Agriculture story in marathi, weekly weather advisory, Dr. Ramchandra Sable | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात बरसेल परतीचा मॉन्सून
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

परतीचा माॅन्सून मराठवाड्याचा भाग वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच भागांत तुरळक ठिकाणी  राहील. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यच राहील. त्यामुळे पावसाचा जोर फारसा राहणार नाही.

राजस्थान ते श्रीनगर आणि राजस्थान ते गुजरातचा पश्‍चिमेकडील भाग या भागावर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे तेथील पाऊस थांबेल. मात्र हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिणेकडील तमिळनाडूपर्यंत १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे.

परतीचा माॅन्सून मराठवाड्याचा भाग वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच भागांत तुरळक ठिकाणी  राहील. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यच राहील. त्यामुळे पावसाचा जोर फारसा राहणार नाही.

राजस्थान ते श्रीनगर आणि राजस्थान ते गुजरातचा पश्‍चिमेकडील भाग या भागावर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे तेथील पाऊस थांबेल. मात्र हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिणेकडील तमिळनाडूपर्यंत १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे.

महाराष्ट्राचा कोकणपट्टीचा पश्‍चिम भाग आणि पश्‍चिम कर्नाटक व केरळच्या भागावरही १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे तेथेही पावसाचे प्रमाण कमी होईल. ता. १ ऑक्‍टोबर रोजी या स्थितीत बदल होऊन पश्‍चिम महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होईल. मात्र उत्तर महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्यांच्या पूर्व भागावर हवेचा दाब १००६ हेप्टापास्कल इतका कमी राहील. ता. १ ऑक्‍टोबर रोजी बंगालचा उपसागर, हिंदी महासागर या भागांवर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे वारे दक्षिणेकडून भारताच्या भागात मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून आणतील. बंगालच्या उपसागरावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव वाढेल. पूर्वेकडील उत्तर भारतापासून दक्षिणेपर्यंत हवामान बदल जाणवतील.

ऑक्‍टोबर महिन्यात हवामान बदलामुळे भारताच्या पूर्वभागात चांगल्या पावसाची शक्‍यता निर्माण होईल. मात्र या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहील. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पश्‍चिम भागातील काही भाग व मराठवाडा भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात या आठवड्यात हलक्‍या पावसाची शक्‍यता राहील. ता. ३० रोजी दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहील. ऑक्‍टोबर महिन्यात ता. ४ व ५ रोजी पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक राहील. ता. १ ते ७ ऑक्‍टोबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात हलक्‍या स्वरूपात पावसाची शक्‍यता राहील.

मराठवाड्याचा भाग वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच भागांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता राहील. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यच राहील. त्यामुळे पावसाचा जोर फारसा राहणार नाही. पावसाचे प्रमाण केवळ ३० सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगलीचा पूर्व भाग, साताऱ्याचा पूर्व भाग, सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात अधिक राहील. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी म्हणजे अल्प प्रमाणात राहील. मराठवाड्यात प्रमाण कमी राहील.

कोकण

कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक ३० रोजी २० ते २५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, रायगड जिल्ह्यात ७ मिलिमीटर तर ठाणे जिल्ह्यात केवळ १ मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील. कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. ता. ३० सप्टेंबरनंतर कोकणातील पावसाचे प्रमाण कमी होईल.  

उत्तर महाराष्ट्र

या आठवड्यात पावसाची शक्‍यता कमी राहील. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक व धुळे जिल्ह्यांत किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.  

पश्‍चिम महाराष्ट्र

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २५ ते २९ मिलिमीटर व सातारा जिल्ह्यात २० मिलिमीटर, सोलापूर जिल्ह्यात १० मिलिमीटर व पुणे जिल्ह्यात १५ मिलिमीटर आणि नागपूर जिल्ह्यात ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता. ता. ३० सप्टेंबर रोजी राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्यात ता. ३० सप्टेंबर रोजी केवळ १ मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता नाही. उघडीप राहणे शक्‍य आहे. हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील तर परभणी जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित लातूर, नांदेड, बीड व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.  

पश्‍चिम विदर्भ

पश्‍चिम विदर्भात या आठवड्यात पावसाची शक्‍यता कमी राहील. अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित बुलडाणा जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस आणि अकोला व वाशीम जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अमरावती जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस आणि बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यात ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

मध्य विदर्भ

नागपूर जिल्ह्यात अत्यल्प २ मिलिमीटर पावसाची शक्‍यता ता. ३० सप्टेंबर रोजी राहील. यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता कमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात ते ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.  

पूर्व विदर्भ

या आठवड्यात पूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता नाही. चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील तर गडचिरोली जिल्ह्यात ते ३५ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

कृषी सल्ला

  • मूग, मटकी, चवळी, उडीद, सोयाबीन, घेवडा या पिकांची काढणी करून धान्य सुरक्षित स्थळी ठेवावे.
  • हळव्या भाताच्या जातींची कापणी करून झोडणी करून धान्य सुरक्षित स्थळी ठेवावे.
  • काढणी केलेले धान्य उन्हात वाळवावे.  
  • करडई व रब्बी ज्वारीची पेरणी चांगल्या ओलाव्यावर करून सारे व पाट पाडावेत.
  • हरभरा पिकाची पेरणी योग्य ओलीवर करावी.

- डॉ. रामचंद्र साबळे
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

 

इतर अॅग्रो विशेष
काळी आई आणि तिच्या लेकरांवर प्रेम करा४ ऑगस्टच्या ‘अॅग्रोवन’मध्ये तीस वर्षे सतत फ्लॉवर...
युरियाचा वापर हवा नियंत्रितचपंधरा दिवसांच्या उघडिपीनंतर राज्यात पावसाने दमदार...
कृषी आयुक्तांकडून डाळिंबावरील रोगाचा...सांगली ः राज्यातील आंबे बहारातील डाळिंबावर तेलकट...
केरळात पावसाचा जोर कमी; मदतकार्यात वेगतिरुअनंतपुरम/कोची  : दोन दिवसांपासून पावसाचा...
यवतमाळ जिल्ह्यात सोळा कृषी केंद्रांचे...यवतमाळ : कीटकनाशक खरेदी केलेल्या एजन्सीचे डीलरचे...
पिकं हातची गेली, शिवारात फक्त हिरवा पालापावसाचा खंड २२ ते २४ दिवसांचा राहिला. हव्या...
स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूर देशात दुसरेसोलापूर  : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८'...
खान्‍देशातील तीन प्रकल्प भरलेजळगाव : मागील आठवड्यात झालेल्या पावसाने खान्‍...
कापसातील कृत्रिम मंदीचा फुगा फुटलाजळगाव ः सरकीच्या वायदे बाजारातील सटोडियांनी...
गडचिरोली, नांदेडमध्ये दमदार पाऊस पुणे : विदर्भातील गडचिरोली, मराठवाड्यातील नांदेड...
‘ग्लायफोसेट’ धोकादायक की सुरक्षित? पुणे: अमेरिकेतील एका न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या...
अळिंबी उत्पादन, मूल्यवर्धन,...पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा भात उत्पादनासाठी...
जिद्द द्राक्षबाग फुलवण्याची नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक...
मराठवाडयात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भावपरभणी : सलग तीन आठवडे  पावसाचा खंड आणि...
पर्यावरणपूरक अक्षय ऊर्जा फायदेशीर देशात उपलब्ध अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपैकी...
अस्मानी कहरराज्यात जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑगस्टचा पहिला...
देशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे...२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे...
नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...
केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...
मोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...