उत्तर महाराष्ट्रात बुधवार ते शुक्रवारपर्यंत पावसाची शक्‍यता

अाठवड्याचे हवामान
अाठवड्याचे हवामान

महाराष्ट्रासह भारतावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे उत्तरेकडून आणि पश्‍चिमेकडून येणारे ढग दक्षिणेकडे येतील. विशेषतः अफगाणिस्तान आणि राजस्थानवर पश्‍चिमी चक्रावाताचा प्रभाव वाढत असून येणारे थंड वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतील आणि प्रथम गुजरात आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्र या दिशेने ढग येतील. त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्रावर २०१२ तर काश्मीरवर १०१४ आणि ईशान्येस १०१६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. उत्तर भारतात व ईशान्य भारतात हवेचे दाब अधिक राहण्यामुळे वारे उत्तर व इशान्येकडून महाराष्ट्राच्या दिशेने वाहतील. पुन्हा २६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होत असून १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण दिशेने मध्यावर राहील. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी तितकाच हवेचा दाब राहील

मात्र राजस्थानवर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे ढग वाहून आणतील. २८ फेब्रुवारी रोजी अरबी समुद्र व लक्षद्वीप बेटांच्या जवळ हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. तसेच केरळ, कर्नाटकमध्येही हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र राहील. याच काळात अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान तसेच हिंदी महासागर व बंगालचा उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढलेले असेल. याचा परिणाम २३ फेब्रुवारीपासूनच दिसू लागले. २४ व २५ फेब्रुवारी रोजी हवामान बदल जाणवतील. वादळी वारे उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, नाशिक, धुळे, जळगाव, अमरावती जिल्ह्यांत जाणवेल आणि अल्पशा पावसाची शक्‍यता राहील. पुढेही शक्‍यता राहील.

कोकण रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते सर्वाधिक ३७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. रायगड व ठाणे जिल्ह्यात मात्र कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस इतके कमी राहील. रायगड जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात ते २२ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील तर उर्वरित जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ टक्के राहील तर रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४ ते ७० टक्के इतकी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २४ टक्के इतकी सर्वच जिल्ह्यात राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील आणि पावसाची शक्‍यता पालघर जिल्ह्यात दिनांक २८ फेब्रुवारी रोजी राहील.

उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात किमान तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील; तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील, तर नंदूरबार जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. जळगाव जिल्ह्यात ५३ टक्के सकाळची सापेक्ष आर्द्रता राहील. तर नंदूरबार, धुळे, नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात केवळ २३ टक्के आणि नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात १६ ते १७ टक्के राहील. त्यामुळे हवामान दुपारी अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात इशान्येकडून तर धुळे व जळगाव जिल्ह्यात अग्नेयेकडून राहील. नाशिक जिल्ह्यात ६ मिलिमीटर, धुळे जिल्ह्यात ८ मिलिमीटर व जळगाव - नंदूरबार जिल्ह्यात ७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता २५ फेब्रुवारी रोजी राहील. तशीच शक्‍यता २८ फेब्रुवारी रोजी राहील आणि १ व २ मार्च रोजी अल्पशा पावसाची शक्‍यता राहील.

मराठवाडा उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. लातूर, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान औरंगाबाद जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. लातूर व बीड जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील तर उर्वरित जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. लातूर व जालना जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७०९ ते ७३ टक्के राहील आणि नांदेड जिल्ह्यात ६६ टक्के राहील व उस्मानाबाद जिल्ह्यात ६२ टक्के राहील. तसेच बीड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यात ५२ ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता लातूर व नांदेड जिल्ह्यात १४ टक्के राहील व बीड जिल्ह्यात १५ टक्के राहील. परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ टक्के राहील. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १३ किलोमीटर राहील तर उर्वरित जिल्ह्यात ५ ते ८ किलोमीटर ताशी राहील. वाऱ्याची दिशा अाग्नेयेकडून राहील व पावसाची शक्‍यता नाही.

पश्‍चिम विदर्भ सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम व अमरावती जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस आणि बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस आणि बुलडाणा व अकोला जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्हा वगळता आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ५० टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ७ किलोमीटर राहील व वाऱ्याची दिशा अाग्नेयेकडून राहील. २५ रोजी २ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे.

मध्य विदर्भ वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४६ ते ५० टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते २८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अाग्नेयेकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

पूर्व विदर्भ गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील आणि चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील तर उर्वरित जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५२ टक्के तर चंद्रपूर जिल्ह्यात ६० टक्के व गडचिरोली जिल्ह्यात ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते ३२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किलोमीटर राहील. भंडारा जिल्ह्यात वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. भंडारा जिल्ह्यात २५ रोजी ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील तर पुणे जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. सांगली, सातारा व सोलापूर कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील तर कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील, सांगली जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, सातारा व सोलापूर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, पुणे जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस आणि नगर जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस राहील. सातारा, पुणे व नगर जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील तर उर्वरित जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सोलापूर जिल्ह्यात ५३ टक्के, नगर जिल्ह्यात ३३ टक्के, पुणे जिल्ह्यात ६३ टक्के राहील. सातारा जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ टक्के राहील तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ७१ ते ७५ टक्के राहील तर सापेक्ष आर्द्रता पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यात १५ ते १७ टक्के राहील. तर उर्वरित जिल्ह्यात २४ ते २६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने अाग्नेयेकडून राहील.   कृषी सल्ला

  • पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन शेतमाल उघड्यावर न ठेवता सुरक्षित स्थळी ठेवावा.
  • भाजीपाला व फळपिके काढणीस आली असल्यास काढणी करून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावी.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अाणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ,परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com