म्हेत्रे यांची ‘फ्रोजन’ उत्पादने पोचली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत

अन्नप्रक्रिया उद्योगात स्पर्धा मोठी आहे. त्यात दिलीप म्हेत्रे नवखे. त्यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत व जगातील मोठ्या सुपर मार्केटसोबत ज्यांचे ‘टायअप’ अशा कंपनीसोबत काम करायचे ठरवले. त्यातून अनेक गोष्टी साध्या झाल्या.
म्हेत्रे यांची ‘फ्रोजन’ उत्पादने पोचली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत
म्हेत्रे यांची ‘फ्रोजन’ उत्पादने पोचली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत

पुणे जिल्ह्यातील सहजपूर (उरुळी कांचन) येथील शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित अभियंता दिलीप म्हेत्रे यांनी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगले. धडाडीने कोरूगेडेट बॉक्स निर्मितीचा उद्योग विस्तारला. दूरदृष्टीने शेतमालावर प्रक्रिया करून ‘फ्रोजन फूड’ची विस्तृत श्रेणी तयार केली. जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान, मशिनरी, कोल्ड स्टोरेजेस यांनी परिपूर्ण प्रक्रिया उद्योग उभारला. स्थानिकसह निर्यातीचे मार्केट हेरून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण, दर्जेदार उत्पादनांना अोळख मिळवून दिली.   पुणे-सोलापूर रस्त्यावर पुण्यापासून काही किलोमीटरवरील सहजपूर (उरुळी कांचन) येथील दिलीप म्हेत्रे कुटुंबाची सुमारे ६० एकर शेती. शेतीची जबाबदारी वडील दत्तात्रय म्हेत्रे सांभाळतात. दिलीप ‘इलेक्ट्रॉनिक्स’ विषयातून इंजिनियर झाले. नोकरी न करता उद्योजक व्हायचं हेच त्यांचं ध्येय होतं. त्यास अनुषंगून एमबीए (मार्केटिंग) व ‘मास्टर इन लेबर लॉज’ अशा पदव्या घेत आपली शैक्षणिक कारकीर्द अधिक भक्कम केली. तुम्ही थोडा आधार दिलात तर उद्योगात काही तरी करू शकेन असं आई-वडिलांना बोलूनही दाखवलं. भूविकास बॅंकेने त्या वेळी शेतीपूरक उद्योगातील काही प्रकल्प सुरू केले होते. पॅकेजिंग हा त्यापैकी होता. याच बॅंकेत म्हेत्रे कुटुंबाचे खाते होते. त्यामुळे बॅंकेशी चांगले संबंध होते. थोडा वेगळा व भविष्यातही वाव असणाऱ्या पॅकेजिंग उद्योगाची निवड म्हेत्रे यांनी केली. जोखीम घेण्याची वृत्ती, धडाडी, भक्कम शैक्षणिक बाजू, सतत शिकण्याची व कक्षा रुंदावण्याची वृत्ती हे गुण जपले. त्यातूनच कोरूगेटेड बॉक्स निर्मितीचा उद्योग (म्हेत्रे पॅकेजिंग) सुरू केला. विस्तारला. त्यात मोठे नाव कमावले.

प्रक्रिया उद्योगात पदार्पण  पॅकेजिंग उद्योगात चांगली स्थिरता आल्यानंतर उद्योगाचा विस्तार करण्याचे म्हेत्रे यांनी ठरवले. शेतकरी कुटुंबाचीच पार्श्वभूमी असल्याने शेतीतच काही करावे असे वाटू लागले. सन २०१२ ची ही गोष्ट. त्यावेळेस आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सल्लागार संदीप वासलेकर यांच्या एका वाक्यानं मनावर परिणाम केला.  आपल्या मालावर स्वतःच प्रक्रिया करणं एकट्या शेतकऱ्याला कदाचीत अवघड ठरू शकतं. त्यासाठी उद्योजकांनी पुढे यायला हवे असे ते म्हणाले होते. हीच प्रेरणा मिळाली. या उद्योगातील मित्र बाळासाहेब शिंदे यांचाही सल्ला मोलाचा ठरला. ‘होमवर्क’ केलं आणि म्हेत्रे पूर्ण तयारीनिशी कामाला लागले. त्यातूनच उभी राहिली ‘म्हेत्रे फूडस’ ही कंपनी. दिलीप आज म्हेत्रे समूह उद्योगाचे सरव्यवस्थापक आहेत. त्यांच्या व्यवसायाचे मॉडेल जरूर अभ्यासण्याजोगेच आहे.  व्यवसायाची पद्धती 

