agriculture story in marathi, woodapple processing | Agrowon

कवठ प्रक्रियेला आहे संधी
मनिषा गायकवाड
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

कवठ हे तसे दुर्लक्षित फळ. आंबट, गोड चवीमुळे कवठापासून बनविलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना शहरी भागात चांगली मागणी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या कवठापासून घरगुती स्तरावर विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून चांगला फायदा मिळवता येतो.

कवठाची साल हिरवट, पांढऱ्या रंगाची खरबरीत व जाड असते. तर त्याच्या झाडाची पाने आकाराने बारीक असतात. कवठाच्या आतील गर विटकरी रंगाचा असून चवीला आंबट-गोड असतो.

कवठ हे तसे दुर्लक्षित फळ. आंबट, गोड चवीमुळे कवठापासून बनविलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना शहरी भागात चांगली मागणी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या कवठापासून घरगुती स्तरावर विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून चांगला फायदा मिळवता येतो.

कवठाची साल हिरवट, पांढऱ्या रंगाची खरबरीत व जाड असते. तर त्याच्या झाडाची पाने आकाराने बारीक असतात. कवठाच्या आतील गर विटकरी रंगाचा असून चवीला आंबट-गोड असतो.

औषधी गुणधर्म
कवठामध्ये ‘ क ’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ‘क’ जीवनसत्त्वासह लोह, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, फायबर असे सर्व मूलद्रव्य कवठामध्ये असतात.

उपयोग
कवठे हे मधुर, आम्लरसाचे असल्यामुळे भूक कमी लागत असेल तर याच्या सेवनाने भूक वाढीस मदत होते.
कवठ हे उत्तेजक असून अपचन, आमांश आणि अतिसार इ. विकरांवर उपयुक्त आहे.

प्रक्रियायुक्त पदार्थ
रस

 • पिकलेली कवठ फळे स्वच्छ करावीत.
 • त्याचे बाहेरील आवरण काढून अतील गराचे छोटे तुकडे करावेत.
 • १ किलो तुकड्यामध्ये ७५० मिली पाणी मिसळावे.
 • तुकड्यांचा स्क्रु टाईप ज्युस एक्स्ट्रॅक्टर मशिनने रस काढावा.
 • रस ८० ते ८२ अंश सेल्सिअस तापमानाला तापवावा.
 • थंड करून २४ तास स्थिर ठेवून गाळणीने रस गाळूण घ्यावा.
 • रसाची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी ८० ते ८५ अंश सेल्सिअस तापमानाला रस उकळून ६०० पीपीएम सोडिअम बेन्झोएट मिसळावे.
 • तयार रस निर्जंतुक बाटलीत भरुन झाकण लावून हवाबंद साठवावा.

चटणी

 • पिकलेली कवठ फळे स्वच्छ धुऊन फळातील गर काढावा.
 • सम प्रमाणात गर व गूळ यांचे एकत्रित मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.
 • त्यात सोललेला लसूण, लाल तिखट, मिठ, जिरे एकत्रित मिश्रण करावे.
 • मिक्सरमधून काढलेले मिश्रण म्हणजे गोडसर तिखट चटणी तयार होईल.

जॅम

 • जॅम तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली मोठ्या आकाराची कवठ फळे निवडावीत.
 • कवठ फोडून त्यातील गर काढून घ्यावा.
 • १ किलो गरामध्ये २०० मिली पाणी मिसळून ते मिक्सरमधून काढून घ्यावे.
 • पातेल्यामध्ये १ किलो गर व १ किलो साखर एकत्रित करून तापवावे.
 • पहिल्या उकळीनंतर त्यात २ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळावे.
 • गर घट्ट होत आल्यानंतर त्याचा ब्रिक्स मोजावा. ६८ डिग्री ब्रिक्स येईलपर्यंत जॅम शिजवावा.
 • जॅम घरी तयार करत असताना एका प्लेटमध्ये पाणी घेऊन शिजवलेले मिश्रण चमच्याने थोडे घेऊन पाण्यामध्ये ठेवावे.
 • जर मिश्रण पाण्यामध्ये पसरले तर अजून शिजविण्याची गरज आहे असे समजावे.
 • जर मिश्रणाची न पसरता गोळी तयार झाली तर जॅम तयार झाला असे समजावे.
 • तयार जॅम निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरावा.

जेली

 • पिकलेल्‍या मोठ्या आकाराच्या कवठ फळातील गर काढून घ्यावा.
 • गर आणि पाणी १:२ प्रमाणामध्ये टाकावे.
 • गर गरम करावा. गरम केलेला गर जर १ किलो असेल तर त्या ७५० ग्रॅम साखर, १ ग्रॅम पेक्टीन व १ ग्रॅम सायट्रीक ॲसिड मिसळावे.
 • मिश्रणाला सतत हलवत राहावे.
 • मिश्रण घट्ट होत आल्यानंतर थेंब एका पाणी असलेल्या प्लेटमध्ये टाकावा.
 • जर घट्ट गोळी तयार झाली तर जेली तयार झाली असे समजावे.
 • जेलीचा मध्यांक हा ६८ डिग्री ब्रिक्स असतो. तयार झालेली जेली निर्जंतुक बाटलीमध्ये भरावी.

संपर्क ः मनीषा गायकवाड, ७०२८९७४११७
(शिवरामजी पवार, अन्नतंत्र महाविद्यालय, कंधार, जि. नांदेड)

इतर कृषी प्रक्रिया
मोहापासून प्रक्रियायुक्त पदार्थमोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध...
अनेक प्रक्रिया पदार्थांमध्ये सीताफळ गर...सीताफळ हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावर प्रक्रिया...
कच्च्या पपईपासून पेपेन निर्मितीपपई हे जवळजवळ वर्षभर उत्पादन देणारं पीक असून,...
मार्मालेड, टुटीफ्रुटी निर्मितीसाठी पपईपपई झाडांपासून वर्षभर फळे मिळतात; परंतु दूरच्‍या...
आरोग्यवर्धक फळांची भुकटीप्रक्रिया उद्योगामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार अणि...
कवठ प्रक्रियेला आहे संधीकवठ हे तसे दुर्लक्षित फळ. आंबट, गोड चवीमुळे...
पेरूची टॉफी, स्क्वॅश, गरपेरूमध्ये जीवनसत्त्व सी, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह,...
पेरू प्रक्रियेतून वाढवा फायदापेरू नाशवंत असल्यामुळे प्रक्रियेद्वारा पेरूचे...
बहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धनआवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे....
शेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...
सीताफळापासून नेक्टर, स्कॅश, अारटीएससीताफळ हे अनेक अावश्‍यक पोषक घटकांचा स्राेत अाहे...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
सोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे राहणाऱ्या साधना...
चांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...
प्रोबायोटिक कुल्फीकुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार...
टोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदाबाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे...
दर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...
विविध हंगामी फळांपासून बनवा जॅमहंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात....
प्रक्रिया उद्योगात नारळाला मागणीनारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया...
मावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...