Agriculture story in marathi, weekly weather advisory | Agrowon

थंडीचे प्राबल्य अधिक राहणारा आठवडा
डाॅ. रामचंद्र साबळे
शनिवार, 30 डिसेंबर 2017

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार असून, मध्य महाराष्ट्रापासून संपूर्ण पूर्व भागावर दक्षिणोत्तर दिशेने १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे किमान तापमानात घसरण होऊन थंडीचा कडाका जाणवेल.

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार असून, मध्य महाराष्ट्रापासून संपूर्ण पूर्व भागावर दक्षिणोत्तर दिशेने १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे किमान तापमानात घसरण होऊन थंडीचा कडाका जाणवेल.

काश्मीर खोऱ्यात १०१६ हेप्टापास्कल आणि संपूर्ण हिमालयाच्या पायथ्याच्या भागावरही तितकाच हवेचा दाब राहील. त्यामुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढलेला असेल आणि वारे जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वाहतात या नियमानुसार उत्तर भारतातील अतिथंडवारे महाराष्ट्राच्या उत्तर भागात व उत्तर-दक्षिण दिशेने मध्य महाराष्ट्रापासून संपूर्ण पूर्व भागावर वाहतील. म्हणजेच नाशिक, नगर, पुणे येथे थंडीचे प्राबल्य वाढेल तसेच उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील तसेच दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत थंडीचे प्राबल्य वाढल्याचे जाणवेल. ३० डिसेंबर रोजी ही स्थिती कायम राहील. मात्र त्याचवेळी काश्मीर खोऱ्यात आणखी थंडी वाढेल. कारण तेथे १०१८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहणार आहे. ३१ डिसेंबर रोजी ही स्थिती कायम राहील.

उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे महाराष्ट्रात दाखल होतील आणि थंडीत वाढ होईल. त्याचवेळी सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत नदीकाठी, विहिरीवरील भागावर आणि काही भागात धुके जाणवेल. त्याशिवाय ज्वारी आणि इतर पिकावर दव पडलेले दिसून येईल. १ जानेवारी २०१८ रोजी थंडीची तीव्रता कमी होईल. त्याचे मुख्य कारण म्हणजे कोकण किनारपट्टीवर हवेचे दाब कमी होऊन ते १०१० हेप्टापास्कल इतके राहतील, तर महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. २ जानेवारी रोजीही थंडीचे प्रमाण मध्यम राहील. ३ व ४ जानेवारी रोजी कोकणासह महाराष्ट्रावरील हवेचे दाब समान राहतील. मात्र मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात थंडीचे प्रमाण कायम राहील. त्यामुळे या आठवड्यात थंडीचे प्राबल्य राहील.

१) कोकण :
रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील, तर रत्नागिरी जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस तसेच रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९१ टक्के राहील. रत्नागिरी जिल्ह्यात ५७ टक्के राहील व रायगड आणि ठाणे जिल्ह्यात ६५ ते ६७ टक्के इतकी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता रायगड जिल्ह्यात ६३ टक्के राहील. ठाणे जिल्ह्यात ५५ टक्के राहील, तर रत्नागिरी जिल्ह्यात ४४ टक्के व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

२) उत्तर महाराष्ट्र :
जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ते १० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५६ टक्के राहील. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात २६ टक्के राहील तर नंदूरबार, धुळे व नाशिक जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २७ टक्के इतकी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ किलोमीटर राहील. धुळे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा पूर्वेकडून राहील तर नंदूरबार जिल्ह्यात इशान्येकडून राहील. आणि नाशिक व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील.

३) मराठवाडा :
लातूर जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. लातूर व नांदेड जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस आणि नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत १२ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअस तर परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ११ अंश सेल्सिअस राहील, आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यांत ४० ते ४८ टक्के राहील. बीड जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ टक्के राहील. लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ५४ ते ५५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत १८ ते १९ टक्के राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत २४ टक्के राहील, तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २० ते २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

४) पश्‍चिम विदर्भ ः
बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अमरावती जिल्ह्यात ६० टक्के राहील तर अकोला जिल्ह्यात ५० टक्के राहील. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अमरावती जिल्ह्यात अग्नेयेकडून तर उर्वरीत बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यात वाऱ्याची दिशा पूर्वेकडून राहील.

५) मध्य विदर्भ ः
वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील व नागपूर जिल्ह्यात १० अंश सेल्सिअस राहील. वर्धा जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ५५ टक्के राहील, तर यवतमाळ जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ टक्के राहील. यवतमाळ जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० टक्के राहील तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २० ते २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याच्या दिशा अग्नेय, पूर्व व इशान्येकडून राहील.

६) पूर्व विदर्भ :
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान १० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. गडचिरोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ टक्के राहील तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५५ टक्के राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० टक्के व भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांत केवळ २० टक्के राहील आणि दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांत इशान्येकडून, गडचिरोली जिल्ह्यात पूर्वेकडून आणि भंडारा जिल्ह्यात अग्नेयेकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

७) दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र :
पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील तसेच सातारा जिल्ह्यातही कमाल तापमान तितकेच राहील. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर सांगली व सोलापूर जिल्ह्यात ते ३० अंश व नगर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ११ अंश सेल्सिअस राहील आणि पुणे जिल्ह्यात १० अंश व नगर जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पुणे जिल्ह्यात ७९ टक्के राहील तर सातारा जिल्ह्यात ६० टक्के व सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत ५४ ते ५७ टक्के व नगर जिल्ह्यांत ४३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सोलापूर जिल्ह्यात ३५ टक्के राहील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २७ टक्के राहील. सातारा जिल्ह्यात २१ टक्के आणि पुणे व नगर जिल्ह्यांत १९ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किलोमीटर राहील तर वाऱ्याची दिशा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत इशान्येकडून बाकी जिल्ह्यांत अग्नेयेकडून राहील.

कृषी सल्ला ः

  • फळबागांना तसेच इतर पिकांना सायंकाळी पाणी दिल्यास मातीचे आणि मुळ्याजवळचे तापमान फारसे घसरणार नाही. पाणी उशिरा तापते आणि उशिरा थंड होते त्याचा फायदा होईल.
  • जनावरे उघड्यावर न बांधता गोठ्यामध्ये बांधावीत.
  • कुक्कुटपालन शेडच्या खिडक्‍या रात्रीच्या वेळी बंद कराव्यात. शेड उबदार राहण्यासाठी शेडमध्ये बल्ब लावावेत.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...