  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अन्नउद्योग क्षेत्रातील कार्यरत कंपनीसोबत टाय अप, त्यांना उत्पादने पुरवणे
  • म्हेत्रे फूडस हा ब्रॅंड तयार करून स्वतःच्या कंपनीतर्फेही विक्री- मार्केटिंग  
  •  ‘बॅकवर्ड इंटिग्रेशन’- लागणारा शेतमाल शेतकऱ्यांकडून खरेदी करणे  यात मागील वर्षी ११६० शेतकऱ्यांसोबत काम केले. जिल्हे- पुणे, नाशिक, कोल्हापूर 
  • या बाबींमध्ये जागतिक दर्जा 

  •  प्रमाणीकरण
  •  यंत्रसामग्री
  •  प्रक्रिया उत्पादने  
  • पॅकेजिंग उद्योगातील ठळक नाव 

  • म्हेत्रे पॅकेजिंग उद्योगात तब्बल २१ वर्षांपासून कार्यरत. कोरूगेडेट बॉक्सची निर्मिती. 
  • देशातील नामवंत कंपन्या त्यांच्याकडून बॉक्स घेतात. उदा. आयटीसी फूड डिव्हिजन (बटाटा वेफर्स, गव्हाचे न्यूडल्स आदींसाठी), एशियन पेंटस, मॅप्रो, पेप्सिको तर मध्यस्थ कंपनीमार्फत कमिन्स, अशोक लेलॅंड, टेल्को, जॉन डिअर, गॅलॅक्सी आदींसाठी पुरवठा. उद्योगात बंधू विकास यांचीही मोठी जबाबदारी.  
  • दुबई व युरोपसाठी द्राक्षाचे बॉक्स पुरवतात. नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी दीड लाख तर पुण्यातील निर्यातदारांना एक लाख असे अडीच लाख बाॅक्सेस पुरवले. 
  • दिवसाला बॉक्सेसची निर्मिती- ८० हजार, दररोज लागणारा पेपर- ३० ते ३५ टन 
  • कंपनीसोबतच्या टायअपचा फायदा  

  • अन्नप्रक्रिया उद्योगात स्पर्धा मोठी आहे. त्यात म्हेत्रे नवखे. त्यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत व जगातील मोठ्या सुपर मार्केटसोबत ज्यांचे ‘टायअप’ अशा कंपनीसोबत काम करायचे ठरवले. त्यातून अनेक गोष्टी साध्या झाल्या.    
  • पिझा उत्पादनाच्या टॉपिंगसाठी विशिष्ट प्रकारच्या मिरच्या वापरल्या जातात. संबंधित कंपनीचा अनुभव व तांत्रिक मदत घेऊन शेतकऱ्यांसोबत या मिरच्यांसाठी करार शेती केली. 
  • हिरव्या मिरचीला किलोला १७ रुपये तर लाल रंग झाल्यानंतर २४ रुपये असा हमीभाव दिला. 
  • याच कंपनीने त्यानंतर ताजा व फ्रोजन बेबीकॉर्न पुरवण्याची आॅफर म्हेत्रे यांना दिली. आव्हान समजून तेही काम यशस्वी केले.  उद्योग समूहाची रचना   

