Agriculture story in marathi, womens health | Agrowon

मासिकपाळी पूर्व त्रासामध्ये घ्यायची काळजी
डॉ. विनिता कुलकर्णी
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

मानसिक तणाव हेदेखील मासिक पाळी पूर्व त्रासाचे कारण मानले जाते. त्यासाठी पोटातल्या औषधांच्या जोडीला ध्यान, धारणा, प्राणायाम केलाच पाहिजे. मासिक धर्म नैसर्गिक रीतीने त्रास न होता, औषधे न घेता सुरू झाला पाहिजे. कंबरदुखीसारख्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन स्त्रियांनी आपले आरोग्य उत्तम ठेवावे आणि सक्षम बनावे.
 

मानसिक तणाव हेदेखील मासिक पाळी पूर्व त्रासाचे कारण मानले जाते. त्यासाठी पोटातल्या औषधांच्या जोडीला ध्यान, धारणा, प्राणायाम केलाच पाहिजे. मासिक धर्म नैसर्गिक रीतीने त्रास न होता, औषधे न घेता सुरू झाला पाहिजे. कंबरदुखीसारख्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन स्त्रियांनी आपले आरोग्य उत्तम ठेवावे आणि सक्षम बनावे.
 

साधारणपणे पौगंडावस्थेत मुलींमध्ये जे शारीरिक बदल होतात त्यापैकी सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक बदल म्हणजे मासिक धर्म प्रारंभ होणे! प्रत्येक महिन्यात ठराविक काळात होणारा हा बदल शिस्तीतच होणे अपेक्षित असते. अगदी सुरवातीला मुलींमध्ये अनियमिता असते पण ती कायम नको! अनेकदा मासिक स्राव सुरू होण्याआधी प्रचंड अॅसिडीटी वाढणे, कंबर पोट पाठ दुखणे, पाय दुखणे अशी लक्षण फारच तीव्र स्वरुपाची दिसून येतात. याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. ओटीपोटात चमका येणे, डोके दुखणे तर एवढे तीव्र की स्त्रिया दैनंदिन कामेही नीट करू शकत नाहीत. यासाठी दोन पाळींच्या मधल्या काळात नियमित औषधे, पथ्य व्यायाम या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. थोड्या प्रमाणात वेगळी लक्षणे जी अनारोग्यास कारण ठरतात ती स्वाभाविक असतात; पण त्याचा परिणाम गंभीर असू नये.

उपचार

  • पाठदुखी, कंबरदुखी, पाय दुखणे, मुंग्या येणे ही लक्षणे कमी होण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुरूप दशमूलारिष्ट, महारास्त्रादी काढा यांचा योग्य मात्रेत उपयोग करावा.
  • चंद्रप्रभा वटी जेवणाआधी तुपासह घेतल्यास उत्तम कार्य करते. शतावरी कल्प, शतावरी सिद्ध तूप पोटात घेतले पाहिजे. अश्‍वगंधारिष्ट, अशोकारिष्ट या औषधांचासुद्धा चांगला परिणाम होतो.
  • नारायण तेल पायास, पाठीस, कंबरेला रोज लावावे, ज्यामुळे स्नायूंना बल मिळते आणि वातदोषाचे संतुलन होते. मासिक धर्म सुरू होण्याआधी अनेक स्त्रियांना उष्णतेचा त्रास होतो.
  • पित्त वाढून डोकेदुखी असल्यास सूतशेखर वटी योग्य मात्रेत पाण्यासह घ्यावी. कामदुधा, चंद्रकला रस या औषधांचाही उष्णता कमी करण्यासाठी उपयोग होतो. पण ही औषधे नियमितपण घेणे आवश्‍यक असते.
  • वेळच्या वेळी रक्ताचे प्रमाण तपासून घ्यावे. ते कमी असेल तर थकवा, चक्कर येणे, ओटी पोट दुखणे, स्राव कमी होणे अशी लक्षणे जाणवतात.
  • दाडीमालोहासव, ताप्यादी लोह अशा औषधांचा चिकित्सेत चांगला उपयोग होतो. पण प्रकृती वय बल पाहूनच मात्रा ठरावावी लागते.

आहारात पथ्य ः
शिळे पदार्थ, फोडणीची पोळी, चहापोळी, लोणचे, मिरची ठेचा, तेलकट पदार्थ, तिखटाचे पदार्थबंद करावेत. नियमित वेळेला जेवण घ्यावे. भूकेच्या वेळी चहा, कॉफी घेणे टाळावे.

घेण्याची काळजी ः

  • सूर्यनमस्कार रोज घालावेत. त्यामुळे गर्भाशय, यकृत अशा आतील अवयवांचे कार्य सुधारते. पायी चालण्याचा व्यायाम हा महत्त्वाचा आहेच.
  • बऱ्याचदा गर्भाशयाला असणारी सूज, गर्भाशयग्रीवा योनिप्रदेश या ठिकाणी विकृती असू शकते. त्यासाठी योग्यवलेळी स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन तपासणी करून घेणे आवश्‍यक असते.

    (लेखीका पुणे येथे  अायुर्वेदतज्ञ अाहेत.)

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...