अॅग्रोवन अॅप, वेबसाईटचे अनावरण; शेतीशी जोडले 'डिजिटल' नाते !

अॅग्रोवन अॅप, वेबसाईटचे अनावरण; शेतीशी जोडले 'डिजिटल' नाते !
अॅग्रोवन अॅप, वेबसाईटचे अनावरण; शेतीशी जोडले 'डिजिटल' नाते !

पुणे : गेल्या एक तपाहून अधिक काळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिवाभावाचा साथी बनलेल्या 'अॅग्रोवन'ची नवी वेबसाईट आणि नवे मोबाईल अॅप्लिकेशन शेतकरी आणि शेतीशी संबंधित सर्व घटकांच्या सेवेत दाखल झालेले आहे. ॲग्रोवनच्या पुरस्कार सोहळ्यात राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते या दोन्ही सेवांचे अनावरण करण्यात आले. शेतीशी संबंधित सर्व घडामोडी आणि ताज्या बाजारभावाची माहिती मोबाईल आणि वेबसाईटवर मिळणे शेतकऱ्यांना त्यामुळे शक्य झाले आहे. अनावरणप्रसंगी मुख्य संपादक श्रीराम पवार, सकाळचे संचालक भाऊसाहेब पाटील, ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, सरव्यवस्थापक प्रमोद राजेभोसले उपस्थित होते. मोबाईल अॅप आणि वेबसाईट या दोन्ही स्वतंत्र माध्यमांद्वारे शेतकऱ्यांना 'अॅग्रोवन'शी नियमित आणि थेट संवाद साधता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक बातमी-लेखासोबत 'प्रतिक्रिया' दालनाची व्यवस्था मोबाईल आणि वेबसाईटवर आहे. 'अॅग्रोवन'मधील सर्व लोकप्रिय सदरे, विशेषांक मोबाईल, वेबसाईटवर शेतकरी आणि अभ्यासकांना उपलब्ध आहेत. 'अॅग्रोवन'चे मोबाईल अॅप अँड्रॉईड आणि आयओएस स्टोअरवर प्रायोगिक तत्त्वावर आधी उपलब्ध करून दिलेले होते. शेतकरी, तज्ज्ञ, कृषी महाविद्यालयांतील विद्यार्थी आदींनी अॅप आणि वेबसाईटचा अनुभव घेतला. त्यामध्ये सुधारणा सुचविल्या आणि त्यानुसार 'अॅग्रोवन'च्या मोबाईल अॅप आणि वेबसाईटची रचना करण्यात आली. 'अॅग्रोवन'चे मोबाईल अॅप आजघडीला तब्बल सव्वा लाख मोबाईलधारक वापरत आहेत. गुगल प्ले स्टोअरवर 'अँड्रॉईड'मोबाईल अॅपला पाचपैकी ४.५ इतके रेटिंग आहे. वेबसाईटवर 'अॅग्रोवन'ला सुमारे सव्वा लाख 'युजर्स' नियमित भेट देतात.    'अॅग्रोवन'च्या फेसबुक पेजला १.७३ लाख सदस्य सभासद आहे. एकूण तब्बल चार लाखांहून अधिक सदस्य 'अॅग्रोवन'च्या 'डिजिटल' परिवाराचे घटक आहेत आणि त्यांची संख्या दररोज वाढते आहे.

मोबाईल आणि वेबसाईटची वैशिष्ट्ये

  • अॅप्लिकेशन अॅँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही मोबाईलसाठी उपलब्ध
  •  महाराष्ट्रातील सर्व शेती उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतीमालाचे भाव एकाच ठिकाणी
  •  हव्या असलेल्या बाजार पेठेतील शेतीमालाचे भाव तपासण्याची सोय
  •  शेती क्षेत्रातील यशकथांना आणि शेतीच्या नेमक्या प्रश्नांना मोबाईलवर सर्वाधिक प्राधान्य
  •  शेतीविषयक कायदे, शासन निर्णय आणि अत्यंत आवश्यक अशा संपर्क क्रमांकांची यादी मोबाईलवर
  • आपलेही 'डिजिटल' नाते जोडा 'अॅग्रोवन'शी

    वेबसाईट : http://www.agrowon.com/ फेसबुक पेज : www.facebook.com/AGROWON/ ट्विटर पेज : www.twitter@.com/AGROWON/

    अँड्रॉईड अॅप : https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.agrowon आयओएस अॅप : https://itunes.apple.com/in/app/agrowon/id१२६८५६५१५०?mt=८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com