आठवडाभर विस्तृत स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 9 सप्टेंबर 2017
महाराष्ट्रासह दक्षिण भारतात हवेचे दाब कमी होत आहेत. ९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल, तर १० सप्टेंबर रोजी १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होत असल्याने सद्यःस्थितीत दक्षिण भारताच्या भागावरील ढगांचे समूह उत्तर दिशेने वारे लोटतील आणि ९ ते १६ सप्टेंबरच्या काळात काही काळ उघडीप, तर काही काळ विस्तृत स्वरूपात पाऊस होईल. १४ ते १६ सप्टेंबरच्या काळात कोकणात मुंबईसह विस्तृत स्वरूपात पाऊस होईल.
महाराष्ट्रासह दक्षिण भारतात हवेचे दाब कमी होत आहेत. ९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल, तर १० सप्टेंबर रोजी १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होत असल्याने सद्यःस्थितीत दक्षिण भारताच्या भागावरील ढगांचे समूह उत्तर दिशेने वारे लोटतील आणि ९ ते १६ सप्टेंबरच्या काळात काही काळ उघडीप, तर काही काळ विस्तृत स्वरूपात पाऊस होईल. १४ ते १६ सप्टेंबरच्या काळात कोकणात मुंबईसह विस्तृत स्वरूपात पाऊस होईल.

मध्य महाराष्ट्रात ९ ते १४ सप्टेंबरपर्यंत विविध भागांत विस्तृत स्वरूपात पावसाची शक्‍यता राहील. उत्तर महाराष्ट्रात १० सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या काळात चांगल्या पावसाची शक्‍यता राहील. मराठवाड्यात १३ व १४ सप्टेंबरच्या कालावधीत विस्तृत स्वरूपात पावसाची शक्‍यता राहील. तर विदर्भात १२ ते १५ सप्टेंबरच्या कालावधीत विस्तृत स्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. १ सप्टेंबर ही ईशान्य मॉन्सूनची म्हणजेच परतीच्या मॉन्सूनची निर्धारित तारीख असली, तरी या वेळी ती १२ ते १५ सप्टेंबरपर्यंत लांबेल अशी स्थिती आहे. कारण १५ ते १६ सप्टेंबरपर्यंत वारे दक्षिणेकडून उत्तरकडे वाहण्याची शक्‍यता आहे.

परतीच्या मॉन्सूनच्या वेळी वारे दिशा बदलतात. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून दक्षिणेकडे असते. त्यामुळे त्याला ईशान्य मॉन्सून म्हणून संबोधले जाते. राजस्थानच्या भागातून प्रथम मॉन्सून परतण्यास सुरवात होते. महाराष्ट्रातून मॉन्सून परतण्याची सर्वसाधारण वेळ १ ऑक्‍टोबर असली, तरी या वर्षी महाराष्ट्रातून मॉन्सून १० ते १२ ऑक्‍टोबरदरम्यान परतेल. या सर्व काळात महाराष्ट्राच्या पूर्व भागात २७० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस होणे अपेक्षित आहे. त्यामुळे यापुढे चांगले पाऊस होतील, अशी अपेक्षा करण्यास काही हरकत नाही.

कोकण ः
या आठवड्यात कोकणात चांगल्या पावसाची शक्‍यता असून, काही दिवशी १० मिलिमीटर अथवा त्याहून अधिक पाऊस होणे शक्‍य आहे. वाऱ्याच्या दिशेत बदल होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. रायगड जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील, तर ठाणे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ९ किलोमीटर राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. तर ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील.

उत्तर महाराष्ट्र ः
उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता असून, धुळे व जळगाव जिल्ह्यांत काही दिवशी ७ मिलिमीटर, तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत काही दिवशी १० ते १२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किलोमीटर राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील.

मराठवाडा ः
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत ९ ते १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील, तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ किलोमीटर राहील. बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. तर उस्मानाबाद, लातूर व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ५८ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ ः
पश्‍चिम विदर्भात प्रतिदिनी ३ ते ६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून काही दिवशी पावसात वाढ होणे शक्‍य आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर इतका कमी राहील. कमाल तापमान अकोला व वाशिम जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस तर अमरावती व बुलढाणा जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस किमान तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस तर बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील.

