Agriculture story in Marathi, women's health menstrual cycle issues | Agrowon

मासिक पाळीमध्ये जपा अारोग्य
डॉ. विनिता कुलकर्णी
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

साधारणपणे वय ११ ते १५ या दरम्यान मुलींमध्ये शारीरिक बदल होतात. त्यातील मासिक पाळी हा महत्त्वाचा बदल होताना योग्य पद्धतीत होतोय की नाही याकडे खरं तर फार सुरवातीपासून लक्ष देणे गरजेचे असते. दरमहा होणारा स्राव हा नैसर्गिक असल्याने तो होताना त्रास होणार नाही ही काळजी प्रत्येकीने घेणे आवश्‍यक आहे.
 

साधारणपणे वय ११ ते १५ या दरम्यान मुलींमध्ये शारीरिक बदल होतात. त्यातील मासिक पाळी हा महत्त्वाचा बदल होताना योग्य पद्धतीत होतोय की नाही याकडे खरं तर फार सुरवातीपासून लक्ष देणे गरजेचे असते. दरमहा होणारा स्राव हा नैसर्गिक असल्याने तो होताना त्रास होणार नाही ही काळजी प्रत्येकीने घेणे आवश्‍यक आहे.
 
मासिक पाळी हा बदल अतिशय नैसर्गिक असतो. त्यामुळे त्याचा त्या विशिष्ट दिवसांत खूप त्रास होणे अपेक्षित नसते. जर का तो होत असेल तर दुर्लक्ष करणे योग्य नाही. बऱ्याचदा पाळीच्या त्रासाकडे होणारच असे गृहीत धरून फारसे लक्ष दिले जात नाही. सुरवातीला स्त्राव जास्त प्रमाणात असतो, तसेच पाळी सुरू झाल्यावर नियमित असेलच असे नाही. पण कालांतराने या सर्व गोष्टीत नियमितता यायलाच हवी. त्यासाठी स्त्रियांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन योग्य ती चिकित्सा, तपासण्या केल्या पाहिजेत.
अतिस्राव दोन प्रकारांत होतो. एकतर वेळेच्या खूप आधी मासिक स्राव होतो आणि खूप ब्लीडिंग होते. दुसरे वेळेवर स्राव सुरू होतो आणि अधिक काळापर्यंत होतो. इतका की हालचाल करणे, काम करणे खूप कठीण होते. बऱ्याचदा गाठी पडतात. या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही; कारण त्याचे दुष्परिणाम म्हणून थकवा, रक्त कमी होणे ही लक्षणे दिसून येतात.

उपाययोजना

  • चिकित्सेचा विचार करताना वयाचा विचार करणे आवश्‍यक असते. सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे तांदळाचे धुवण पोटात २-३ तासांच्या अंतराने वारंवार घ्यावे. तांदूळ ३-४ वेळा धुवून ते पाणी म्हणजे तांदळाचे धुवण!
  • चंद्रकला वटी, कामदुधा वटी, पुष्यानुग चूर्ण नागकेशर चूर्ण या औषधांचा तांदळाच्या धुवणासह उपयोग करावा.
  • अशोकारिष्ट २ चमचे ३-४ वेळा कोमट पाण्यासह घ्यावे. खूप स्त्रावात पाय दुखणे, अंधेरी येणे, ओटीपोट दुखणे अशी लक्षणेही असतात. असा वेळी शतावरी कल्प दुधासह घ्यावा. गरम पाण्यानेही उपयोग होतो.
  • आडवे झोपून पायांच्या खाली उशी वगैरे ठेवून उंचवटा करावा. अशा पद्धतीने आडवे झोपल्यास फायदा होतो. अतिस्रावात प्रकृतीचा विचार खूप महत्त्वाचा ठरतो.
  • पित्ताची प्रकृती असल्याने उष्णता वाढणार नाही ही काळजी घेणे फार आवश्‍यक असते. वारंवार त्रास होत असेल तर आवश्‍यक त्या तपासण्या जरूर करून घ्याव्यात. सूज, फायब्रॉईड इत्यादी गोष्टी वेळच्या वेळी समजल्या की लगेच उपाय करता येतात.

आहाराचे पथ्य

अतिस्राव असणाऱ्या महिलांनी हे पथ्य पाळणे फार आवश्‍यक असते. अळीव, वरई, मेथी, आंबट दही, ठेचा, पापड, लोणचे, तळलेली मिरची, तिखट मसाले या सर्व गोष्टी टाळाव्यात. भुकेच्या वेळी चहा, कॉफी घेणे टाळावे. चहाचे प्रमाण कमी असावे.

औषधांच्या बाबतीत काळजी

मासिक स्राव जास्त होतो तेव्हा औषधांनी फरक पडतो पण नंतरही पुढची तारीख येईपर्यंत ठराविक औषधे पोटात घेणे आवश्‍यक असते. उष्णता पहिल्यापासून असेल तर ती कमी करण्यासाठी नियमितपणे औषधे घेणे आवश्‍यक ठरते. या सर्व गोष्टी तत्ज्ञांना विचारून ठरवाव्यात.

शारीरिक व्यायाम

  • मुलींना जेव्हा प्रथम मासिक स्राव होतो तेव्हापासूनच काळजी घ्यावी. मैदानी खेळ अाता जागेअभावी किंवा अन्य कारणांनी कमी झाले आहेत पण रोज सूर्यनमस्कार, दोरीवरच्या उड्या, पायी फिरणे एवढे जरी केले तरी हार्मोनमधील बदलात संतुलन येण्यास मदत होते.
  • हे व्यायाम प्रकार सर्व गृहिणींनी घरकाम करून केलेच पाहिजेत. कारण घरकामात योगासने होत नाही. जी यकृत, गर्भाशय या सर्वांचे काम नीट होण्यासाठी आवश्‍यक असतात.

(लेखिका पुणे येथे अायुर्वेदतज्ञ अाहेत.)

 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
जात पडताळणीसाठी रक्त नात्यातील दाखला...नागपूर : रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी...
कोंबडीखताचा वापर कसा करावा?मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...
ऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावे?गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, बाजरी, मका... कापूस बीटी कापूस बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम...
मका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...
अभिनव पद्धतीने सणसरला आंदोलनभवानीनगर, जि. पुणे   ः सणसर येथील कुरवली...
मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध :...नागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत...
पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या दहा...
खारपाणपट्ट्यात भूसुधारणा कार्यक्रम...अकोला  : जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण...
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....