Agriculture story in marathi, weekly weather advisory | Agrowon

राज्यात थंडीचा कडाका वाढणार
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 6 जानेवारी 2018

महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. तितकाच हवेचा दाब उत्तर भारतात राहील. त्यामुळे थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपातच राहील. दक्षिण व पूर्व किनारपट्टीवरही समान हवेचा दाब म्हणजे १०१० हेप्टापास्कल इतका राहण्यामुळे उत्तरेकडील थंड वारे दक्षिणेकडे वाहतील. त्यामुळे थंडीचे प्रमाण एकसारखे राखले जाईल एकूणच हवामानात स्थिरता लाभेल. अस्थिर हवामान राहणार नाही. ७ जानेवारी रोजी बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन तेथे १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील.

महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. तितकाच हवेचा दाब उत्तर भारतात राहील. त्यामुळे थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपातच राहील. दक्षिण व पूर्व किनारपट्टीवरही समान हवेचा दाब म्हणजे १०१० हेप्टापास्कल इतका राहण्यामुळे उत्तरेकडील थंड वारे दक्षिणेकडे वाहतील. त्यामुळे थंडीचे प्रमाण एकसारखे राखले जाईल एकूणच हवामानात स्थिरता लाभेल. अस्थिर हवामान राहणार नाही. ७ जानेवारी रोजी बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन तेथे १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील.

८ जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यात किमान तापमानात घट होईल आणि उत्तर भारतावरील हवेचे दाब वाढतील आणि १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब निर्माण होईल. त्यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट राहील. ९ जानेवारी रोजी उत्तर भारतावरील हवेचा दाब आणखी वाढेल आणि १०१६ हेप्टापास्कल इतका होईल. तेव्हा थंडीचे प्रमाण भारतभर वाढलेले असेल. उत्तर-पश्‍चिम भारतावर १०१८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल. त्याचाही परिणाम थंडीचा प्रभाव वाढण्यात होईल. त्या वेळी मराठवाडा व विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र व मध्यम महाराष्ट्रात थंडीची लाट जाणवेल. ती स्थिती १० जानेवारी रोजी कायम राहील.

अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यच राहील. त्यामुळे हवामान बदल जाणवणार नाहीत. हवामानात स्थिरता राहील. वारा शांत असेल. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. त्यामुळे थंडी कायम राहील. या आठवड्यात ८ जानेवारीनंतर थंडीची लाट येणे शक्‍य आहे.

कोकण ः
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर रायगड जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस कमाल तापमान राहील. सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील, तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहील, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता केवल ४४ टक्के राहील. तर रायगड जिल्ह्यात ६९ टक्के राहील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७९ टक्के राहील. ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ टक्के राहील तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ठाणे व रायगड जिल्ह्यांत ३ ते ५ किलोमीटर राहील, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ६ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ठाणे जिल्ह्यांत अाग्नेयेकडून, तर उर्वरित जिल्ह्यात ईशान्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र ः
जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. तर नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत किमान तापमान ८ अंश सेल्सिअस राहील, तर जळगाव जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६३ टक्के राहील, तर नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७८ टक्के राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता १५ टक्के राहील, तर उर्वरित जिल्ह्यात २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किलोमीटर राहील. जळगाव जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अाग्नेयेकडून तर उर्वरित जिल्ह्यांत ती नैर्ऋत्येकडून राहील.

मराठवाडा ः
औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. बीड व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर जालना, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहील. लातूर व परभणी जिल्ह्यांत किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील, तर नांदेड जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित बीड, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. औरंगाबाद व बीड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३८ टक्के राहील, तर नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७६ टक्के राहील. उर्वरित लातूर, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ६६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत १८ टक्के राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २२ ते २४ टक्के आणि नांदेड जिल्ह्यात ३३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य, ईशान्य व अाग्नेयेकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ ः
पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ते १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ४९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अाग्नेय व ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ ः
मध्य विदर्भात कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४९ ते ५२ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

पूर्व विदर्भ ः
गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील; भंडारा जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील; गडचिरोली जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील, तर चंद्रपूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत समान म्हणजे १३ अंश सेल्सिअस राहील, तर भंडारा जिल्ह्यात ११ अंश सेल्सिअस व गोंदिया जिल्ह्यात ९ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील व उरलेल्या सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ७५ टक्के राहील, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ५२ ते ६९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर राहील व वाऱ्याची दिशा ईशान्य व अाग्नेयेकडून राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः
पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर व सोलापूर जिल्ह्यांत १३ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत १२ अंश सेल्सिअस राहील व कोल्हापूर जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. उर्वरित जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नगर जिल्ह्यात केवळ ३३ टक्के व दुपारची २० टक्के राहील, त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. सांगली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ टक्के राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३४ टक्के राहील. पुणे जिल्ह्यात ३१ टक्के व सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत २३ ते २४ टक्के राहील. सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २ ते ३ किलोमीटर राहील, तर उर्वरित जिल्ह्यांत ५ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अाग्नेय, नैर्ऋत्य व वायव्येकडून राहील.

कृषी सल्ला ः

  • केळीबागांमध्ये सकाळच्या वेळी लहान-लहान शेकोट्या कराव्यात म्हणजे थंडीमुळे पाने करपण्याचे प्रमाण घटेल.
  • कुक्कुटपालन शेडमध्ये बल्ब रात्री सुरू ठेवल्यास शेडमधील तापमान वाढेल. विशेषकरून पिलांच्या शेडमध्ये अशी काळजी घेतल्यास मरतुकीचे प्रमाण घटेल.
  • पिकांना सायंकाळी पाणी दिल्यास जमिनीचे तापमान योग्यप्रकारे राखले जाईल.

 (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...