  • ठिकाण- सहजपूर, क्षेत्र- चार एकर. तीन मजले  
  • कोल्ड स्टोरेजेस-
  • तीन- ० ते १८ अंश सेल्सिअस तापमानाची- ताज्या मालांसाठी 
  • चार- ० ते उणे १८ अंश तापमानाची. ‘फ्रोजन’साठी.  
  • प्रत्येक कोल्ड स्टोरेजला तीन असे एकूण २१ चेंबर्स. 
  • प्रक्रिया करताना कोणतीही रसायने वापरली जात नाहीत. नैसर्गिक पद्धतीने उत्पादन
  •    तंत्रज्ञान  

  • जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानच वापरायचे असेच ठरवले होते. त्यादृष्टीने तैवानहून स्वतःच्या गरजेनुसार  ‘कस्टमाईज्ड प्रोसेस लाइन’ यंत्रणा डिझाइन करून आणली.  
  • आयक्यूएफ तंत्र-इटली, फ्रोजन, कोल्ड स्टोरेजेस, कॉंप्रेसर्स, इव्हॅपोरेटर्स आदी यंत्रे या क्षेत्रात जगात आघाडीवर असलेल्या जर्मनीहून आणली. 
  •   कंपनीचे विभाग व मनुष्यबळ 

  • उत्पादन (प्राॅडक्शन), गुणवत्ता नियंत्रण- संबंधित क्षेत्रातील उच्चशिक्षित व्यक्तींकडे जबाबदारी. शेतकऱ्यांकडून कच्चा माल घेण्याची जबाबदारी- दिलीप यांचे धाकटे बंधू प्रकाश सांभाळतात. प्रयोगशाळा- मालाचे पृथ्थकरण (ॲनालिसिस)- रंग, ब्रिक्स, वजन, दर्जा आदी. अन्नप्रक्रियेतील दीर्घ अनुभव असलेल्या कन्सलटंटची नेमणूक  
  • दर मंगळवारी ‘रिव्ह्यू मेकॅनिझम’ बैठक. मागील आठवड्यातील उद्दिष्टे, पुढील आठवड्यात त्यातील किती पूर्ण झाली, अपूर्ण का राहिली? तसेच पुढील आठवड्याचे प्लॅनिंग असे अवलोकन या वेळी होते. अन्नप्रक्रिया उद्योगातील रोजगारनिर्मिती- सुमारे ३००
  • मार्केट

    निर्यात 

  •  खासगी कंपनीच्या ब्रॅंडने- निर्यात- बेल्जियम, इंग्लंड, जर्मनी- 
  •  यंदापासूनच रशिया- मॉस्को येथे निर्यात सुरू केली. त्यासाठी रशियातील एका कंपनीसोबत ‘टायअप’.  आत्तापर्यंत फ्रोजन स्वीट कॉर्नचे चार कंटेनर पाठवले. (२२ ते २४ टनांचा कंटेनर). दर महिन्याला चार कंटेनर निर्यातीचे टार्गेट. पालक, फ्लाॅवरचे नमुनेही रशियात पाठवले. ते संबंधित कंपनीकडून संमत झाले आहेत. इराणकडून फ्रोजन पपईची आॅर्डर आली आहे. त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू आहे. 
  •   देशांतर्गत विक्री      गोवा, बंगळूर, चेन्नईमध्ये उत्पादनांचा पुरवठा. बंगळूरमधील एका कंपनीला मध्यस्थांमार्फत महिन्याला सुमारे पाच ते १० टन पालक पुरवतात. म्हेत्रे सांगतात, की आपल्या भागात पालक फार चांगला येतो. त्यामुळे दर्जेदार उत्पादन देणे शक्य होते.  

    खालील उत्पादनांची स्थानिक विक्री (फ्रोजन व ‘रेडी टू कूक’) 

  • म्हेत्रे फूड्स या स्वतःच्या ब्रॅंडने 
  • फ्रोजन वाटाणे- (ग्रीन पीज)- हंगामात चारशे टन उत्पादन. त्यासाठी कच्चा माल म्हणून एकहजार टन शेंगा लागतात.
  • फ्रोजन स्वीट कॉर्न 
  • मिक्स व्हेज (हिरवा वाटाणा, स्वीट कॉर्न, घेवडा (फ्रेंच बीन) व गाजर असे चार घटकांचे मिश्रण 
  • पुण्यातील शुक्रवार पेठेत स्वतःचे ‘रिटेल शॉप’. मोठ्या प्रमाणातही (बल्क) व्यापारी घेतात. पुण्यात मार्केटिंग टीम, स्टोअर. महिन्याला सुमारे ३० टनांपर्यंत वितरण वा विक्री.    
  • स्लाईज मॅंगो उत्पादन प्रस्तावीत. एक टन पल्पची निर्मिती.   
  • अन्य कंपन्यांसाठी काम         मुंबईस्थित निर्यातदार कंपनीची भेंडी प्रक्रियेसाठी म्हेत्रे यांच्या उद्योगाकडे येते. येथे ‘कटिंग’, वॉशिंग, ‘आयक्यूएफ’ तंत्राद्वारे उणे १८ अंश सेल्सिअस तापमानाला प्रक्रिया, त्यानंतर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणे, पॅकिंग, कंटेनरमध्ये लोडिंग आदी सर्व सुविधा दिल्या जातात.  आंतरराष्ट्रीय स्टॅंडर्डस  

  • आंतरराष्ट्रीय व युरोपीय कंपन्यांसोबत काम करीत असल्याने उद्योगाला त्या दर्जाचे स्टॅंडर्डस येण्यासाठी 
  • हॅसेप, बीआरसी प्रमाणपत्रे, अपेडा, आयएसअो २२०००, ‘फूड सेफ्टी’चे एफएसएसआय
  • टायअप केलेल्या कंपनीच्या शेतकऱ्यांकडे ग्लोबलगॅप प्रमाणपत्र   
  •   व्हिजन  

  •  सध्या कोरूगेडेट बॉक्सनिर्मितीसाठी कच्चा माल (क्राफ्ट पेपर) अन्य कंपन्यांकडून घेतला जातो. येत्या काळात स्वतःच तो बनवून बॉक्सनिर्मिती करणार. त्यातून स्वउत्पादनांची विक्री करणार- इतरांना बॉक्स पुरवणार
  • ‘कोल्ड स्टोरेज’साठी वीज हा मोठा खर्च. सोलर पॅनेल वापरून तो कमी करण्णार.     ‘
  • रेडी टू कूक’ श्रेणीतून ‘रेडी डू इट’ श्रेणीत जायचे आहे. 
  •  आर्थिक मदत  अन्नप्रक्रिया मंत्रालयांतर्गत अनुदान योजनेसाठी २०१२ मध्ये प्रस्ताव दिला. साडेबारा कोटी रुपयांचे युनिट होते. ते जागतिक दर्जाचे बनवायचे असल्याने बजेट २१ कोटींवर गेले. योजनेंतर्गत मिळालेले पाच कोटींचे अनुदान व स्वतःकडील रकमेतून विस्तार केला. अखिल भारतीय द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सोपान कांचन यांनीही मार्गदर्शन व सहकार्य केले. 

