कमाल, किमान तापमानात वाढ होईल

अाठवड्याचे हवामान
अाठवड्याचे हवामान

महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर १०१० हेप्टापास्कल; तर सह्याद्री पर्वतरांगांवर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार असल्याने तसेच उर्वरित महाराष्ट्रावर तितकाच हवेचा दाब राहण्यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होईल आणि थंडीचे प्रमाण कमी होईल. त्याचवेळी उत्तर व मध्य भारतात १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे तेथेही थंडीचे प्रमाण कमी होईल.

उत्तरेकडून येणारे वारे अति थंड नसणार, त्यामुळे महाराष्ट्रातील कमाल व किमान तापमानात वाढ निश्‍चित होईल आणि थंडी कमी होण्यास सुरवात होईल. १४ जानेवारी अाणि १५ जानेवारी रोजी हीच हवामान स्थिती कायम राहील. १६ जानेवारी रोजी महाराष्ट्रावरील हवेचे दाब आणखी कमी होऊन तो १०१० हेप्टापास्कल इतका राहील; तसेच उत्तर भारतातील हवेचे दाबही कमी होतील आणि थंडीचे प्रमाण आणखी कमी होईल. कमाल तापमानात २ अंशांनी आणि किमान तापमानातही २ अंशांनी वाढ होईल. १७ जानेवारी रोजी थंडीचे प्रमाण आणखी घटेल. त्यामुळे दुपारी उष्णता जाणवेल आणि सकाळी व रात्री थंडी जाणवेल. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान अल्पशा प्रमाणात वाढेल. त्याचा लगेच कोणताही परिणाम जाणवणार नाही. कोणत्याही वादळाची शक्‍यता नाही. वाऱ्याचा वेग मंदावलेला असेल. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून प्रामुख्याने राहील. दुपारचे तापमान वाढत असल्याने हवामान अत्यंत कोरडे राहील. महाराष्ट्रावर ओझोनचे प्रमाण हवेत चांगले राहील. त्यामुळे हवामान उत्तम राहील. कोणत्याही प्रकारचा हवामान बदलाची या आठवड्यात शक्‍यता नाही. सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढेल.

कोकण ः रायगड जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील; तर रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात ते ३० अंश सेल्सिअस राहील व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ होऊन ते ३३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस आणि रायगड व ठाणे जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. रत्नागिरी जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आद्रता ६४ टक्के राहील; तर ठाणे, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ती ८५ ते ८८ टक्के इतकी राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आद्रता ६० टक्के राहील. रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५८ टक्के राहील. वारा शांत राहील व त्याचा वेग ताशी ३ ते ६ किलोमीटर राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील तर उर्वरित रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. उत्तर महाराष्ट्र ः जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. नाशिक, धुळे नंदुरबार जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील; तर नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ टक्के राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ टक्के राहील. जळगाव जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आद्रता २८ टक्के राहील; तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. धुळे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून; तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात ईशान्येकडून राहील.

मराठवाडा ः बीड, नांदेड व जालना जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील आणि उर्वरित सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमानात या आठवड्यात वाढ होईल. लातूर जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअसने वाढेल. नांदेड जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. बीड व जालना जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल. परभणी व हिंगोली जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. परभणी व हिंगोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ टक्के राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यात ती ७३ ते ७९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता लातूर जिल्ह्यात ४३ टक्के; तर नांदेड जिल्ह्यात २७ टक्के राहील; तसेच औरंगाबाद जिल्ह्यात ३० टक्के अाणि उर्वरित जिल्ह्यात ३९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अाग्नेयकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

पश्‍चिम विदर्भ ः पश्‍चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील; तर अमरावती व बुलडाणा जिल्ह्यात १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आद्रता ५५ टक्के राहील. बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात ६० टक्के राहील. बुलडाणा जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ टक्के व उर्वरित जिल्ह्यात १६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा बुलडाणा जिल्ह्यात अाग्नेयेकडून अकोला व वाशीम जिल्ह्यात पूर्वेकडून आणि अमरावती जिल्ह्यात वायव्येकडून राहील.

मध्य विदर्भ ः मध्य विदर्भातील सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील व वर्धा व नागपूर जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ टक्के; तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ६० टक्के राहील. यवतमाळ जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ टक्के व वर्धा व नागपूर जिल्ह्यात २० टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

पूर्व विदर्भ ः पूर्व विदर्भात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील; तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ टक्के; तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः सांगली जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील; तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात किमान तापमान १६ ते १७ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस; तर पुणे व नगर जिल्ह्यात किमान तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. नगर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के राहील. सातारा जिल्ह्यात ८३ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ६९ टक्के आणि सांगली जिल्ह्यात ७२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता पुणे व सांगली जिल्ह्यात ३८ टक्के राहील. नगर जिल्ह्यात ४६ टक्के राहील. सोलापूर व सातारा जिल्ह्यात २९ ते ३० टक्के राहील. कोल्हापूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ टक्के राहील. कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १० किलोमीटर राहील. पुणे व नगर व सातारा जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ४ किलोमीटर राहील. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अाग्नेयकडून राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.   कृषी सल्ला ः

  • उन्हाळी हंगामात हिरव्या चाऱ्यासाठी आफ्रिकन टॉल मक्‍याची लागवड करावी.
  • उन्हाळी भूईमूग, भेंडी, दोडका, कारली, काकडी, कलिंगड या पिकांची लागवड केल्यास वाढ चांगली होईल आणि उत्पादन चांगले मिळेल.
  • ठिबक सिंचन प्रणालीचा उन्हाळी हंगामात उपयोग करा. पाणीबचत होईल, क्षेत्रात वाढ करणे शक्‍य होईल.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ, सदस्य संशोधन परिषद डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अाणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com