Agriculture story in marathi, weekly weather advisory | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्‍यता
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई व पालघर जिल्ह्यांवर १०१४ हेप्टापास्कल तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांवर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. तमिळनाडूवरील हवेचे दाब कमी होऊन तेथे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. ११ फेब्रुवारी रोजी कोकण, मुंबई, ठाणे, नाशिक, नंदूरबार, पुणे या जिल्ह्यांवर व प्रदेशावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढल्यामुळे या भागात क्वचितच हवामान बदल जाणवतील. उत्तर भारतावर १०१६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे थंड वारे दक्षिण दिशेने वाहतील.

महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई व पालघर जिल्ह्यांवर १०१४ हेप्टापास्कल तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांवर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. तमिळनाडूवरील हवेचे दाब कमी होऊन तेथे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. ११ फेब्रुवारी रोजी कोकण, मुंबई, ठाणे, नाशिक, नंदूरबार, पुणे या जिल्ह्यांवर व प्रदेशावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढल्यामुळे या भागात क्वचितच हवामान बदल जाणवतील. उत्तर भारतावर १०१६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे थंड वारे दक्षिण दिशेने वाहतील. १२ फेब्रुवारी रोजी हवेचे दाब संपूर्ण महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल आणि उत्तर भारतावर १०१६ हेप्टापास्कल राहण्यामुळे वारे उत्तरेकडून दक्षिण दिशेस वाहतील आणि थंडी कायम राहील. १३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१६ हेप्टापास्कल तर उत्तर भारतात काश्‍मीर, दिल्ली, राजस्थान व उत्तर प्रदेशावर १०१८ हेप्टापास्कल व ईशान्य भारतावर १०२० हेप्टापास्कल राहण्यामुळे थंडीत वाढ होईल. सकाळी व रात्री थंडी जाणवेल. १४ फेब्रुवारी रोजी ही स्थिती कायम राहील. १५ फेब्रुवारी रोजी थंडीत झालेली वाढ आणि किमान तापमानात होणारी घसरण कायम राहील. ११ ते १४ फेब्रुवारीचे काळात दक्षिण व मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाडा व विदर्भावर मोठ्या प्रमाणात ढग जमतील आणि पावसाची शक्‍यता निर्माण होईल, तर १६ फेब्रुवारी रोजी मुंबई, नंदुरबार भागांवर ढग जमतील आणि अल्पशा पावसाची शक्‍यता निर्माण होईल. मध्य व पूर्व विदर्भात १२ फेब्रुवारी रोजी पावसाचे प्रमाण अल्पसे राहून गारपिटीची शक्‍यता निर्माण करेल. एकूणच संपूर्ण हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने तसेच हे तापमान सरासरी तापमानापेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने अधिक असल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होऊन ढगनिर्मितीस चालना मिळाल्याने पावसाची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच ११ व १२ फेब्रुवारी रोजी मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाची शक्‍यता आहे.

१) कोकण ः
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील, तर ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि रायगड जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस व सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत दिनांक ११ रोजी आकाश पूर्णतः ढगाळ राहील, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. रायगड जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ टक्के राहील, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ६१ ते ६५ टक्के व ठाणे जिल्ह्यात ५५ टक्के राहील. सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २९ टक्के राहील, तर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत ४६ ते ५० टक्के राहील. रायगड व पुणे जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २ किलोमीटर राहील आणि सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत तो ७ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैर्ऋत्येकडून राहील.

२) उत्तर महाराष्ट्र ः
उत्तर महाराष्ट्रात या आठवड्यात पावसाची शक्‍यता नाही आणि वाऱ्याची दिशा प्रामुख्याने अाग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नाशिक जिल्ह्यात २ किलोमीटर व उर्वरित जिल्ह्यांत ४ ते ५ किलोमीटर राहील. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर उर्वरित नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ताशी ३१ किलोमीटर राहील. धुळे जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित नाशिक, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ते १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३७ टक्के इतकी कमी राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते २२ टक्के इतकी कमी राहील व हवामान कोरडे राहील.

३) मराठवाडा ः
मराठवाड्यात दिनांक ११ व १२ रोजी अल्पशा पावसाची शक्‍यता तुरळक ठिकाणी राहील. वाऱ्याची दिशा अाग्नेयेकडून राहील. औरंगाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ३ किलोमीटर राहील तर उर्वरित जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १२ किलोमीटर राहील. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. परभणी जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील, तर लातूर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश दिनांक ११ व १२ रोजी पूर्णतः ढगाळ राहील. हिंगोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४६ टक्के राहील, तर औरंगाबाद जिल्ह्यात ६५ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५९ टक्के राहील. जालना व बीड जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ३७ टक्के राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ टक्के राहील. उस्मानाबाद, लातूर व औरंगाबाद जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते १७ टक्के इतकी कमी राहील व हवामान कोरडे राहील.

४) पश्‍चिम विदर्भ ः
अकोला व अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. अमरावती जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४९ टक्के राहील. अकोला जिल्ह्यात ६५ टक्के व बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता अकोला जिल्ह्यात २० टक्के राहील, तर वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांत २४ टक्के आणि अमरावती जिल्ह्यांत २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत अाग्नेयेकडून राहील, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

५) मध्ये विदर्भ ः
वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. यवतमाळ जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे.

६) पूर्व विदर्भ ः
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्‍यता आहे, तर उर्वरित भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतही अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा दक्षिणेकडून राहील, तर गडचिरोली जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून व भंडारा जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ते १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. भंडारा जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत ७० ते ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते ३८ टक्के राहील.

७) दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्‍यता असून, उर्वरित जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील, तर सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत अाग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते १० किलोमीटर राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. सांगली, पुणे व नगर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस, नगर जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील, तर उर्वरित जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नगर जिल्ह्यात ३३ टक्के, सांगली जिल्ह्यात ४६ टक्के, पुणे जिल्ह्यात ४८ टक्के तर कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ५२ ते ५९ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पुणे जिल्ह्यात १६ टक्के व उर्वरित जिल्ह्यांत २१ ते २४ टक्के राहील.
 
कृषी सल्ला ः

  • दिनांक ११ व १२ फेब्रुवारी रोजी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर तसेच मराठवाडा, मध्य व पूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन काढणी केलेल्या पिकांची योग्य ठिकाणी साठवण करावी. विशेषतः रब्बी ज्वारी व हरभरा पिकाच्या काढणी व मळणीनंतर मालाची साठवण शेतात करायची झाल्यास ताडपत्रीने माल झाकून घ्यावा.
  • सातारा, सांगली व मराठवाड्यातील जिल्ह्यांतील हळदीची काढणी करून उन्हात वाळत घातली असल्यास हळद गोळा करून ती प्लास्टिक कागदाने किंवा ताडपत्रीने हळदीचे ढीग झाकून घ्यावेत.
  • काढणीस आलेला भाजीपाला त्वरित काढून घ्यावा व बाजारात विक्री करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...