agriculture success story in marathi, Achalpur, Amravati, maharashtra | Agrowon

भाडेतत्त्वावरील शेतीतून मिळवली आर्थिक सक्षमता 
विनोद इंगोले
शनिवार, 28 एप्रिल 2018

अचलपूर (जि. अमरावती) येथील रितेश दिलीपराव पोटे यांची घरची केवळ सहा एकर शेती. अल्पभूधारक असल्याचे शल्य न बाळगता रितेश यांनी भाडेतत्त्वावर सुमारे ४५ एकर शेती कसून व्यवसायिकतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. या शिवारात यशस्वी भाजीपाला उत्पादक शेतकरी म्हणून त्यांनी अापली अोळख ठळक केली अाहे.   

अचलपूर (जि. अमरावती) येथील रितेश दिलीपराव पोटे यांची घरची केवळ सहा एकर शेती. अल्पभूधारक असल्याचे शल्य न बाळगता रितेश यांनी भाडेतत्त्वावर सुमारे ४५ एकर शेती कसून व्यवसायिकतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. या शिवारात यशस्वी भाजीपाला उत्पादक शेतकरी म्हणून त्यांनी अापली अोळख ठळक केली अाहे.   

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुका हा संत्रा व केळी पिकासाठी प्रसिद्ध आहे. या भागात सिंचनाकरिता प्रकल्प नसले तरी विहिरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सिंचन सुविधा बळकट केल्या आहेत. भूगर्भात पाणीसंचय चांगला असल्याने शेतकऱ्यांना केळी, संत्र्यासारखी व्यावसायिक पिके घेणे शक्‍य होते. येथील पोटे कुटुंबीयांची वडिलोपार्जित सहा एकर शेती. घरच्या शेतीसोबत रितेश तब्बल ४५ एकर शेती भाड्याने कसतात. यामध्ये जोखीम पत्करुन भाजीपाला पिकाची एकाच वेळी १० ते २० एकरावर लागवड करतात.  

भाडेतत्त्वावरील शेतीचा पॅटर्न
घरची जेमतेम सहा एकर शेती असली तरी रितेश गेल्या १२ वर्षांपासून एकूण ४५ एकर शेती भाडेतत्त्वावर कसतात. दहा ते पंधरा हजार रुपये एकरी याप्रमाणे वर्षभराचा करार राहतो. कारली, चवळी, वांगी, केळी, कलिंगड, काकडी, हिरवी मिरची इ. पिके घेतली जातात. या वर्षी हिरव्या मिरची ऐवजी ते ढोबळी मिरचीची लागवड करणार अाहेत. 

जोखीम पत्करणाराच होतो यशस्वी 
सकाळी साडेपाच वाजता रितेश यांचा दिवस सुरू होतो. रितेश पिकांची लागवड थोड्या थोडक्‍या क्षेत्रावर न करता एकाचवेळी १० ते २० एकरावर भाजीपाला पिकाची लागवड करतात. जोखीम पत्करणारा व्यक्‍तीच जीवनात यशस्वी होतो, असे ते सांगतात. त्यानुसार २००७ साली २२ एकरावर वांगी अाणि २२ एकरावर हिरव्या मिरचीची लागवड केली होती. त्या वेळी या दोन्ही पिकांपासून चांगला फायदा मिळाला होता. या पैशातून त्यांनी सहा एकर जमीन खरेदी केली. 

भाडेतत्त्वावर यंत्रांचा वापर 
    ५१ एकर शेती कसणाऱ्या रितेश यांच्याकडे स्वतःची बैलजोडी किंवा ट्रॅक्‍टरदेखील नाही. आवश्‍यक त्या वेळी भाडेतत्त्वावर ट्रॅक्‍टर व इतर अवजारे भाडेतत्त्वावर घेतली जातात. यंत्रांचा देखभालीचा खर्च जास्त असतो. त्यापेक्षा यंत्रे भाड्याने घेतलेली फायदेशीर ठरतात असा त्यांचा अनुभव आहे. 

मजुरांमार्फत होते व्यवस्थापन
५१ एकर शेतीचे व्यवस्थापन एकट्याने होणे शक्‍य नव्हते; त्यामुळे रितेश यांनी मध्य प्रदेशातील १७ मजूर शेतीकामासाठी ठेवले आहेत. गरज पडल्यास आणखी मजूर शेतीकामासाठी आणले जातात. मजुरांना १५० ते २५० रुपये अशी मजुरी दिली जाते.  

