मृदा सुरक्षिततेच्या समस्या, उपाययोजना
मृदा सुरक्षिततेच्या समस्या, उपाययोजना

मृदा सुरक्षिततेच्या समस्या, उपाययोजना

आज जागतिक मृदा दिन. संयुक्त राष्ट्र संघ २०१५-२०२४ हे दशक ‘‘मृदा आरोग्य दशक’’ म्हणून साजरे करीत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जागतिक मृदा दिनानिमित्त हा ऊहापोह. सद्यःस्थितीत मातीची होत असलेली प्रचंड धूप आणि ढासळत चाललेली सुपीकता हा ऐरणीचा विषय झाला आहे. मृदा सुरक्षिततेचा विचार करता खालील समस्या दिसून येतात.

मृदा सुरक्षितता धोक्यात का आली?  

  • जमिनीची प्रचंड प्रमाणातील धूप.
  • पिकांमधील वारंवारता आणि बहुपीकपद्धती.
  • सेंद्रिय कर्बाचे ढासळते प्रमाण.
  • असंतुलित आणि अपुरा अन्नद्रव्याचा पुरवठा.
  • सिंचनासाठी अशास्त्रीय पाणीवापर
  • पीक अवशेष जाळण्याचे वाढते प्रमाण.
  • माती किंवा पाणी परीक्षण न करता विविध निविष्टांचा वापर.
  • हिरवळीची खते, जैविक खते यांचा नगण्य वापर.
  • मृदा सुरक्षितता म्हणजे काय ? दरवर्षी मातीची ५३३४ दशलक्ष टन एवढी धूप होते. धुपीद्वारे जमिनीतील लाखो टन अन्नद्रव्य, जीवाणू व बुरशी यांचा ऱ्हास होतो. अनियंत्रित सिंचनामुळे जमिनीचे रासायनिक गुणधर्म बिघडतात. क्षारपड जमिनींचे प्रमाण वाढत आहे. परिणामी जमिनी अशक्त आणि नापीक होत चालल्या आहेत. एकुणच मृदा सुरक्षितता धोक्‍यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर जमिनीचे नैसर्गिक अस्तित्व कायम राखणे याला मृदा सुरक्षितता असे म्हणतात. त्यासाठी खालील उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

    सांख्यिकीय अवलोकन :

  • देशाचा संपूर्ण भूभाग    ३६९ दशलक्ष हेक्‍टर.
  • पेरणीयोग्य जमीन    १४१ दशलक्ष हेक्‍टर.
  • जमिनीची होणारी धूप    ५३३४ दशलक्ष हेक्‍टर.
  • समस्याग्रस्त जमीन    १२० दशलक्ष हेक्‍टर.
  • पडणारा पाऊस    ४१० हेक्‍टर मीटर.
  • जंगलाखालील क्षेत्र    २८ टक्के.
  • पीक अवशेषांचे उत्पादन    ५०० दशलक्ष
  • देशातील कर्ब उत्सर्जनाची पातळी    ३६० पीपीएम.
  • संपर्क : डॉ. एन. एम. कोंडे, ९८२२८७५३७५ (मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com