Agriculture story in marathi, weekly weather advisory | Agrowon

थंडी कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागेल
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

महाराष्ट्रासह, मध्यभारत, पश्‍चिम व पूर्व किनारपट्टीवर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील आणि तो कमी झालेला असेल. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होईल आणि किमान व कमाल तापमानात वाढ झाल्याचे आढळून येईल. १८ फेब्रुवारी रोजी उत्तर भारतातील हिमालयाच्या पायथ्यास १०१२ हेप्टापास्कल इतका तर केरळजवळ १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे या आठवड्यात कमाल व किमान तापमान वाढण्यास सुरवात होऊन थंडी आणखी कमी कमी होण्यास सुरवात झालेली असेल.

महाराष्ट्रासह, मध्यभारत, पश्‍चिम व पूर्व किनारपट्टीवर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील आणि तो कमी झालेला असेल. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होईल आणि किमान व कमाल तापमानात वाढ झाल्याचे आढळून येईल. १८ फेब्रुवारी रोजी उत्तर भारतातील हिमालयाच्या पायथ्यास १०१२ हेप्टापास्कल इतका तर केरळजवळ १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे या आठवड्यात कमाल व किमान तापमान वाढण्यास सुरवात होऊन थंडी आणखी कमी कमी होण्यास सुरवात झालेली असेल. १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण पश्‍चिम किनारपट्टीवर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होऊन पूर्व उत्तर भारतातील हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल इतका कमी राहून वारा शांत राहील.

थंडीचे प्रमाण सौम्य राहील. २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रावरील हवेचा दाब वाढेल आणि तो १०१२ हेप्टापास्कल इतका राहील. सकाळी, रात्री व पहाटे थंडी जाणवेल. संपूर्ण मध्य भारतापासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत समान हवेचा दाब राहील, मात्र त्याचवेळी तमिळनाडू व केरळवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. त्याचवेळी राजस्थानवर १०१४, तर ईशान्य भारतावरही तितकाच हवेचा दाब राहील. २१ फेब्रुवारी रोजी हवामान स्थिती कायम राहील. २२ फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतावर हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल इतका समान राहील. तर केवळ ईशान्य भागात तो १०१६ हेप्टापास्कल इतका राहील. या हवामान स्थितीत हिवाळा संपत आल्याची चाहूल लागेल. हवामान कोरडे राहील.

पावसाची शक्‍यता नाही. दक्षिण अरबी समुद्राच्या व हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल आणि ते ३ अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा अधिक राहील. हवामान बदल लगेच जाणवणार नाहीत मात्र भावी काळातील हवामान बदलाची ही नांदी राहील. कोणत्याही प्रकारचा हवामानबद्दल इशारा नाही. उन्हाळी पिकांच्या पेरणी व लागवडीस हवामान अनुकूल राहील.

कोकण
ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान वाढले आणि ते ३७ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस आणि रायगड जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात किमान तापमानातही वाढ होईल आणि ते २३ अंश सेल्सिअस राहील व रायगड जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. ठाणे जिल्ह्यात कमाल व किमान तापमान वाढण्यामुळे सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रतेत घट होईल आणि ती ५८ टक्के राहील आणि १८ टक्के इतकी कमी राहील त्यामुळे हवामान कोरडे राहील. उर्वरित जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६८ टक्के इतकी राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते २७ टक्के इतकी राहील आणि दुपारी हवामान कोरडे राहील. वारा शांत असेल. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ३ ते ४ किलोमीटर राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात वारा ईशान्येकडून वाहील, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील, तर नंदूरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील, तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ टक्के राहील, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३२ ते ३५ टक्के राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २० टक्के राहील, तर जळगाव जिल्ह्यात २१ टक्के व नाशिक जिल्ह्यात २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३ किलोमीटर राहील व धुळे आणि नाशिक जिल्ह्यांत ४ ते ६ किलोमीटर राहील. जळगाव जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील.

मराठवाडा
नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. जालना, औरंगाबाद व लातूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. लातूर जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील, तर परभणी जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस व हिंगोली, जालना, नांदेड व बीड जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस आणि औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. उर्वरित जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ टक्के राहील, तर लातूर जिल्ह्यात ३६ टक्के राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ३८ ते ३९ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २४ टक्के राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १० किलोमीटर राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ४ ते ६ किलोमीटर जालना जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून औरंगाबाद जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत अग्नेयेकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ
अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर अमरावती जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. अमरावती जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस आणि वाशीम जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ किलोमीटर राहील. अमरावती जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ती अग्नेयेकडून राहील.

मध्य विदर्भ
यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील व वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ४९ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

पूर्व विदर्भ
गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील आणि गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान १६ ते १७ अंश सेल्सिअस राहील, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४७ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५६ ते ५९ टक्के राहील. भंडारा जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० टक्के राहील, तर चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत २५ ते २८ टक्के राहील. भंडारा जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १५ किलोमीटर राहील, तर उर्वरित जिल्ह्यात तो ३ किलोमीटर राहील. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील, तर गडचिरोली जिल्ह्यात पूर्वेकडून व भंडारा जिल्ह्यात ईशान्येकडून राहील.

दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र
सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. सांगली व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील; सोलापूर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत १८ ते १९ अंश सेल्सिअस आणि नगर व पुणे जिल्ह्यांत १४ ते १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ६२ टक्के राहील. सातारा व पुणे जिल्ह्यात ती ५२ ते ५८ टक्के राहील आणि उर्वरित सांगली, नगर व सोलापूर जिल्ह्यात ३९ ते ४२ टक्केच राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा कोल्हापूर जिल्ह्यात अग्नेयेकडून, तर उर्वरित सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील.

कृषी सल्ला

  • उन्हाळी हंगामाची चाहूल लागताच उन्हाळी पिकांच्या पेरण्या करून घ्याव्यात. पेरणीनंतर सारे व पाट पाडावेत. उसासारख्या पिकास शक्‍यतो ठिबक सिंचन प्रणालीने पाणी द्यावे.
  • हरभरा, रब्बी ज्वारी, तूर ही पिके परिपक्व झाली असल्यास काढणी करून, मळणी करून धान्य सुरक्षित ठिकाणी साठवावे.
  • रब्बी पिकांच्या काढण्या होताच जमिनीची नांगरट करावी व जमीन तापू द्यावी.
  • कांदा चाळीत कांदा साठवून ठेवावा.
  • हळद काढणीनंतर गड्डे सावलीत ढीग करून ठेवावेत.

 (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ संशोधन परिषद डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अाणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी)
 

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...