agriculture story in marathi,news regarding Subash Deshmukh, cooperative and marketing Minister | Agrowon

पोशिंद्याला मदत करा... तुम्हाला हात जोडून विनंती
टीम अॅग्रोवन
रविवार, 31 डिसेंबर 2017

पुणे : 'माझ्या संकटग्रस्त शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत असल्यास शहरवासीयांनो तुम्ही शंका घेऊ नका, कांद्याचे भाव वाढत असल्यास माध्यमांनो तुम्हीही विरोधात लिहू नका; जगाच्या या पोशिंद्याला, अन्नदात्याला तुम्ही सांभाळून घ्या; मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो,' हे उद्गार आहेत राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे..!

पुणे : 'माझ्या संकटग्रस्त शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत असल्यास शहरवासीयांनो तुम्ही शंका घेऊ नका, कांद्याचे भाव वाढत असल्यास माध्यमांनो तुम्हीही विरोधात लिहू नका; जगाच्या या पोशिंद्याला, अन्नदात्याला तुम्ही सांभाळून घ्या; मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो,' हे उद्गार आहेत राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे..!

सकाळ माध्यम समूहाकडून दिल्या जाणाऱ्या अॅग्रोवन स्मार्ट शेतकरी पुरस्काराचे वितरण पुण्याच्या टिळक स्मारक सभागृहात करताना सहकारमंत्र्यांनी शहरवासीयांना भावनिक आवाहन केले. अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी यावेळी आपल्या प्रास्ताविकात सहकारमंत्र्यांकडून कर्जमाफीविषयी नेमकी माहिती मिळणार असल्याचे सांगितले. तोच धागा पकडून श्री. देशमुख म्हणाले की, शेतकरी भरपूर उत्पादन घेतात आणि स्मार्ट शेतकरी पुरस्कार मिळवतात. त्यामुळे कर्जमाफी कशाला, असा प्रश्न शहरवासीयांना पडू शकतो. मात्र, प्रत्यक्षात निवडक शेतकऱ्यांचे सोडले तर बहुतेकांची स्थिती अतिशय त्रासदायक आहे.

यावेळी श्री. देशमुख यांनी कर्जमाफीचा उद्देश, शेतकऱ्यांच्या व्यथा, शहरी ग्राहकवर्गाकडून शेतमाल भाववाढीला होणारा विरोध आणि त्याचे परिणाम याचे अचूक विश्लेषण केले. आपला शेतकरी हा आपला अन्नदाता असून तो गरीब व समस्याग्रस्त आहे. कुटुंबातील गरीब भावाला इतर मोठे भाऊ सांभाळून घेतात व मदत करतात. तशीच भूमिका शहरवासीयांनी शेतकऱ्यांबाबत ठेवावी, अशी अपेक्षा श्री. देशमुख यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.

'शहरवासीयांना मोटारसायकल, मोटारी, मोबाईल अशी सर्व साधने मिळवता येतील. मात्र, शेतकऱ्याने पिकवले नाही तर आपल्याला अन्न मिळणार नाही. शेतकरी आपला अन्नदाता आहे. त्याच्या कर्तृत्वाला आपण सलाम केला पाहिजे. कधी निसर्ग, कधी बाजारभाव, कधी कीडरोग तर कधी व्यापारी असा कोणाकडून शेतकऱ्याला झटका बसतो. खिशात येत नाही तोपर्यंत पैसा त्याचा नसतो. त्यामुळे शहरवासीयांनी मदतीची भूमिका घेत शेतकऱ्यांना साथ द्यावी. त्याच्या समृद्धीमध्येच आपले सुख आहे, असे सहकारमंत्री म्हणाले.

तर शेतकऱ्याला कोणाच्या दारात जाण्याची गरज नाही
शेतकऱ्याला जर पाणी, वीज, खते, बियाणे, पतपुरवठा, हमीभाव, शेतमाल प्रक्रिया अशा विविध सुविधा पुरविल्यास कोणाच्याही दारात जाण्याची गरज राहणार नाही. केंद्र व राज्य सरकार तीच भूमिका ठेवत विविध योजना राबवित आहे, असे सहकारमंत्री श्री. देशमुख यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

 

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...