     म्हेत्रे यांची ध्येयधोरणे 

  •     बाजारात मला ५० स्पर्धक असतील. पण मी ५१ वा सर्वोत्तम ठरेन अशीच कामिगिरी करेन.  
  •     इच्छाशक्ती सर्वांत महत्त्वाची. मग गुणवत्ता, आर्थिक, कायदेशीर किंवा अन्य कोणत्याही बाबींमध्ये कितीही अडथळे आले तरी ते दूर करण्याची क्षमता तयार होते.  
  •     अन्नप्रक्रियेत अनेक युनिटस आजारी आहेत. त्याची कारणे अभ्यासून आपली दिशा ठरवली तर तशी वेळ येत नाही. 
  •     ‘कंफर्ट  झोन’मध्ये सगळेच खेळतात. आपण त्याबाहेर जाऊन ‘चॅलेंज’ का घेऊ नये? 
  • ‘पॅकेजिंग’सारखा उद्योग आपण सक्षम केला आहे. अन्नप्रक्रिया उद्योगदेखील आपण यशस्वी करू शकतो. नुकसान झाले तरी घाबरायचे कशाला? निसर्गाने आपल्याला बुद्धी, हात, पाय दिले आहेत. त्यांचा वापर करून पुढं जायचं. 
  •     व्यवसायात नवे असता त्या वेळी तुम्ही कुणाबरोबर काम करता ते जास्त महत्त्वाचे असते. शिकण्याची तीच वेळ असते. जगात ज्यांचे नियम, निकष सर्वांत कडक, अशांबरोबर काम कराल तर तुम्हीही तसेच घडता. आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीसोबत काम करण्याची संधी घेतली. त्यातून खूप शिकलो. 
  • फ्रोजन प्रक्रिया तंत्रज्ञानातील मुख्य ठळक टप्पे (बेबी कॉर्नचे प्रातिनिधिक उदाहरण. उत्पादननिहाय त्यात बदल होऊ शकतो.) 
  •     कच्चा माल ‘प्रोसेस लाइन’मध्ये येतो. कणसाची पाने काढून यंत्राद्वारे समान तुकडे 
  •     वॉशर्स (उदा. बबलर वॉशर) हवेचे प्रेशर तसेच युव्ही, आरअो, सोडियम हायपोक्लोराईट आदींचा वापर केलेल्या प्रक्रियायुक्त पाण्याद्वारे उत्पादनाचे विशिष्ट टप्प्यांमध्ये वॉशिंग
  •     मालातील अशुद्धपणा काढणे व निर्जंतुकीकरण हे उद्दिष्ट. स्पायरल ब्लांचिग- उत्पादनाच्या प्रकारानुसार सुमारे ९० अंश सेल्सिअस तापमानाला. उत्पादनाचे ‘शेल्फ लाइफ’ वाढविण्यासाठी. मालाचे प्रयोगशाळेत पृथ्थकरण, थंड पाण्याची प्रक्रिया- उत्पादनाचे तापमान खाली आणणे 
  •     शेकर- यात उत्पादनातील पाणी काढले जाते. बर्फ होणार नाही अशा अवस्थेपर्यंत.  
  •     आयक्यूएफ (इंडिव्हीज्युएल क्विक फ्रिजींग) अधिक फ्ल्यूडाईज्ड टेक्नाॅलॉजीचा वापर- यात चेंबरमध्ये उत्पादनाचा प्रत्येक कण न कण ‘इंडीज्युव्हल क्विक फ्रीज’ केला जातो. त्याचे तापमान उणे १८ ते उणे २३ पर्यंत खाली आणले जाते. उत्पादनाचे तापमान अत्यंत खाली आणताना विशिष्ट तंत्रज्ञानाद्वारे त्याचा प्रत्येक रेणू हवेत तरंगत ठेवण्यात येतो. (एअर सस्पेंडेंड). यात सर्व बाजूंनी त्याला हवा लागते. त्यामुळे त्याचा कण न कण जलदगतीने फ्रिज होतो. प्रक्रियेच्या अखेरीस उत्पादनाचे तापमान उणे १८ अंश सेल्सिअसला आणले जाते. या तापमानाला कोल्ड स्टोरेजला उत्पादने ठेवली जातात.  
  • असे होतात फायदे 

  • उत्पादनाचे ‘टेक्चर’ जपले जाते. 
  • उत्पादनाचा फ्लेवर, चव, रंग या बाबी टिकून राहतात. 
  • फळे व भाजीपाल्यांप्रमाणे उत्पादन ताजे राहते. 
  •  ः दिलीप म्हेत्रे,  ९४२२३१२५०३ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com