agriculture success story in marathi, forward market of agricultural commodities | Agrowon

मका, हरभरा वगळता सर्व पिकांच्या भावात वाढ
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 16 मार्च 2018

या सप्ताहात हळद वगळता सर्वांचे भाव घसरले किंवा स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका व हरभरा वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील.

सोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता जुलै फ्युचर्समध्ये विकला, तर ३.७ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,९१६) मिळेल. गवार बीचे भाव जूनमध्ये सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १.८ टक्क्यांनी अधिक (रु. ४,३७६) मिळतील. कापसाचे भाव जुलै मध्ये ५.१ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २१,०००). गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

या सप्ताहात हळद वगळता सर्वांचे भाव घसरले किंवा स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका व हरभरा वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील.

सोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता जुलै फ्युचर्समध्ये विकला, तर ३.७ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,९१६) मिळेल. गवार बीचे भाव जूनमध्ये सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १.८ टक्क्यांनी अधिक (रु. ४,३७६) मिळतील. कापसाचे भाव जुलै मध्ये ५.१ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २१,०००). गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका
रबी मक्याच्या (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु.१,१७३ ते रु. १,१५०). या सप्ताहात त्या रु. १,१४८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२५० वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,१४० वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,४२५ आहे. वाढत्या उत्पादनाच्या व नवीन आवकेच्या अपेक्षेने किमती कमी होण्याची शक्यता आहे.

साखर
साखरेच्या (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात चढत होत्या (रु. २,९५२ ते रु. ३,३६१). या सप्ताहात त्या रु. ३,३६१ वर स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,११७ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,३६१ वर आल्या आहेत. १९ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारतातील साखरेचे उत्पादन २४९ लाख टन होईल. (गेल्या वर्षीचे उत्पादन : २५० लाख टन). साखरेचे भाव काही प्रमाणात चढण्याची
शक्यता आहे.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात रु. ३,९९७ पर्यंत वाढल्या व नंतर त्या रु. ३,८०० च्या दरम्यान राहिल्या. गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या २.७ टक्क्यांनी घसरून रु. ३,७९१ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती ३.९ टक्क्यांनी घसरून रु. ३,७७७ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,९१६ वर आल्या आहेत. हमी भाव (बोनससहित) रु. ३,०५० आहे. आंतरराष्ट्रीय व देशातील उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खाद्य तेल-उद्योगाची मागणी वाढत आहे. शासनाने हमी भावाने सोयाबीन जरी खरेदी करण्याची तयारी दर्शवली असली, तरी या वर्षी ती वेळ येणार नाही. पुढील वर्षी सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊन ती २० लाख टनावर जाईल, असा अंदाज केला गेला आहे (मागील वर्षीची निर्यात : १५ लाख टन). शासनाचे सोया पेंडीच्या निर्यातीला उत्तेजन देण्याचे धोरण आहे. आयात शुल्क ४० टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर वाढवले आहे. आवक कमी होत आहे. त्यामुळे पुढील काही महिने किमतींत वाढीचा कल राहण्याचा संभव आहे.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारीमध्ये घसरत होत्या (रु. ७,३५२ ते ६,५७८). या सप्ताहात त्या ३.६ टक्क्यांनी वाढून रु. ६,७६४ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,८०० वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,९२८). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणी वाढती आहे. निर्यात मागणीसुद्धा वाढती आहे. मात्र, पुढील काही दिवसांत वाढत्या आवकेमुळे किमतीमधील वाढ रोखली जाईल.

गहू
गव्हाच्या (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात वाढत होत्या. ( रु. १,६०० ते रु. १,७७७). या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी घसरून रु. १,७७६ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,७२१ वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,७५५). एप्रिलपासून मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनससहित) रु. १,७३५ आहे.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ४,८३१ ते रु. ४,२७६). या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी वाढून रु. ४,३११ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३०० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जून २०१८ मधील फ्युचर्स किमती १.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३७६). किमती घसरण्याचा संभव आहे.

हरभरा
फेब्रुवारी महिन्यात हरभरयाच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती रु. ३,७८९ वरून २० तारखेला ३,९८८८ पर्यंत वाढल्या; नंतर त्या घसरत महिना-अखेर रु. ३,६६५ पर्यंत आल्या. या सप्ताहात त्या १.८ टक्क्यांनी घसरून रु. ३,६६२ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,६९६ वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,७४०). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिल नंतर भाव घसरू नयेत, यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. किमतीत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात रु. २०,५९० वरून १९ तारखेला रु. १९,९३० पर्यंत घसरल्या; नंतर त्या पुन्हा रु. २०,९९० पर्यंत वाढल्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून रु. २०,९३० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,९७४ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.१ टक्क्यांनी अधिक
आहेत (रु. २१,०००). आंतरराष्ट्रीय मागणी कमी आहे. कपाशीचा एप्रिल २०१८ डिलीवरी भाव (एनसीडीइएक्स) प्रति २० किलोसाठी रु. ९४७ आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलो गाठ).
 
arun.cqr@gmail.com

इतर अॅग्रोमनी
हळद वगळता सर्व शेतमालाचे भाव तेजीतया सप्ताहात साखर, सोयबीन व हळद वगळता सर्व पिकांचे...
कापूस कोंडी टाळण्यासाठी मिशन मोडवर काम...भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक...
हळद, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात चढ -...या सप्ताहात कापूस, गवार बी व हरभरा वगळता सर्व...
इंटरनेटद्वारे कृषिमालाचे प्रभावी विपणनएकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने...
पुढील काही महिने हळदीच्या दरावर ठेवा...या सप्ताहात सोयाबीन व गहू वगळता सर्व पिकांचे भाव...
ऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार...ब्रॉयलर्सचे बाजारभाव वर्षातील उच्चांकी पातळीवर...
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची गोचीकोणतेही तातडीचे, आतबट्टायचे काम करायचे असेल तर...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
व्यापारी बँका वित्तीय निरक्षरतेचा फायदा...व्यापारी बँका सामान्य कर्जदारांमधील वित्तीय...
संतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या...नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी...
नवीन हंगामात कापसाची अडखळती सुरवातदेशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची...
हमीभाव मनमोहनसिंग सरकारपेक्षा कमी;...नरेंद्र मोदी सरकारने जुलै महिन्यात पिकांच्या...
तेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून '...अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज...
थेट विक्रीचे देशी मॉडेलमहाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पुढाकारातून सेंद्रिय व...
शेतीशी नाळ जोडणारा फॅब्रिकेशन व्यवसायफॅब्रिकेशन व्यवसाय एक उत्तम लघू उद्योग आहे. या...
हेमंतरावांची शेती नव्हे ‘कंपनी’च!लखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत...
खरीप मका, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात कापूस, रब्बी मका, सोयाबीन व हरभरा...
कृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...
सोयाबीन, कापूस वगळता इतर पिकांच्या...या सप्ताहात सोयाबीन व कापूस वगळता इतर वस्तूंच्या...
सोयामील निर्यात ७० टक्के वाढण्याचा अंदाजदेशाची सोयामील (सोयापेंड) निर्यात २०१८-१९ या...