Agriculture story in marathi, weekly weather advisory | Agrowon

दक्षिण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही भागांत पावसाची शक्‍यता
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

महाराष्ट्राच्या पश्‍चिम, मध्य व उत्तर महाराष्ट्राच्या भागावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील, तर मराठवाड्याचा पूर्वभाग व विदर्भाचा पूर्वभाग यावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे या आठवड्याच्या सुरवातीपासून थंडीचे प्रमाण सर्व महाराष्ट्रात चांगले राहील. ४ फेब्रुवारीपासून सह्याद्री पर्वतरांगांवर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार असून, वायव्य भारतावर १०१६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार आहे. सध्या वाऱ्याची दिशा वायव्येकडून बऱ्याच जिल्ह्यांत असल्याने थंडीत थोडीफार वाढ अपेक्षित आहे.

महाराष्ट्राच्या पश्‍चिम, मध्य व उत्तर महाराष्ट्राच्या भागावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील, तर मराठवाड्याचा पूर्वभाग व विदर्भाचा पूर्वभाग यावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे या आठवड्याच्या सुरवातीपासून थंडीचे प्रमाण सर्व महाराष्ट्रात चांगले राहील. ४ फेब्रुवारीपासून सह्याद्री पर्वतरांगांवर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार असून, वायव्य भारतावर १०१६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार आहे. सध्या वाऱ्याची दिशा वायव्येकडून बऱ्याच जिल्ह्यांत असल्याने थंडीत थोडीफार वाढ अपेक्षित आहे. ५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे, तसेच वायव्य भारतावर १०१८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढणार असल्याने थंडीत आणखी थोडीफार वाढ अपेक्षित आहे. ६ फेब्रुवारी रोजी ही स्थिती कायम राहील व थंडीचे वाढलेले प्रमाण कायम असेल. रात्री व पहाटे थंडीचे प्रमाण वाढलेले असेल तसेच दिवसा तापमानही थंड राहील.

ईशान्य भारतावरही हवेच्या दाबात वाढ होत आहे. त्याचाही परिणाम थंडीचे प्राबल्य टिकून राहण्यास अनुकूल राहील. उत्तर भारतातील काश्मीर तसेच उत्तर प्रदेशच्या पश्‍चिम भागात ९, १० व ११ फेब्रुवारी रोजी पावसाची शक्‍यता असून, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागावर ८ फेब्रुवारी व मध्य भागावर ९ फेब्रुवारी आणि मुंबईसह उत्तरेकडील पश्‍चिम भागात ११ फेब्रुवारी रोजी अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १७ किलोमीटरपर्यंत राहणे शक्‍य आहे. अरबी समुद्राच्या व बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्यामुळे पूर्वमोसमी पावसाच्या शक्‍यतेत वाढ होईल. या आठवड्यात हवामान कोरडे राहील.

कोकण
कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. रायगड जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस आणि रायगड जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस व सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी जिल्ह्यात ६८ टक्के राहील. रायगड, ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ८१ ते ८३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात ३८ टक्के, ठाणे जिल्ह्यात ४३ टक्के तर रायगड जिल्ह्यात ५८ टक्के इतकी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किलोमीटर राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्वेकडून, तर रत्नागिरी जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. ८ ते ११ फेब्रुवारी काळात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे.

उत्तर महाराष्ट्र
जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्‍य असून, उर्वरित नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५९ टक्के राहील. उर्वरित नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ६९ टक्के राहील. जळगाव जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २० टक्के, तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किलोमीटर राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

मराठवाडा
नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. लातूर, नांदेड व जालना जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील, तर औरंगाबाद, परभणी, बीड या जिल्ह्यांत किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. नांदेड जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के राहील, तर हिंगोली जिल्ह्यात ६५ टक्के इतर राहील. आणि परभणी जिल्ह्यात ६० टक्के इतकी राहील. उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० त ५८ टक्के इतकी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, औरंगाबाद व हिंगोली जिल्ह्यांत २१ ते २४ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे या सर्वच जिल्ह्यांत दुपारी हवामान कोरडे राहील. लातूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १७ किलोमीटर राहील, तर उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १५ किलोमीटर राहील. उर्वरित नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ताशी ११ किलोमीटर, तर औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत ५ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा दक्षिण व नैर्ऋत्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ
अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील, तर वाशीम व अकोला जिल्ह्यांत ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यांत १४ ते १५ अंश सेल्सिअस राहील, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा जिल्ह्यात ५० टक्के राहील, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अग्नेय, नैर्ऋत्येकडून राहील.