संपूर्ण शेतीला ठिबक सिंचन
रितेश यांची चार ठिकाणी विभागून शेती अाहे. सिंचनासाठी काही ठिकाणी विहीर तर काही ठिकाणी कूपनलिकेची सोय केली अाहे. संपूर्ण ५१ एकर शेती ठिबकखाली आणली आहे. ठिबकमुळे विद्राव्य खते देण्याचे काम सोपे होते. परिणामी मजुरी आणि वेळही वाचतो. 

गटाच्या माध्यमातून भाजीपाला लागवडीचे नियोजन
या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येत माउली अॅग्रो मॅनेजमेंट नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. त्या माध्यमातून पुढे गटाची स्थापना करून ३०० ते ३५० एकरांवर भाजीपाला लागवड करण्याचा रितेश पोेटे यांचे नियोजन आहे. 

पोटे यांची पीकपद्धती दृष्टिक्षेपात
संत्रा 

 • तीन वर्षांपूर्वी ६ एकर क्षेत्रावर संत्र्याची लागवड.
 • सध्या संत्र्याची झाडे तीन वर्षे वयाची असल्याने त्यात टोमॅटोचे आंतरपीक घेतले अाहे. 
 • लागवडीपासून सरासरी चार वर्षे संत्रा पिकात आंतरपीक घेता येते. सध्या     रितेश यांच्या शेतातील झाडे तीन वर्षांची झाली आहेत. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत आंतरपीक घेणे शक्‍य होणार आहे. 

कलिंगड

 • या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुमारे ११ एकरावर लागवड. 
 • एकरी २२ टन उत्पादन.
 • प्रतिकिलो सात ते साडेसात रुपये दर मिळाला. 
 • नागपूर तसेच जम्मू-काश्‍मीर येथील व्यापाऱ्याला कलिंगडाची विक्री.
 • व्यवस्थापनासाठी एकरी सुमारे ४५ ते ४७ हजार रुपयांचा खर्च.

केळी  

 • गेल्या ३ वर्षांपासून साडेतीन एकरावर केळीची लागवड. एकरी सुमारे १८०० झाडे.
 • एका झाडापासून हंगामात सरासरी २० ते २५ किलोचे उत्पादन.
 • व्यापाऱ्यांना केळीची जागेवर विक्री. 
 • गेल्या वर्षीच्या हंगामात ८ ते १० रुपये प्रति किलोस दर मिळाला. 
 • केळीच्या व्यवस्थापनावर प्रतिझाड ७० रुपये खर्च.

  टोमॅटो 

 • गेल्या अाठ वर्षांपासून टोमॅटोची लागवड.
 • ६ एकर संत्रालागवडीमध्ये टोमॅटोचे आंतरपीक.
 • गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आच्छादनाचा वापर करून पाच बाय एक फूट आकाराच्या बेडवर लागवड.
 • नोव्हेंबर २०१७ पासून उत्पादन सुरू.
 • प्रतिक्रेटसाठी कमीतकमी १५० रु. तर जास्तीत १३०० रु. पर्यंत उच्चांकी दर.
 • यंदा सर्वात उच्चांकी दर (प्रतिक्रेटसाठी १३०० रु.) मिळाला.
 • एकरी व्यवस्थापनासाठी सुमारे ४७ हजार रुपये खर्च.
 • १९ हजार क्रेटपासून यंदा चांगला फायदा मिळाला.
 • अमरावती सोबतच मध्य प्रदेशमध्ये टोमॅटो विक्रीसाठी पाठविला जातो. कधी कधी थेट शेतावरून विक्री केली जाते. 

कारली 

 • सुमारे दहा एकरावर जून महिन्यात कारल्याची लागवड.
 • ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात उत्पादनास सुरवात. या काळात मागणी जास्त असते. त्यामुळे चांगला दर मिळतो.
 • गेल्या वर्षी किलोसाठी २५ ते ४० रुपये दर मिळाला. 
 • व्यवस्थापनासाठी ४५ ते ४८ हजार रुपये खर्च.

खरबूज
     फेब्रुवारी महिन्यात चार एकरावर लागवड.

संपर्क ः रितेश पोटे, ९७६५३३१२३९

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...