मध्य विदर्भ ः
मध्य विदर्भात पावसाचे प्रमाण ४ ते ९ मिलिमीटर राहील. यवतमाळ जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर राहील. यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. तर वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. तर यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील.

पूर्व विदर्भ ः
सर्वच जिल्ह्यांत काही दिवशी ५ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किलोमीटर राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र ः
या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्‍यता असून, काही दिवशी सांगली व सातारा जिल्ह्यांत १० ते ११ मिलिमीटर, तर सोलापूर व नगर जिल्ह्यांत १६ ते १९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत ५ ते ९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून, तर सांगली व नगर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ९ किलोमीटर राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील.

कृषी सल्ला ः

  • जमिनीत चांगला ओलावा असताना करडई, जवस व रब्बी ज्वारीची पेरणी करावी.
  • रब्बी पिकांची निवड पाण्याची उपलब्धता, पावसाचे प्रमाण आणि कालावधी यानुसार ठरवावी.
  •  पेरणीनंतर सारे व पाट पाडावेत त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरेल आणि पिकांची वाढ चांगली राहील.
  • खरीप पिकाची काढणी झालेल्या शेताची पूर्वमशागत करताना एक नांगराची पाळी देऊन कुळवाची पाळी द्यावी. काडीकचरा वेचून जमीन रब्बी पिकांच्या पेरणीसाठी तयार करावी.

    - डॉ. रामचंद्र साबळे
    (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अाणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

 

इतर ताज्या घडामोडी
शीतकरण केंद्र बंद असल्याने दुग्धोत्पादक...अमरावती : वाशीम येथील शासकीय दुग्ध योजनेकडून...
पुणे बाजार समिती असुविधांच्या विळख्यात पुणे : राज्यात सर्वांत माेठ्या बाजार...
नाशिकला टोमॅटो ४५५ ते १६३५ रुपये क्विंटलनाशिक : नाशिक, नगर जिल्ह्यातून वाढलेली आवक,...
साताऱ्यात वाटाणा, वांगी, गवार तेजीत सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
नागपूरमध्ये हरभरा सरासरी ५६४० रुपये...नागपूर ः कळमना बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून...
शेतकऱ्यांना न्याय मिळायवा हीच भूमिका :...अकोला : भारत हा कृषिप्रधान देश म्हटला जातो, मात्र...
साताऱ्यात दमदार पावसामुळे पाणीटंचाईची... सातारा : जिल्ह्यात गेल्या सप्ताहात झालेल्या...
‘सिद्धेश्‍वर’कडून गतहंगामातील उसाला... सोलापूर : दुष्काळ, कमी पाऊसमान यामुळे...
वऱ्हाडात मॉन्सूनपूर्व कपाशीचे नुकसान अकोला : गत आठवड्यात काही भागांत संततधार पाऊस...
गवारगमसह तांदूळ निर्यात वाढलीमुंबई ः अमेरिकेतून मागणी वाढल्याच्या...
उकाडा वाढलापुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने...
जळगावमध्ये नवती केळी १०२५ रुपये क्विंटल जळगाव ः मागील आठवड्याच्या सुरवातीला जिल्ह्यात...
सोलापुरात वांगी, कोबी, ढोबळी मिरचीच्या... सोलापूर ः येथील बाजार समितीच्या आवारात गत...
एक लाख हेक्टरने हरभऱ्याचा पेरा वाढणारपुणे : राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी...
राज्यात दुधाचा एकच ब्रॅँड बनविणार :...राहुरी, जि. नगर : गुजरातमधील ‘अमूल’प्रमाणेच...
जनताप्रश्नी सरकार अधिक संवेदनशील :...नवी दिल्ली ः ``जनतेच्या प्रश्नी सरकार अधिक...
पुणे विभागात रब्बीसाठी आठ लाख टन खताची...पुणे  ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून...
बुलेट-ट्रेनसाठी महाराष्ट्राला २५ हजार...नगर : मुंबई- अहमदाबाद बुलेट-ट्रेनऐवजी चंद्रपूर ते...
पावसाचा केळी, कापूस, मका, ज्वारीला फटका यावल, जि. जळगाव  : शहर व परिसरात या...
परभणीत गहू, हऱभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची... परभणी : येत्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यात २...