विविध अाजारावर प्रभावी खडीसाखर, अाळीव
कीर्ती देशमुख
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

साध्या साखरेपेक्षा खडीसाखर आरोग्यासाठी लाभदायक असते. खडीसाखरेमध्ये गोडवा आणि थंडावा असे दोन्ही गुण असतात. खडीसाखर गोड असल्याने ती ग्लुकोजचे रूपांतर शरीराला ऊर्जा देण्यासाठी करते. अाळीवाच्या बिया आकाराने लहान असून, त्यांचा रंग लालसर असतो. या बियांना औषधी महत्त्व आहे.

खडीसाखर

 • घसा खराब झाल्यावर तो खूप दुखतो तेव्हा साखर खाल्ल्याने आराम मिळतो.
 • स्मरणशक्ती वाढते आणि शरीराला थंडपणा मिळतो.
 • खोकला किंवा घसा खवखवत असेल तर अशा वेळी खडीसाखरेचे सेवन लाभदायक असते.  

उष्णतेवर प्रभावी

साध्या साखरेपेक्षा खडीसाखर आरोग्यासाठी लाभदायक असते. खडीसाखरेमध्ये गोडवा आणि थंडावा असे दोन्ही गुण असतात. खडीसाखर गोड असल्याने ती ग्लुकोजचे रूपांतर शरीराला ऊर्जा देण्यासाठी करते. अाळीवाच्या बिया आकाराने लहान असून, त्यांचा रंग लालसर असतो. या बियांना औषधी महत्त्व आहे.

खडीसाखर

 • घसा खराब झाल्यावर तो खूप दुखतो तेव्हा साखर खाल्ल्याने आराम मिळतो.
 • स्मरणशक्ती वाढते आणि शरीराला थंडपणा मिळतो.
 • खोकला किंवा घसा खवखवत असेल तर अशा वेळी खडीसाखरेचे सेवन लाभदायक असते.  

उष्णतेवर प्रभावी

 • उन्हाळ्यात सरबतात खडीसाखर विरघळून प्यायल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो.  
 • तोंड आल्यास वेलदोडा आणि खडीसाखर एकत्र करून त्याचा लेप बनवा. हा लेप तोंडात लावल्यास तोंड अालेले लवकर बरे होते.
 • नाकाचा घोळणा फुटणे- उन्हाळ्यात नाकातून रक्त येते, त्यासाठी खडीसाखरेच्या पाण्याचा वास घेतल्यास फायदा होतो.
 • लोणी आणि खडीसाखर हे समप्रमाणात घेऊन हात आणि पाय यांना लावल्यास जळजळ कमी होते.

 रक्ताल्पता  

 • केशर आणि खडीसाखर घालून कोमट दूध प्यायल्याने शरीराला शक्ती मिळते. त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
 • हात किंवा पायांची जळजळ होत असल्यास लोणी आणि खडीसाखर समप्रमाणात घेऊन हात आणि पायांना लावावी.

