमी राहील. वाऱ्याची दिशा कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वेकडून, सातारा जिल्ह्यात ईशान्येकडून व उर्वरित सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत अाग्नेयेकडून राहील.
 
कृषी सल्ला

  • जानेवारी महिन्यात लागवड करावयाच्या सुरू ऊस लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी व जमीन तापू द्यावी. त्यानंतर हेक्‍टरी २० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
  • गरवा कांदा लागवडीसाठी एन-२-४-१ या जातीचे ५० दिवस वयाचे रोप तयार असल्यास सपाट वाफ्यात रोपांची लागवड करून पाणी द्यावे. लागवडीपूर्वी हेक्‍टरी ५० किलो नत्र + ५० किलो स्फुरद + ५० किलो पालाश खत द्यावे.
  • उन्हाळी भेंडी व भुईमूग लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी. चांगले कुजलेले शेणखत हेक्‍टरी २० टन विस्कटून द्यावे.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

 

इतर बातम्या
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
सांगली जिल्ह्यात धग वाढतेयसांगली : जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी ही दूध दराच्या...
हरभऱ्याचे चुकारे अद्याप थकीतनांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान...