दोन हंगामांत स्वीट कॉर्न !

केवळ पिके फायदेशीर वाटून चालणारे नव्हते. त्यासाठी सक्षम बाजारपेठ आहे का? कोणती? दर कसे मिळतात याबाबतची संपूर्ण माहिती घेण्यास सुरवात केली. अन्न प्रक्रियेत कार्यरत काही उद्योगांकडेही याबाबत माहिती मिळवली.
वन्य प्राण्यांपासून पिकाला संरक्षण मिळावे यासाठी नेटचा वापर
वन्य प्राण्यांपासून पिकाला संरक्षण मिळावे यासाठी नेटचा वापर

क्षेत्र केवळ ५१ गुंठे. त्यातही दुष्काळी भाग. तरीही जिगर, जिद्द व नावीन्याचा शोध घेत ही शेती आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्यात तोंडोली (जि. सांगली) येथील सुरेश धुलगुडे हा युवा शेतकरी यशस्वी झाला आहे. वर्षातील दोन हंगामात केवळ स्वीट कॉर्न घेत त्याला जागेवरच मार्केटही शोधले आहे. शिवाय घरच्या जनावरांसाठी चाऱ्याचीही सोय केली आहे.  सांगली जिल्ह्यात कडेगाव तालुक्‍यातील तोंडोली गावात कायम पाण्याची टंचाई असते. या भागात टेंभू योजनेचं पाणी खेळलं आहे. पण गावातील जो भाग उंचावर आहे तिथं या पाण्याचा तसा काहीच फायदा होत नाही. गावातील शेतकरी ऊस तसेच हंगामी पिकं घेतात.

धुलगुडे यांची शेती गावातील सुरेश उत्तम धुलगुडे यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची. शेती करण्याची त्यांनाही आवड होतीच. मात्र कौटुंबिक उदरविर्नाहासाठी त्यांना घराबाहेर पडावे लागले. सुमारे १० वर्षे प्रवासी वाहनासाठी चालक (टूरिस्ट ड्रायव्हर) म्हणून काम केले. शेतजमिनीची वाटणी झाली त्यात हिस्स्याला ५१ गुंठे शेती आली. पुढे वाहनचालक व्यवसायापेक्षा शेतीचे भविष्यच त्यांना अधिक खुणावू लागले. शेतीच पूर्णवेळ करायचे ठरले.  

शेतीत केलेल्या सुधारणा सुरेश यांची जमीन मध्यम व हलकी निचरा होणारी आहे. सुरवातीला ते हंगामी पिके घेऊ लागले. मात्र आर्थिक ताळमेळ बसत नव्हता. घेतलेला ऊस जोमात आला होता. पण पुढे पाण्याची कमतरता पडू लागली तसं उभं पीक वाळून गेलं. यामुळे चेहऱ्यावरचा आनंद उडून गेला. पण सुरेश खचले नाहीत. शेतीत सुधारणा केल्याशिवाय चित्र बदलणार नाही हे मनोमन पटले. तशी पाऊले टाकण्यास सुरवात करीत जोमानं नव्या प्रयोगांची आखणी केली.  नव्या प्रयोगांच्या शोधात मागील अनुभव पाहाता कमी पाण्यात, कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांचा शोध सुरू झाला. गावातील शेतकऱ्यांकडील वेगळ्या पीक पद्धतींचा अभ्यास सुरू झाला. या परिसरात बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न आदी पिकांची करार शेती केली जाते. आपल्या अनुषंगाने ही पिके फायदेशीर ठरतील असे सुरेश यांना अभ्यासाअंती वाटले.  अाधी शोधले मार्केट   केवळ पिके फायदेशीर वाटून चालणारे नव्हते. त्यासाठी सक्षम बाजारपेठ आहे का? कोणती? दर कसे मिळतात याबाबतची संपूर्ण माहिती घेण्यास सुरवात केली. अन्न प्रक्रियेत कार्यरत काही उद्योगांकडेही याबाबत माहिती मिळवली. सुमारे दोन महिने अभ्यासातून मार्केटची वस्तुस्थिती समोर आली. त्यानंतर सुरू झाली स्वीट कॉर्नची शेती. 

मार्केट व दर सुरेश म्हणाले, की आमच्या भागात स्वीटकॉर्नची करार शेती होते. मात्र प्रति किलो सहा रुपये दर संबंधित कंपनी देते. मी मात्र शेजारील कऱ्हाड तालुक्यातील व्यापाऱ्यांना माल देतो. ते जागेवर येऊन खरेदी करतात. त्यामुळे वाहतूक व अन्य खर्च वाचतात. चार पिकांच्या अनुभवातं दर किलोला सात ते दहा रुपये मिळाला आहे.     उत्पन्नाचा स्त्रोत वाढला  स्वीट कॉर्नमधून अपेक्षित उत्पन्न मिळू लागल्याने उत्साह वाढला. केवळ शेतीवर अवलंबून न राहता दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. एक गाय, म्हैस खरेदी केली. जनावरांची संख्या वाढवली. चारा मुबलक मिळावा यासाठी चितळे डेअरीत जाऊन मुरघास बनविण्याची पद्धत शिकून घेतली. आज दोन टन चारा या पद्धतीने साठवला आहे.   स्वीट काॅर्न शेती दृष्टिक्षेपात

  • सन : २०१५  (त्याचवर्षी आॅक्टोबर २०१५)
  • क्षेत्र : १८ गुंठे (क्षेत्र : ३६ गुंठे )
  • हंगाम: जून
  • उत्पादन : दोन टन ८०० किलो (उत्पादन : सहा टन २०० किलो )
  • बियाणे : २ किलो वापरले.
  • सुरेश सांगतात स्वीट कॉर्न का फायद्याचे? 

  • नव्वद ते ११० दिवसांचे कमी कालावधीचे पीक. त्यामुळे उसाच्या तुलनेत पाण्याची गरज कमी. एका हंगामात घेतले तरी उत्पन्न समाधानकारक. 
  • जनावरांसाठी पुरेसा चारा मिळतो. सध्या पाच गायी, एक म्हैस. एक गाय दुधावर. दोन्ही वेळचे दूध १४ लिटरपर्यंत. ते डेअरीला दिले जाते. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळते. 
  • स्वीट कॉर्न पिकास मनुष्यबळही कमी लागते. 
  • जागेवर विक्री. यामुळे वाहतूक खर्च कमी. नफा वाढतो.  
  • एका ताटाला एकच कणीस ठेवल्याने वजन सुमारे ६०० ग्रॅम पर्यंत जाते. 
  • शिल्लक चाऱ्याची गुंठ्याला ५०० रुपये दराने विक्री होते.       नियोजनातील ठळक बाबी
  •  वर्षातील कोणतेही हंगाम घेताना मार्च ते मे या काळात कटींग येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. 
  •  प्रत्येक हंगामातील अनुभवानुसार पुढील नियोजनात बदल. सरी पद्धत, त्यानंतर गादीवाफा (बेड) पद्धत. पण या पद्धतीत पाणी अधिक लागते असे आढळले. त्यानंतर बेड ठेवले. मात्र लागवड सरीत केली. दुसऱ्या प्रयोगात साडेचार फुटी सरीचा वापर केला.  शेतीतील वाटचालीत माझी पत्नी सौ. उषाने आधार दिल्याने कधीच खचलो नाही. वेळोवेळी तिने प्रोत्साहन दिले. त्यातून शेतीत नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या. - सुरेश धुलगुडे   : सुरेश उत्तम धुलगुडे, ७५८८६२७३७४ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com