 आळीव

 • बियांमध्ये ८० ते ८५ टक्के एंडोस्पर्म ११ ते १७ टक्के कोंडा आणि २ ते ३ टक्के एम्ब्रीयो असतो.
 • बियांमध्ये म्यूसिलेजस असल्यामुळे त्या पाण्यात भिजवल्यास त्यांचा पृष्ठभाग चिकट होतो.
 • पाने व मुळांना विशिष्ट वास असल्यामुळे त्यांचा वापर मसाल्यामध्ये करतात.
 • बियांचा वापर सॅलड आणि कॉटेज चीजमध्ये केला जातो.
 • बिया कडवट असतात. अस्थमा, कफ, कुष्ठरोग, त्वचेचे विकार, आमांश, जुलाब, लचक भरणे, क जीवनसत्त्वाचा अभाव, अपचन या आजारांत बियांचा वापर लाभदायक आहे.
 • आळीवाची मुळे कडू व तिखट असून, उष्णतेच्या आजारात लाभदायक आहेत.
 • बिया फुफ्फुसाची कार्य सुधारण्यात मदत करतात. बियास मसाल्याचा सुगंध असून चव तिखट आहे.
 • आळीव तेलामध्ये सिस्टोस्टेरॉल व अवेनास्टेरॉल हे फायटोस्टेरॉल या संवर्गातील घटक आढळतात. आळीव तेलातील स्निग्ध आम्लामध्ये मुख्यत्वे ओलेझक, लिनोलीनिक व लिनोलेइक आम्ल मुख्य घटक आहेत.
 • डोळे व हृदयाच्या विकारात फायदेशीर असणारे ल्युटीन व झियाझांथीन हे दोन कॅरोटिनाईड हे रासायनिक घटक  उच्च प्रमाणात असतात.
 • नियमितपणे अाळीवचे सेवन केल्याने रक्तक्षय बरा होण्यास मदत होते. आळीव बिया व मध यांची पेस्ट करून घेतल्यास आमांश बरा होतो. कोंब आलेल्या आळीव बिया खाल्ल्यास आमांश व जुलाबामध्ये आतड्यांचा दाह कमी होण्यास मदत होते.
 • स्तनदा मातांसाठी आळीव जीवनसत्त्व व खनिजांचा चांगला स्रोत आहे.
 • आळीवमध्ये गोंदाचे प्रमाण चांगले असते. याचा वापर गम अरेबिक व ट्रँगाकांथ या उच्च कर्बोदकांसाठी पूरक म्हणूनही केला जातो.

संपर्क ः  कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३
(विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

इतर महिला
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
आरोग्याच्या दृष्टीने अभ्यंगाचे महत्त्वविविध आजारांत जसे अभ्यंगाचे चांगले परिणाम दिसून...
मसाला उद्याेगातून भारतीताईंनी साधला ’...काळा मसाल्यासोबत शेंगा, कारळा, जवस चटण्यांचे...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अभियान का...नाशिक : ‘‘शेती नीट पिकत नाही. पाणीही कमीच आहे. आई...
सतत ढेकर येण्याची कारणेउत्तम जेवण झाल्यावर ‘ढेकर येणे'' हे व्यवस्थित पोट...
पित्तशामक कोकमकोकममध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतुमय...
महिला बचत गटाने सुरू केली शेतकरी कंपनीबचत गटाच्या माध्यमातून शिक्रापूर (जि. पुणे)...
ऑक्‍टोबरमधील उष्णतेमुळे होणारे...ऑक्‍टोबर महिन्यात वातावरणात प्रचंड उष्णता...
विविध अाजारावर प्रभावी खडीसाखर, अाळीवसाध्या साखरेपेक्षा खडीसाखर आरोग्यासाठी लाभदायक...
कृमीजन्य अाजाराची लक्षणेकोणत्याही अाजारात पथ्यपालन महत्त्वाचे असतेच. काही...
सुतार कामातून सरिताताईंनी दिला संसाराला...पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या सुतारकामामध्ये सौ....
उपवासामध्ये सांभाळा आरोग्यधार्मिक भावनेने उपवास करताना शारीरिक आरोग्यही...
अाैषधी म्हणूनही उपयुक्त मिरे, वेलचीस्वयंपाकात गरम मसाल्याचा वापर होत असतो. फक्त...
शिवणकलेने दाखविला आर्थिक प्रगतीचा मार्गपरभणी शहरात शिवणकाम करणाऱ्या महिलांनी एकत्र येत...
बालकांना द्या पौष्टिक पूरक आहारपाच वर्षांच्या खालील ७५ टक्के मुले कुपोषित अाहेत...
वैशालीताईंनी तयार केला ‘गोधन' ब्रॅंड सोलापुरातील सौ. वैशाली कुलकर्णी यांचे वय वर्षे ६३...
थेट भाजीपाला विक्रीतून चंद्रकलाताईंनी...नेऊरवाडा (ता. पारशिवणी, जि. नागपूर) येथील...
सौंदर्यवर्धक, वेदनाशामक ब्राह्मी,...त्वचाविकार अाणि केसांच्या अारोग्यासाठी ब्राह्मी...