Agriculture story in marathi, womens health | Agrowon

त्वचेच्या आरोग्यासाठी साबणाला उत्तम पर्याय उटणे
डाॅ. विनीता कुलकणीर्
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

गांधी उठणे, खाज येणे, त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर फोड येणे, काळवंडणे इत्यादी स्वरूपात त्वचेचे आरोग्य बिघडते. अनेक जण त्वचा उत्तम राहावी म्हणून विविध साबण वापरतात. पण त्याऐवजी उटणे वापरले तर निश्‍चित लाभदायक ठरते.

गांधी उठणे, खाज येणे, त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर फोड येणे, काळवंडणे इत्यादी स्वरूपात त्वचेचे आरोग्य बिघडते. अनेक जण त्वचा उत्तम राहावी म्हणून विविध साबण वापरतात. पण त्याऐवजी उटणे वापरले तर निश्‍चित लाभदायक ठरते.

नुकतीच दिवाळी झाल्यामुळे प्रत्येक घरी ताजे उटणे असणारच! पण दिवाळी झाली की उटणे बाजूला ठेवून पुन्हा विविध साबण वापरण्यास सुरवात होते. खरं तर त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी उटणे अतिशय उपयुक्त असते. साधारण सप्टेंबर संपून ऑक्‍टोबर महिना सुरू झाला की हवेत बदल होतात. कधी खूप उष्णता तर कधी थंडीची चाहूल तर कधी परतीच्या पावसाचे ढगाळ वातावरण! या कारणांनी शारीरिक अनारोग्याप्रमाणेच त्वचेलाही त्रास होतो. प्रकृतीनुरूप त्रासाचे स्वरूप भिन्न असते.

स्थूल व्यक्तीमध्ये घाम येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. कधी कधी दुर्गंधही येतो. अशावेळी उटणे लावून स्नान केले तर उपयोग होतो. काही आरोग्याच्या बाबतीत दक्ष असणारे रोज अंघोळीच्या आधी तेल लावतात. पण साबण लावून स्नान केल्यानंतर मात्र त्वचेचा तेलकटपणा पूर्णपणे जातो. पुन्हा त्वचा कोरडी होते. हे टाळण्यासाठी उटणे जरुर वापरावे.

त्वचेसाठी परिपूर्ण उटणे

  • उटण्यामध्ये विविध वनौषधी एकत्र केलेल्या असतात. ज्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. साधारणपणे चंदन, अनंतमूळ, वाळा, गुलाब पुष्पचूर्ण, नागरमोथा, जेष्ठ मध इ. औषधी चूर्णांचे मिश्रण उटण्यात वापरतात. प्रत्येकाचे प्रमाण भिन्न असते. अनंतमूळ रक्तदुष्टीमुळे निर्माण झालेली लक्षणे कमी करते. ज्यामुळे काळवंडलेपणा, त्वचेचा रापलेपणा कमी होतो. नागरमोथा खाज कमी करते. मेदामुळे जो चिकटपणा आलेला असतो तो दूर करतो. ज्येष्ठ मधामुळे त्वचा मुलायम होते.
  • बाह्य वातावरणामुळे किंवा उष्ण प्रकृतीमुळे त्वचेची आग होते. अशावेळी उटण्यातील चंदन उत्तम कार्य करते. वर्ण सुधारतो. सूर्यकिरणांचा अनेकांना त्रास होतो. त्वचा काळवंडते, अशावेळी चंदन काम करते. शिवाय ते सुगंधी असल्याने घामामुळे येणारी दुर्गंधी नाहीशी होते.
  • चंदन थंड गुणात्मक असल्याने त्वचेची होणारी आग तर कमी होतेच, पण उष्णतेचे फोडही कमी होतात.
  • काही जणांना अतिशय घाम येऊन घामोळे येण्याची तक्रार असते. उटण्यातील वाळा पावडर अति घाम आणि दुर्गंधी कमी करते. घामोळे कमी करते.
  • गुलाब पुष्पचूर्ण अतिशय थंड, गुणात्मक, सुगंधी असल्याने त्वचेला नैसर्गिक सुगंध येतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आग कमी होते. उटण्यातील सर्वच औषधी या त्वचेचे आरोग्य सुधारणाऱ्या असतात.
  • हिवाळ्यात बोचणारे गार वारे असते. त्यामुळे त्वचा कोरडी पडून पांढरट होते. त्या दिवसात रोज तेल लावून साबण न लावता उटणे लावावे. त्यामुळे संपूर्ण तेल निघून न जाता थोडे त्वचेवर राहून स्निग्धत्व टिकून राहते, उटणे कोमट पाण्यात कालवून लावावे.
  • स्थूल व्यक्तींनी उटण्याची कोरडी पावडर त्वचेवर जोरात चोळून लावावी, त्यामुळे दुर्गंध चिकटपणा कमी होतो. चेहरा काळवंडल्यास उटणे दुधात कालवून लेप लावावा आणि वाळल्यानंतर काढून टाकावा.

उटणे केव्हा वापरू नये
त्वचेवर पूयुक्त फोड असताना, कांजिण्यासमान पाण्याचे फोड असताना लावू नये. प्रथम पोटात औषधे घेऊन फोड बरे करावेत, नंतर उटणे लावावे.

घेण्याची काळजी

  • चांगल्या प्रतीचे उटणे वापरावे, वनौषधी चांगल्या प्रतीच्या स्वच्छ असाव्यात. उटणे उघडे न ठेवता बाटलीत ठेवावे. लेप म्हणून वापरण्याआधी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा.
  • एखाद्या त्वचाविकारावर उटणे हे औषध नाही. त्यासाठी औषधे पोटात घ्यावीत आणि जोडीला साबणाला पर्याय म्हणून उटणे वापरावे.

(लेखिका पुणे येथे अायुर्वेद तज्ज्ञ अाहेत.)
 

इतर ताज्या घडामोडी
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...
बुलडाणा जिल्ह्यातील ७४८ गावे... बुलडाणा : जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात...
टीस विद्यापीठ-एसआयआयएलसी शैक्षणिक करारपुणे : शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित टाटा...
मोहरीवर्गीय आच्छादन पिके तण...तणनाशकांना प्रतिकारकता विकसित झालेली असल्याने...
बीटी बियाणे भरपूर; पण धुळपेरणी टाळापुणे : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना...
औरंगाबाद विभागात ७२ लाख ५१ हजार टन ऊस...औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील सहा...
नाशिक जिल्ह्यातील धरणात ४६ टक्केच पाणी...नाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील...
मराठवाड्यात शेततळ्यांचे पूर्णत्‍व...औरंगाबाद : मराठवाड्यात उद्दीष्टाच्या तुलनेत...
सेंद्रीय उत्पादने, सेंद्रीय शेतीला...मुंबई : सेंद्रीय अन्नाची उपलब्धता आणि...
सुपीकता टिकवण्यासाठी संवर्धित शेतीपारंपरिक शेतीपासून किमान मशागत ते शून्य मशागत हा...
पुणे जिल्ह्यात टोमॅटो लागवडीस प्रारंभ पुणे : जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांनी...
साताऱ्यात मेथी ५०० ते ७०० रुपये शेकडा सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
पानवेल व्यवस्थापन सल्लासद्यःस्थितीत पानवेलीच्या शेतात आंतरमशागत, वेलीची...