agriculture stroy in marathi, wheat straw making machine straw combine | Agrowon

गव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा कंबाइन यंत्र
आशिष धिमते, रविकांत अडके
सोमवार, 24 डिसेंबर 2018

राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा कंबाइन हे यंत्र उपयुक्त ठरते. भुसा कंबाइन हे ट्रॅक्टरचलित यंत्र असून, कंबाइन हार्वेस्टिंगनंतर शेतात राहिलेला उभा काड आणि हार्वेस्टरने टाकलेला काड या दोन्हीचे रूपांतर भुशात करते आणि ब्लोअरच्या साहाय्याने ट्रॉलीमध्ये वाहून नेते.
 

राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा कंबाइन हे यंत्र उपयुक्त ठरते. भुसा कंबाइन हे ट्रॅक्टरचलित यंत्र असून, कंबाइन हार्वेस्टिंगनंतर शेतात राहिलेला उभा काड आणि हार्वेस्टरने टाकलेला काड या दोन्हीचे रूपांतर भुशात करते आणि ब्लोअरच्या साहाय्याने ट्रॉलीमध्ये वाहून नेते.
 
गव्हाची कापणी ही मार्च (शेवट) किंवा एप्रिल (मध्य) मध्ये येते आणि ती तीन प्रकारे केली जाते. पहिला प्रकार म्हणजे महिला कामगार लावून विळ्याच्या साहाय्याने, दुसरे म्हणजे कापणी यंत्राचा (रिपर) वापर करून आणि तिसरे म्हणजे कंबाइन हार्वेस्टर (कापणी-मळणी एकत्र) वापरून. हवामान बदलामुळे आणि कंबाइन हार्वेस्टरच्या उपलब्धतेमुळे तिसऱ्या पद्धतीचा वापर वाढलेला दिसून येत आहे. तसेच, लहान आकारचे कंबाइन हार्वेस्टरदेखील उपलब्ध होत असल्याने लहान शेतातदेखील कापणी व मळणी एकाच वेळी करणे सोपे झाले आहे. कंबाइन हार्वेस्टरच्या वापरामुळे वेळेची आणि पैशाची बचत तर होतेच त्याचबरोबर पिकाचे नुकसानही कमी होते.
आजकाल बहुपीक मळणी यंत्र बाजारात उपलब्ध असल्याने असे मळणी यंत्र खरेदी करण्यावरदेखील शेतकऱ्याचा भर आहे. गव्हाच्या मळणीसाठी यंत्राचा वापर केल्याने जनावरांसाठी उपयुक्त असा गव्हाचा भुसा मिळतो, पण कंबाइन हार्वेस्टरच्या वापरामुळे गव्हाचा भुसा हा मिळत नाही. गव्हाचा भुसा हा जनावरांसाठी एक उत्तम पर्यायी चारा म्हणून वापरला जातो. कंबाइन हार्वेस्टर चालवल्यानंतर राहिलेला गव्हाचा काड जाळला जातो किंवा जमिनीत गाडला जातो. भुसा कंबाइन हे पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इ. भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

भुसा कंबाइन

 • या यंत्राला स्ट्रॉ रिपर किंवा स्ट्रॉ कंबाइन असेही म्हटले जाते, कारण या यंत्राद्वारेसुद्धा कंबाइन हार्वेस्टरसारखे काम केले जाते.
 • भुसा कंबाइन हे ट्रॅक्टरच्या पाठीमागे जोडले जाते आणि पीटीओद्वारे पावर देऊन चालवले जाते.
 • हे यंत्र गव्हाच्या कंबाइन हार्वेस्टिंगनंतर शेतात शिल्लक राहिलेल्या गव्हाच्या काडावर चालवले जाते.
 • कंबाइन हार्वेस्टरमध्ये गव्हाची कापणी जमिनीपासून २०-३० सें.मी. वर केली जाते. कापणी करण्याची उंची गव्हाच्या उंचीवर अवलंबून असते.
 • काडाची कापणी करणे, कापलेला आणि शेतातला काड गोळा करणे आणि तो मळणी ड्रममध्ये वाहून नेणे, त्याची मळणी करून भुसा बनवणे आणि तो भुसा ब्लोवरच्या साहाय्याने ट्राॅलीमध्ये वाहून नेणे, अशी पाच कामे एकत्रित केली जातात.
 • या काडामध्ये कंबाइन हार्वेस्टरने सोडलेल्या गव्हाच्या ओंब्यादेखील येतात आणि त्याचीही मळणी होते. त्यासाठी यात एक चाळणी दिलेली आहे, ती चाळणी गव्हाचे दाणे वेगळे करते.
 • या यंत्राला चालवण्याचा खर्च या गोळा केलेल्या गव्हातदेखील निघतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर हे यंत्र म्हणजे चालते-फिरते कटर बार जोडलेले एक मळणी यंत्रच आहे.

  भुसा कंबाइनचे प्रकार आणि भाग

 • भुसा कंबाइन हे दोन प्रकारांत उपलब्ध आहेत. पहिल्या प्रकारात भुसा कंबाइनच्या मागे भुसा साठवण्यासाठी मोठी ट्रॉली लावली जाते आणि दुसऱ्या प्रकारात त्या भुसा कंबाइनच्या वरच छोटीशी डम्पिंग ट्रॉली फीट केलेली असते.
 • पहिल्या प्रकारचे भुसा कंबाइन मोठ्या आणि लांब पट्टा असलेल्या शेतीसाठी, तर दुसऱ्या प्रकारचे भुसा कंबाइन लहान क्षेत्रासाठी उपयुक्त ठरते. - या यंत्रामध्ये कटर बार, रील, ऑगर, काड वाहक, मळणी ड्रम, मळणी सिलिंडर, चाळणी, ट्रे, हवा फेकणारा पंखा (ब्लोवर) आणि तयार झालेला भुसा फेकण्यासाठी पाईप इ. चा समावेश असतो.

