agriculture story in marathi,interview of Sachindra Pratap Singh, Commissioner of Agriculture | Agrowon

कृषिकेंद्रित ग्रामविकासासाठी सरपंचाने 'लीडर' व्हावे
मनोज कापडे
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

राज्याचे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी कृषी विभागाच्या योजना प्रत्येक गावात आणि सामान्य शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी विविध उपक्रमांवर भर दिला आहे. अॅग्रोवन सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्याशी साधलेला संवाद...

राज्याचे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी कृषी विभागाच्या योजना प्रत्येक गावात आणि सामान्य शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी विविध उपक्रमांवर भर दिला आहे. अॅग्रोवन सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्याशी साधलेला संवाद...

कृषी आयुक्त म्हणून तुम्ही ग्रामपंचायतींना काय संदेश द्याल?
 गावाचा विकास म्हणजे ग्रामविकास आणि कृषी विकास असे मी मानतो. ग्रामपंचायतीचे लाभार्थी ९० टक्के हे शेतकरीच आहेत. मात्र, बहुतेक ग्रामपंचायतींची कामे अजूनही कृषिकेंद्रित झालेली नाहीत. जिल्हा परिषदेत कृषी कामकाजाचा आढावा घेणारी समिती आहे. तालुका पंचायत समितीतदेखील कृषी कामाचा आढावा घेतला जातो. मग, गावपातळीवर ग्रामपंचायतीमध्ये कृषीविषयक कामकाजाची समिती का नको ? अर्थात असा प्रश्न सरपंच मंडळींनी उपस्थित करायला हवा. हा प्रश्न सुटण्यासाठी स्वतः सरपंचांनी पाठपुरावादेखील करायला हवा. ग्रामपंचायतींनी आता ग्रामविकासाच्या योजनांबरोबरच कृषी ज्ञान, माहिती आणि तंत्राचा विस्तार करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

कृषिविषयक कामकाजात सरपंच कशा पद्धतीने पुढाकार घेऊ शकतील?
 गावशिवारातील ग्रामविकास किंवा कृषी विषयक कामांसाठी अनेक वेळा सरपंचांकडून जिल्हा परिषदा, पंचायत समित्या किंवा इतर शासकीय कार्यालयांमध्ये भेटी दिल्या जातात. माझा आग्रह असा आहे की, सरपंचांनी शेतकरी आणि शेतीविषयक योजनांचादेखील पाठपुरावा करावा. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांमध्येदेखील सतत जावे. कृषी सहायक गावात येत नसल्यास सामान्य शेतकरी कृषी कार्यालयाला कळवू शकत नाही. मात्र, सरपंच हे काम करू शकतो.

विस्तार कामांमध्ये ग्रामपंचायतींचा प्रत्यक्ष सहभाग कसा घेता येईल ?
गाव आणि त्याभागातील कृषी कार्यालये, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे यांची सांगड ग्रामपंचायती घालू शकतात. गावच्या शेतीला किंवा शेतकऱ्यांना नेमका कोठून कसा लाभ मिळू शकतो, याविषयी ग्रामपंचायतीकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळू शकते. गावात कृषी विभागाची पीक प्रात्यक्षिके कशी वाढतील, नव्या प्रयोगांना चालना कशी मिळेल, खते-बियाणे-कीटकनाशके यांची उपलब्धता कशी वाढेल, शेतकरी गट कसे तयार होतील, या गटांची पुन्हा कंपनी कशी तयार होईल, अशा कितीतरी बाबी ग्रामपंचायतींना करता येतील. कृषिकेंद्रित गाव घडविण्यासाठी सरपंचाने 'लीडर' म्हणून काम केले पाहिजे. कृषी विभागाच्या विविध योजना गावशिवारात आणण्यासाठी पुढाकार घेतला तर गावाला कृषी केंद्रित आर्थिक सबलता मिळेल.

ग्रामपंचायतींमध्ये कृषी विभागाचा कर्मचारी जावा यासाठी नेमके काय प्रयत्न अपेक्षित आहेत ?
राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने कृषी विभागाचे महत्त्व ओळखून कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याला म्हणजेच कृषी सहायकाला ग्रामपंचायतीत बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. कृषी सहायकांकडे विविध योजनांची माहिती असते. ग्रामपंचायतीतून या योजनांचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो. सरपंचांनी ग्रामपंचायतीत एक कृषी कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.

इतर ग्रामविकास
शेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...
शेती, शिक्षण अन् आरोग्यातून शाश्‍वत...जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेमार्फत महाराष्ट्र...
शेतीसह विकासकामांमध्येही उल्लेखनीय रोहडाभाजीपाला, कापूस बीजोत्पादनाच्या माध्यमातून रोहडा...
ग्रामविकास,पर्यावरण संवर्धनाचा वसा...राज्यातील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
चांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...
‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट` करतोय देशी...भोसरी (जि. पुणे) येथील पुणे पांजरपोळ ट्रस्ट ही...
'लालकंधारी'च्या माळसोन्ना गावाने हटविला...परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना (ता. परभणी) गावाने...
'आरोग्यम धनसंपदा’ ब्रीद प्रत्यक्षात...महाराष्ट्र राज्याच्या सीमेजवळ असलेल्या कर्नाटक...
ग्रामरोजगाराला गती देणारी ‘निवेदिता...महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्यापासून प्रेरणा...
शालेय शिष्यवृत्ती परीक्षेचा राज्यातील ‘... पुणे जिल्ह्यातील पिंपळे खालसा (ता. शिरूर)...
ग्रामविकासासह सुधारीत शेतीपद्धती...औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील बोरगाव...
शेती, पूरक उद्योग अन् ग्रामविकासाला...सातारा जिल्ह्यातील डोंगरी, दुर्गम जावळी तालुक्यात...
वडनेर बुद्रुक गावाने मिळवली स्वच्छता,...ग्रामविकासासाठी गावकरी एकत्र आले. प्रत्येक कामात...
‘स्वयम शिक्षण प्रयोग` करतेय ग्रामविकास...पुणे येथील ‘स्वयम शिक्षण प्रयोग` ही स्वयंसेवी...
ग्रामस्वच्छतेचा मंत्र प्रत्यक्षात...स्वच्छतेचा ध्यास मनाशी बाळगून सांगली जिल्ह्यातील...
बचत गटातून वाढली रोजगाराची संधीशेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील महिलांनी...