मध्य विदर्भ
मध्य विदर्भात कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १३ ते १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. नागपूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के राहील तर यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १८ ते २० टक्के राहील, त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

पूर्व विदर्भ
गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर भंडारा जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. गडचिरोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के राहील. चंद्रपूर जिल्ह्यात ४५ टक्के आणि भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ५० ते ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता भंडारा जिल्ह्यात केवळ १५ टक्के तर उर्वरित जिल्ह्यांत २० टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र
सोलापूर व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. सांगली जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, तर कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान १० ते १३ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअसपर्यंत तर कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पुणे जिल्ह्यात ५१ टक्के सोलापूर व नगर जिल्ह्यांत ६२ टक्के तर सातारा जिल्ह्यात ६८ टक्के राहील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ७१ ते ७२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांत ३१ ते ३३ टक्के राहील तर सांगली व सोलापूर जिल्ह्यांत २२ टक्के आणि नगर जिल्ह्यात ११ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ११ किलोमीटर राहील, तर वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील.

कृषी सल्ला

  • उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत करून घ्यावी. पेरणीसाठी टी.ए.जी.-२४, टी.जी.-२६, जे.एल.-५०१, टी.एल.जी.-४५. एल.जी.एन.-१ यापैकी जातीची निवड करावी. पेरणीपूर्वी बियाण्याला रायझोबियम जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. सारे व पाट पाडावेत व १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • उन्हाळी तिळाची पेरणी ए.के.टी.-१०१ किंवा पी.के.व्ही.एन.टी.-११ यापैकी जातीची निवड करून पेरणी ४५ x १० सें.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास अझॅटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.
  • बाजरी पेरणीसाठी जमिनीची मशागत करावी.
  • ८ ते ११ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण महाराष्ट्रातील हळद लागवडीच्या भागात शिजवलेली हळद एकत्र करून झाकून घ्यावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

इतर ताज्या घडामोडी
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनपावसाने ओढ दिल्याने पेरणीचे नियोजन चुकते. उपलब्ध...
ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रेज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या...
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावेपुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त...
'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम...
बुलडाण्यात यंदाही सोयाबीनवरच जोर राहणारअकोला : गेल्या हंगामात पाऊस व कीड रोगांनी...
नामपूर बाजार समिती निवडणुकीचा प्रचार...नामपूर, जि. नाशिक : येथील नामपूर कृषी उत्पन्न...
कर्जमाफी अर्जातील दुरुस्तीच होईना...पुणे : कर्जमाफीसाठीच्या मुदतवाढीची संधी...
उष्ण वातावरणामुळे केळीबागा संकटातअकोला  ः सतत ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान राहत...
द्राक्षाला वर्षभरासाठी विमा सुरू...सांगली ः एप्रिल छाटणी म्हणजेच खरड छाटणीनंतर...
राज्यात तूर खरेदी पुन्हा सुरू होण्याची...नवी दिल्ली : राज्यात १५ मे पासून बंद झालेली तूर...
पीकविम्याचे निकष बदला; सांगलीत आज...सांगली : अवकाळी पाऊस आणि गारपीट पावसाने द्राक्ष...
भाजपमध्ये येण्यासाठी रांग; निरंजन यांचे...मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश...
कृषिपंपांना भारनियमनाची समस्याजळगाव  ः जिल्ह्यात कृषिपंपांना भारनियमनाचा...
शेतीच्या प्रश्‍नांबाबत...जळगाव : कर्जमाफीचा घोळ, पीककर्ज वितरणाची...
पीकबदल, आंतरपिकामुळे हवामान बदलाचा सामना वाकोडीचे पद्माकर कोरडे यांची सहा एकर शेती....
सेंद्रिय शेती, वाणबदल, यांत्रिकीकरणाचा...आनंद पाटील अनेक वर्षे रासायनिक शेती करीत होते....
तंत्रज्ञानाच्या नियोजनबद्ध वापराने...कैलास, विलास, ईश्वर व किशोर ही निर्मळ कुटुंबातील...
पाण्याचा नियंत्रित वापर, जमिनीच्या...कठोरा (ता. जि. जळगाव) येथील अल्पभूधारक शेतकरी...
भविष्याचा वेध घेत शेतीत करतोय बदलअकोला जिल्ह्यातील चितलवाडी येथील प्रयोगशील शेतकरी...
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...