कार्यपद्धती

 • भुसा कंबाइनमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे पाच कामे एकाच वेळेस चालतात. त्यासाठी भुसा कंबाइनमध्ये काड कापण्यासाठी कटर बार आणि तो आत ओढण्यासाठी एक आडवे रील त्या कटरबार वर बसविलेले असते.
 • ऑगर फीट केलेले असते ते दोन्ही बाजूने काड एकत्र करत असते आणि मळणी ड्रममध्ये पाठवत असते.
 • मळणी सिलिंडरवर छोटे छोटे दातेरी ब्लेड बसविलेले असतात. तसेच, सिलिंडरच्या खाली लगोलग एक वक्राकार जाळी (ड्रम) असते.
 • सिलिंडर आणि जाळी मिळून काडाचे रूपांतर भुश्यात करत असतात. या ड्रमच्या खाली काही अंतरावर चाळणी व त्याखाली ट्रे फीट केलेला असतो.
 • चाळणीद्वारे गव्हाचे दाणे वेगळे करून ते ट्रेमध्ये गोळा केले जातात.
 • सगळ्यात शेवटी हवा फेकणारा पंखा (ब्लोवर) फीट केलेला असतो. या ब्लोवरच्या साहाय्याने मळणीनंतर तयार झालेला भुसा ट्राॅलीमध्ये वाहून नेला जातो.
 • ब्लोवरचा पाइप हा ट्रॉलीमध्ये सोडलेला असतो. ट्रॉली ही बारीक जाळीची बनलेली असल्याने भुश्यातील धूळ निघून जाण्यास मदत होते.

यंत्राची तपशीलवार माहिती

 • शक्तीचा स्त्रोत - ३५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीचा ट्रॅक्टर (पीटीओ)
 • यंत्राचा आकारमान (अंदाजे) मी. - ३.४ x २.५ x २.१
 • कटरबार लांबी (अंदाजे), मी.- २.१
 • सरासरी कट करण्याची रुंदी, मी. - १.८-१.९
 • काडाची कट करण्याची उंची (जमिनीपासून), सें.मी - ५-७ (एवढ्या उंचीचा काड शेतात शिल्लक राहतो)
 • क्षेत्रीय क्षमता, एकर/तास - १
 • सरासरी भुसा वसुली, टक्के - ६८-७०
 • इंधन (डिझेल), लि/तास - ६-७
 • चालवण्याची गती, कि.मी./तास - २.४-२.९
 • मशीन वजन, कि. ग्रा (अंदाजे) - १८००-२०००

संपर्क ः आशिष धिमते, ९५१८९०१०२७
(कृषी वैज्ञानिक, कृषी यंत्रे व शक्ती अभियांत्रिकी, केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद) 

इतर टेक्नोवन
शेती नियोजनामध्ये हवामान सल्‍ला उपयुक्‍तकृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग...
यंत्रावर तयार करा हातसडीचा तांदूळहातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा...
पीक लागवडीसाठी इन्कलाइंड प्लेट प्लांटरपारंपरिक पद्धतीच्या पेरणीमुळे रोपांच्या विरळणीचा...
हायड्रोपोनिक्स चारानिर्मिती यंत्रणादुष्काळी परिस्थिती दुभत्या जनावरांना पुरेसा हिरवा...
जैवइंधनावर चालणाऱ्या यंत्राची निर्मिती...सध्या पडिक आणि लागवडीखाली नसलेल्या जमिनीमध्ये...
धुरळणी यंत्र फायदेशीरधुरळणी यंत्राद्वारे पावडर स्वरूपातील रासायनिक...
देखभाल ठिबक, तुषार सिंचन संचाची...सध्याच्या काळात पाण्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबक...
असे करा ट्रॅक्‍टरचे व्यवस्थापन ट्रॅक्‍टरचा कोणता भाग कधी बदलावयाचा यासाठी काही...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
खाद्य मिश्रण यंत्र, डाटा फ्लो तंत्राचा...सिन्नर (जि. नाशिक) येथील जनक कुंदे या अभियंता...
कडवंची : ब्लोअरनिर्मिती उद्योगाची सुरवातकडवंची गावातील कृष्णा क्षीरसागर, सुनील जोशी या...
सिरकॉटने तयार केले दहन सयंत्र, जिनिंग...नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन टेक्‍...
फुलांचा ताजेपणा टिकविण्यासाठी...घर किंवा कार्यालयामध्ये सजावटीसाठी फुलांचा वापर...
शेतकऱ्यांना मिळाले क्षारपड जमिनी...उत्तर प्रदेश राज्यात हरदोई जिल्ह्यातील संताराहा...
विहीर, कूपनलिका पुनर्भरण करा, भूजल साठा...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल...
‘सह्याद्री’ शेतकरी कंपनीकडून...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स...
कृत्रिम प्रकाशासाठी सोडियम दिव्यांच्या...परदेशाप्रमाणेच आपल्याकडे शेवंतीसह विविध पिकांच्या...
जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलरलेझर लॅंड लेव्हलर हे एक आधुनिक व अचूक यंत्र आहे,...
महिलांचे श्रम कमी करणारी अवजारे रोटरी टोकण यंत्र हे उभ्याने ढकला पद्धतीने...
ट्रॅक्टरचलित न्युमॅटिक प्लॅंन्टरउच्च गुणवत्तेच्या बियाण्यांचा वापर केल्याने...